Submitted by प्रसाद लिमये on 9 January, 2014 - 06:31
सुखान्त गोष्टी रोज नव्या मी जुळवत बसतो
एक उदासी रोज रोज ओलांडत बसतो
`असेच होइल' घालताच समजूत मनाची
मी सुध्दा मग `तसेच होइल' समजत बसतो
देणे असते अखेर या डोळ्यांचे काही
मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो
कुठेतरी असणार रात्र.. तुटणारा तारा
दिवसासुध्दा मनात काही बोलत बसतो
कुणीतरी येताच जाग डोकावत असते
रात्र रात्र सगळा कोलाहल खोडत बसतो
चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गायनानुकुल, प्रासादिक, संयत
गायनानुकुल, प्रासादिक, संयत आणि सुरेख गझल! धन्यवाद!
अवाक झालोय...वेगळीच.मस्त
अवाक झालोय...वेगळीच.मस्त स्टाईल. धन्यवाद सर...
चित्रामधले घर एखादे अबोल
चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो
सुंदर.
गझल आवडली.
शेवटचे दोन सर्वात छान वाटले.
शेवटचे दोन सर्वात छान वाटले.
कुणीतरी येताच जाग डोकावत
कुणीतरी येताच जाग डोकावत असते
रात्र रात्र सगळा कोलाहल खोडत बसतो << वा !>>
चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो << सुपर्ब >>
एकंदरीत सुंदर गझल
व्वा सुरेख गझल... शेवटचे दोन
व्वा सुरेख गझल...
शेवटचे दोन फार आवडले... 'असेच होईल' पण आवडला...
ज्ञानेशच्या गझलांची आठवण करून देणारी गझल...
गझल आवडली.
गझल आवडली.
देणे असते अखेर या डोळ्यांचे
देणे असते अखेर या डोळ्यांचे काही
मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो......वा वा
कुठेतरी असणार रात्र.. तुटणारा तारा
दिवसासुध्दा मनात काही बोलत बसतो.........क्या बात !!
चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो.......आह ! फक्त आह !!
धन्यवाद !
-सुप्रिया.
अतीशयच उत्तम सगळे शेर
अतीशयच उत्तम
सगळे शेर पुन्हापुन्हा वाचत बसलो आहे लक्षपूर्वक कान देवून ऐकावी अशी आहे गझल
सर्वच शेर फार् सुंदर आहेत कोणताही एखाद कोट करत बसत नाहे आहे
पण असेच होईल तसेच होईल मधली गम्मत छान साधलीत दोन तीनदा वाचल्यावर लक्षात आली
पण एकेजागी मला व्यक्तिशः काफिया बदलून हवा होता ..
कुठेतरी असणार रात्र.. तुटणारा तारा
दिवससुद्धा मनात काही मागत बसतो
असो
धन्यवाद लिमये साहेब
गझल कमीवेळा घेवून येता पण प्रत्येकवेळी दमदार जानदार घेवून येता!!
ह्यासठी विशेष धन्स
मस्तच आहे, आवडली.
मस्तच आहे, आवडली.
मस्त!
मस्त!
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार
आवडली गझल
आवडली गझल
फार सुरेख.
फार सुरेख.