सुंदर ते ध्यान...

Submitted by अतुल ठाकुर on 20 January, 2014 - 11:19

गावी गेल्यावर पहिला कार्यक्रम असतो देवळात जाण्याचा. गाव असा दांड्यावर वसल्याप्रमाणे. मध्ये रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजुला घरे. पलिकडल्या घरांच्या रागेच्या मागे समुद्र. तर आमच्या घरांच्या मागे शेती. गाव रस्त्याबरोबर पुढे सरकत गेलेला. घराबाहेर पडलो आणि शेताकडच्या रस्त्याला लागलो. जाताना तळं लागलं. सारं गुलाबी कमळांनी आच्छादलेलं. पूर्वी यातुन मासे काढले जात. अजुनही काढले जात असावेत. माहीत नाही. पुढे खाडी. पावसाळ्यात तुडुंब पाणी भरतं. आता पुल केला आहे. जाताना काही जण सायकल वरुन जाताना दिसताहेत. ह्या भागाला अजुनही सुधारणेची फारशी झळ लागलेली नाही. आदिवासींची घरे आहेत. क्वचित बैलगाडी देखिल दिसते. पहिलं भवानी देवीचं देऊळ. भवानी देवीच्या पाया पडुन तेथे थोडा विसावलो. थंडगार वाटले. या गावच्या देवळांमध्ये गारवा असतो. पुढे शंकराचे देऊळ. वसईच्या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी या भागात आल्यावर चिमाजी आप्पांनी या देवळाचा जिर्णोद्धार केल्याची हकीकत सांगितली जाते. तेथे पाया पडुन थोडे थांबल्यावर परतीच्या वाटेला लागलो.

यावेळी कॅमेरा नेला होता. तेव्हा टिपलेली ही चित्रे Happy

Picture-021.jpgPicture-011.jpgPicture-001.jpgPicture-018.jpgPicture-019.jpgPicture-062.jpgPicture-009.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!! Happy

प्रचि ०१ - गोकर्ण
प्रचि ०२ - रानतीळ
प्रचि ०३ - कंचन (नक्की माहित नाही Wink )
प्रचि ०६ - गुलाबी एडेनियम
प्रचि ०७ - भोपळा (?)