माझ्याकडे माझी स्वतःची अशी विकत घेतलेली / मिळालेली पुस्तके बरीच झाली आहेत.
पुस्तक खरेदीच्या सुरुवातीच्या काळात माझे घर पुण्यात होते आणि मी नोकरीच्या निमित्ताने इतरत्र असायचो. त्यावेळी पुस्तकांची एकूणच संख्या थोडकी होती. तसेच कामाच्या मुक्कामी माझ्याबरोबर मी मोजकीच पुस्तके ठेवायचो आणि बाकी सर्व पुस्तके घरी पुण्यालाच असायची. ती कोण कोण नेऊन परत न दिल्यानंतर किंवा नीट न हाताळता परत केल्याचे अनुभव आल्यावर मी त्यांना एका ट्रंकेत / माळ्यावर ठेवायचो.
मधल्या कालावधीमध्ये लग्न, मुले अशा घर-संसारी गोष्टीत गढल्यामुळे पुस्तकांकडे जरा दुर्लक्षच झाले होते. मग मुले झाल्यावर ती लहान असताना पुस्तकांवर रेघोट्या मारणे पाने फाडणे अशा त्यांच्या उद्योगाची भीती वाटल्याने बरीचशी पुस्तके माळ्यावरच ठेवलेली होती / आहेत. पण आता मुले जरा जाणती झाली आहेत व त्यांच्यातही वाचनाची आवड निर्माण व्हावी असे वाटत असल्याने पुस्तके खाली काढली / काढत आहे.
मी मागे एकदा काही पुस्तकांची यादी केलेली होती व त्या प्रमाणे पुस्तकांना ठेवले होते पण पाहिजे ते पुस्तक पाहिजे त्या वेळी सापडतेच असे नाही.
आपण मायबोलीकर आपापल्या पुस्तकांचा सांभाळ कसा करता हे जाणून घेण्यासाठी व शिकण्यासाठी हा बाफ उघडत आहे.
लिहायला (झालेच तर) सोपे जावे म्हणून काही मुद्दे / प्रश्न मांडत आहे. अर्थात ह्या व्यतिरिक्तदेखिल माहिती पुरवावी ही विनंती.
आपण पुस्तके खणात कशा रीतीने लावता.
यादी / साठवण अगदी लायब्ररी पद्धतीने / अकारविल्हे करता का?
पुस्तके खणात ठेवताना पुस्तकांचे लेखकानुसार / अकारविल्हे / साहित्य प्रकारानुसार किंवा आणिक कोणत्याही प्रकारे वर्गीकरण करता का?
अशा वर्गीकरणाचे फायदे / तोटे काय?
कुणाला दिलेले पुस्तक, परत आले की नाही याची आठवण / नोंद कशी ठेवता?
पुस्तके कडी कुलुपात ठेवता काय?
तर आपल्या उत्तरांच्या प्रतिक्षेत
पेपरबॅग्जमधे पुस्तके ठेवायची
पेपरबॅग्जमधे पुस्तके ठेवायची आयडिया भारी आवडली.
पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी
पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी बाजारात मिळणारा 'स्टीकर पेपर' वापरल्यास पुस्तके सुंदर दिसतात व खराब होत नाहीत. >>> या अतिउपयोगी माहितीबद्दल धन्यवाद. शाळेच्या पुस्तकांकरताही उपयोगी पडेल.
कोणत्या कंपनीचे आहेत हे स्टीकर पेपर? नेटवर शोधलं तर अॅक्च्युअली स्टीकर प्रिंट करता येतील असे स्टीकर पेपर दिसत आहेत.
नमस्कार, आपण मुंबईकर दिसत
नमस्कार,
आपण मुंबईकर दिसत आहात. मुंबई मध्ये असा पेपर फक्त अब्दुल रेहमान रोडवरील होलसेल दुकानात नक्कीच मिलेल. अमेरिकेत मात्र डॉलरट्री , दायासो , officemax इ . मध्ये मिळतो, पण फारच महाग दराने !
धन्यवाद !
धन्यवाद. आता क्रॉफर्ड
धन्यवाद. आता क्रॉफर्ड मार्केटला जाणं आलं. यिप्पी!!!!
स्टिकर पेपर, पुण्यात कुठे
स्टिकर पेपर, पुण्यात कुठे मिळेल अप्पा बळवंत चौक का रवीवार पेठ? दुकानाचे नाव माहित असेल तर सांगाल का?
स्टिकर पेपर, पुण्यात कुठे
स्टिकर पेपर, पुण्यात कुठे मिळेल अप्पा बळवंत चौक का रवीवार पेठ? दुकानाचे नाव माहित असेल तर सांगाल का?>>> पार्श्वनाथ अथवा जयपाल पेपर्स व त्या रांगेत , दक्षिणमुखी मारुती चौक, प्रभात सिनेमाशेजारी , पुणे
अश्याही बुककेसेस....
अश्याही बुककेसेस....
मृ.. मस्त आहेत बुककेसेस
मृ.. मस्त आहेत बुककेसेस
मृण्मयी, मस्तच आहेत ते फोटो.
मृण्मयी, मस्तच आहेत ते फोटो. (खासकरून जिन्याखाली बूक-केस करण्याची कल्पना खूप आवडली.)
पण अश्या साफसफाईच्या दृष्टीनं अत्यंत गैरसोयीच्या वस्तू फोटोंमध्येच बर्या असं वाटतं.
मृण्मयीने दिलेल्या लिंकमधील
मृण्मयीने दिलेल्या लिंकमधील बुकशेल्फ भारी आहेत
ट्री शेल्फ जास्त आवडले
धन्यवाद सुरेश शिंदे, आणि
धन्यवाद सुरेश शिंदे, आणि मृण्मयी मस्त आहेत पुस्तकाची कपाटं, धन्यवाद
इंडस्ट्रियल स्पूल आवडले. हेही
इंडस्ट्रियल स्पूल आवडले.
हेही मस्त आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=529295183747570&set=a.4724862727...
पुस्तकाची जपवणूक करण्यासाठी
पुस्तकाची जपवणूक करण्यासाठी बेफिकिर वाचकांना वारंवार सूचना द्याव्या लागतात. माझ्या बायकोला एक घाणेरडी सवय आहे खुणेसाठी पुस्तकाची पाने दुमडून ठेवायची आणि बाईंडींगवर पुस्तक उपडे करुन ठेवायची. माझी खूप चिडचिड होते मग. खुणेसाठी कागद ठेवा, बुकमार्कर वापरा. असे सांगितले की त्यांच्या बेशिस्तीच्या हक्कावर गदा येते.
पुस्तकं लोखंडी कपाटात एकावर
पुस्तकं लोखंडी कपाटात एकावर एक आडवी आकारमानाने ठेवली आहेत चाळीस वर्षांत जराही खराब झाली नाहीत किंवा कसर लागली नाही किंवा डांबर गोळ्या ठेवाव्या लागल्या नाहीत. यांचा वास मला जराही सहन होत नाही. आता विषयाप्रमाणे गठ्ठे आहेत. दिखाऊ लाकडी कपाट आवडत नाही. लाकडाला वाळवी, कसर लवकर येऊ शकते. दमटपणा लवकर धरतो व जातही नाही. लोखंडी कपाटात हा त्रास नसतो. लहान मुलांना हवी असलेली पुस्तके वेगळी हातात काढून देणे हेच उत्तम.
कवर घालवणे - पुस्तकाच्या आतील बाहेरील भागात कोणतीही खूण केलेली, नाव घातलेलं मला आवडत नाही. बाहेरील आवरण हाताळून खराब होऊ नये आणि आतील चित्रे आणि मजकूर दिसावा म्हणून तडतडीत प्लास्टिकचा कागद वापरतो. चिकटपट्ट ही त्यालाच असते, आतल्या कागदावर कुठेही चिकटणार नाही अशी लावलेली आहे.
लायब्ररी बंद होणे म्हणजे
लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे. असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे. सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत.लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
मिळण्याचे ठिकाण - बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८.
वेळ - सोमवार ते शनिवार सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील.
संपर्क - प्रसाद कुलकर्णी ९८९०६५८३८७
पुणेकरांनो लाभ घ्यl.(ज्यांना पुस्तकांची आवड आहे त्यांच्यासाठी)
>>>>>>खुणेसाठी पुस्तकाची पाने
>>>>>>खुणेसाठी पुस्तकाची पाने दुमडून ठेवायची
मला कोर्या करकरीत पुस्तकांपेक्षा अशी वाचलेल्या खूणा व महत्वाचे उतारे वगैरे अधोरेखित केलेली, कमेन्टस टाकलेली पुस्तके आवडतात.
पूर्वी पुस्तकं काळजीपूर्वक
पूर्वी पुस्तकं काळजीपूर्वक हातळावी, इकडे तिकडे पडलेली नको, पाने नीट उलटावी, दमट हाताने पुस्तक हाताळू नये इ. इ. बरच वाटायचं. हल्ली पुस्तकं जास्तीत जास्त हाताळली जावीत, वाचणे महत्त्वाचे. पेपरबॅक गठ्ठ्यांचे दोन तुकडे झाले म्हणजे पारायण झाले समजतो. युटीलिटी आहे ती हे पटलं आहे.
बाय द वे, पानांचे कोपरे
बाय द वे, पानांचे कोपरे दुमडलेल्या पुस्तकांना डॉग-ईयर्ड बुक्स म्हणतात. पानाचे दुमडलेले टोक कुत्र्याच्या कानासारखे दिसते म्हणुन. ही ऐकिव माहीती आहे.
हे दोन ट्वीट्स वाचल्यावर
हे दोन ट्वीट्स वाचल्यावर अपराधभावावर उतारा मिळाला. मायबोलीवर हे डकवावं असा सुयोग्य धागा दिसला नाही. इथे चालून जावं.
Umberto Eco, who owned 50,000 books, had this to say about home libraries:
“It is foolish to think that you have to read all the books you buy, as it is foolish to criticize those who buy more books than they will ever be able to read. It would be like saying that you should use all the cutlery or glasses or screwdrivers or drill bits you bought before buying new ones.
“There are things in life that we need to always have plenty of supplies, even if we will only use a small portion.
“If, for example, we consider books as medicine, we understand that it is good to have many at home rather than a few: when you want to feel better, then you go to the ‘medicine closet’ and choose a book. Not a random one, but the right book for that moment. That’s why you should always have a nutrition choice!
“Those who buy only one book, read only that one and then get rid of it. They simply apply the consumer mentality to books, that is, they consider them a consumer product, a good. Those who love books know that a book is anything but a commodity.”
Sometimes when you buy a new book, it’s not about reading the book right away. It’s about the comfort of knowing it’ll be there whenever you’re ready to read it.
आणखी एक - The Japanese word for the practice of buying books but not reading them is tsundoku
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
Umberto Eco चे भाष्य म्हणजे अपराधभावावर अगदी रामबाण उतारा आहे !
हॅपी बुक बायींग!
मसतच!
मसतच!
Pages