दातांची काळजी कशी घ्यावी - मोठ्यांसाठी

Submitted by वेल on 6 January, 2014 - 08:00

लहान मुलांच्या दाताबद्दल अजूनही बोलायचे आहे, पण त्याआधी थोडं मोठ्यांच्या दाताबद्दल,

दातांच्या काळजीबद्दल वाचण्यापूर्वी चला एकदा स्वतःच्याच दाताचं आरशात निरिक्षण करूया.

दात प्रकाश परावर्तित करताना चमकत आहेत का?

दात घासताना दातातून रक्त येते का?

दात हलत आहेत का?

थंड - गरम आंबट ह्याचा ठणका लागतो का? तो खूप वेळ राहातो का?

तोंडाला खूप जास्त वास येतो का?

काही कडक खाल्लं की दाताला ठणका लागतो का?

जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही आणि बाकी सगळ्या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर.. तर हा लेखवाचून तुम्ही दातांची काळजी व्यवस्थित प्रकारे घेऊ शकाल.

जवळ जवळ सगळ्यांनाच माहित असेल की मोठ्या माणसांना ३२ दात असतात. वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी -
सर्वात समोरचे चार पटाशीचे दात - मधले दोन सेण्ट्रल इनसायझर. त्या दोघांच्या बाजूचे दोन लॅटरल इनसायझर. त्यांच्या बाजूला प्रत्येकी एका बाजूला एक असे दोन सुळे - कनाईन, त्याच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन उपदाढा - प्रीमोलर. त्यांच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन दाढा - मोलर्स. आणि सर्वात शेवटची दाढ अक्कलदाढ - विस्डम टूथ - सगळ्यांनाच अक्कलदाढ असते असे नाही. सर्व मिळून एका जबडयात १४-१६ दात.

दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली, आणि काळजी घेतली तर आपल्यावर फार कमी वेळा दाताच्या डॉ कडे जाण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वात प्रथम आपण दाताची स्वच्छता कशी राखायची हे पाहू. पेस्ट वापरून ब्रश करने महत्त्वाचे. पेस्ट वापरण्याचे कारण हे की पेस्ट्मुळे तोंडात फोम तयार होतो ज्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात. ब्रश करताना शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा ब्रश वापरावा - उदा. कोलगेट अल्ट्रा सॉफ्ट (कोलगेट अल्ट्रा सॉफ्सारखा कोणताही ब्रश वापरलात तरी चालेल. मी कोलगेट कंपनीची जाहिरात करत नाही आहे.) तोंडात फोम तयार होण्याला वेळ मिळावा म्हणून आधी सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी, एखादे मिनिट थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा. दातांवरून ब्रश फिरवताना हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावे. उलटे ब्रश करू नये. वरचे दात आणि खालचे दात वेगवेगळे साफ करावे. दात साफ करताना, दाताच्या मागच्या बाजूनेदेखील हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे ब्रश फिरवणे महत्वाचे. दाढांचा चावण्याचा सर्फेस साफ करताना मागेपुढे असा ब्रश फिरवावा. दातांचा ओठाकडील, गालाकडील आणि जिभेकडील सर्फेस साफ करताना कधीही आडवा ब्रश फिरवू नये.

प्रत्येक दाताला ५ सर्फेस असतात. प्रत्येक सर्फेस व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. ब्रशिंग मुळे दाताचा ओठाकडचा आणि जीभेकडचा आणि दाढेचा गालाकडचा, जिभेकडचा आणि चावण्याचा सर्फेस स्वच्छ होतो. दोन दातांच्या मधले दोन्ही सर्फेस ब्रशने साफ होऊ शकत नाहीत. काहीजण त्याकरता टूथपीक वापरतात. पण त्यानेही पूर्ण स्वच्छता होत नाही. दोन दातांच्या मधले सर्फेस स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंगचा दोरा वापरावा. (केवळ फ्लॉसिंगचाच दोरा वापरावा. शिवणकामाचा दोरा वापरून प्रयोग करू नयेत). हा दोरा निर्जंतुक केलेला असतो शिवाय तो स्ट्राँग असतो. त्या दोर्‍याने दोन दातांच्या मधला सर्फेस स्वच्छ करताना तो दोरा हिरडीकडून दाताच्या टोकाकडे असा सर्फेसला घासून बाहेर काढावा. लगेच धुवून दुसरी फट साफ करावी. फ्लॉसिंग नंतर व्यवस्थित चुळा भराव्यात.

तोंडाला वास येत असेल तर माऊथवॉश वापरण्यास हरकत नाही. परंतु एका वेळी सलग फक्त पंधरा दिवस माऊथवॉश वापरावा (भारतातले माऊथवॉश वापरताना तरी) त्यानंतर १५ दिवसाचा ब्रेक घ्यावा. ह्यापुढे तोंडाला वास येत नसेल तर माऊथवॉश वापरू नये.

न चुकता जिभलीने जीभ साफ करावी, कधी कधी जीभेवर चिकटलेले अन्नकण देखील तोंडात कीड वाढवू शकतात.

दिवसातून कमीतकमी तीन वेळा दात घासावेत. कमीत कमी अशा करता की आपली भारतीयांची सकाळी उठल्या उठल्या - खाण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय पाहाता दोन वेळा हे कमीच आहे. सकाळचा चाहा-दूध नाश्ता केल्यानंतर ब्रश करणे जास्त महत्वाचे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ब्रशिंग झाले असले तरी चहा, दूध नाश्ता केल्यावर लगेच ब्रश, फ्लॉस करने जीभ घासणे महत्वाचे आहे. शक्य झाले तर दुपारच्या जेवणानंतरही दातांवर ब्रश फिरवावा.

असे केल्याने दातातील ९५% अन्नकण निघून जातात. राहिलेले ५% अन्नकण हिरडी आणि दात ह्यातल्या फटीत अडकून असतात. काही वेळा फ्लॉसिंगने दोन दाताम्च्या मधल्या फटीतल्या हिरडीतले अन्नकण निघून जातात परंतु दातावरची आणि मागची हिरडी आणि दात ह्यात अडकलेले अन्नकण साफ करायला दाताच्या डॉक्टरची मदतच घ्यावी लागते. दाताचे डॉक्टर ओरल प्रोफायलॅक्सिस म्हणजेच स्केलिंग म्हणजेच इंस्ट्रुमेंटस वापरून दाताची स्वच्छता करतात. काही डॉ हॅण्ड इंस्ट्रुमेंटस वापरून स्केलिंग करतात काही डॉ. मशिन वापरून करतात. अर्थात मशिनने केलेले स्केलिंग जास्त इफेक्टिव्ह असते.
स्केलिंग केल्यामुळे दात आणि हिरड्या ह्यात अडकलेले अन्नकण केवळ सफ होत नाहीत तर चहा सिगरेट ह्याने पडलेले डागही कमी होतात. ह्यामुळे हिरडीचे आणि हिरड्यांच्या आतील हाडाचे निरोगी पण टिकते आणि आयुष्य वाढते. ह्याशिवाय दातात अन्नकण अडकल्याने आपल्याला न कळलेली दाताला लागलेली कीडदेखील लगेच कळून येते आणि त्यावर ट्रीटमेण्ट करता येते.

ब्रशिंग, फ्लॉसिंग, स्केलिंग बद्दल काही समज आपल्यात असतात.
१. ब्रशिंग जोरात केले तरच दात साफ होतात - असे अजिबात नाही. उलट जोरात ब्रशिंग करून आपण दातावरचे इनॅमल कमी करतो. ज्यामुले दातांना सेन्सिटिव्हिटि चा त्रास होऊ शकतो. दात हलक्या हाताने घासावेत.
२. दात घासायला खूप वेळ लागतो - वर दिलेल्या टेक्निकने दात घासले तर दात घासायला दोन ते तीन मिनिटे पुरतात.
३. फ्लॉसिंगमुळे दातात फटी वाढतात. - फ्लॉसचा दोरा खूप बारिक असतो त्याच्यामुळे फटी अजिबात वाढत नाहीत. दात सरकून फटी वाढायला दातांवर कायम असा खूप जोर असावा लागतो. ऑर्थोच्या ट्रीट्मेण्ट मध्ये असतो तसा.
४. जीभ घासणे, फ्लॉसिंग करने हे फक्त अ‍ॅडल्टसनी करायचे असते - वयाच्या चार पाच वर्षापासून मुलांना जीभ घासण्याची, फ्लॉसिंगची सवय लावावी.
५. स्केलिंगने दातात फटी वाढतात - अजिबात नाही. स्केलिंगमुळे दातात फटी झाल्यासारखे वाटत असेल तर - दातात मुळातच फटी होत्या. अन्नकण दातात अडकून त्या फटी बुजल्या होत्या. स्केलिंगनंतर अन्नकण निघून गेल्याने त्या फटी दिसायला लागल्या आहेत एवढेच. फार मोठ्या मोठ्या फटी नसतील तर त्यावर ट्रीटमेण्टची गरज नसते. तरीही तुम्हाला त्या फटी नको असतील तर कॄपया दात काढून तिथे दुसरा कृत्रिम दात बसवू नका. दाताचे रूट कॅनाल करून / न करून दातावर कॅप बसवू नका. फटी कमी करण्यासाठी वेगळे उपचार असतात. त्याकरता नैसर्गिक दात काढून तिथे खोटा दात बसवणे, कॅप बसवणे हे अयोग्य आहे.
६. स्केलिंग केल्याने दात कमकुवत होऊन हलतात - स्केलिंग नंतर दात हलतात हे खरे असले तरी सगळ्यांच्या बाबतीत हे खरे नाही. ज्यांच्या हिरड्यांमध्ये बराच काळ अन्नकण साठून त्याचा दगद झालेला असतो, त्यांचे दात स्केलिम्ग केल्यावर हलतात कारण स्केलिंग करून तो अन्नकणांचा दगड काढला जातो. ह्या अन्नकणांच्या दगडामुळे दाताखालचे हाडदेखील झिजायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे अन्नकणांचा दगड काढणे मस्ट आहे. अशा अडकलेल्या अन्नकणांमुळे दाताम्खालचे हाड कमकुवत होऊन दात हलतात व पडतात. जर व्यवस्थित काळजी घेतली- नीट ब्रशिंग केले, वरचे वर - वर्षातून एक / दोन वेळा स्केलिंग करून घेतल्यास हिरड्या, दाताखालचे हाड कमकुवत होणार नाही आणि दात पडणार नाहीत.
७. दातातून रक्त येत असताना ब्रशिंग करू नये.- मुळात दातातून रक्त येत नाही, रक्त हिरडीतून येते. हिरड्या कमकुमत झाल्याचे ते लक्षण आहे, कारण एकच दाताची स्वच्छता नीट झालेली नाही (किंवा हार्ड ब्रशने खूप जोरात ब्रशिंग केले.) हिरडीतून रक्त येत असल्यास लगेचच डेंटिस्टला दाखवावे. पायोरिया ह्या हिरड्यांच्या आजाराची ही सुरुवात असू शकते. स्केलिंग करून घ्यावे. स्केलिंग करूनही आठ दिवसात हिरड्यतून रक्त येणे थांबले नाही तर गरज पडल्यास डेंटिस्ट तुम्हाला हिरड्यांची सर्जरी करण्याचा सल्लाही देऊ शकतो. ही फारशी दुखवणारी ट्रीटमेण्ट नाही. ह्यात तोंडात दात काढताना देतात तसे इंजेक्शन देऊन हिरडीचा वरचा भाग हलकेच उघडून त्यातील अन्नकण साफ केले जातात. हिरड्या साफ करून घेतल्याशिवाय दातावर कॅप लावून घेऊ नये किंवा ऑर्थो ट्रीटमेंटही करू नये. हिरड्या आनखी कमकुवत होतील आणि दात पडतील.
८. पेस्ट एइवजी दंतमंजन वापरले तरी चालते - दंतमंजन किती वारीक आहे ते पाहावे. जाड दंतमंजन असेल तर त्याने इनॅमल कमी होत जाते.
९. दात सेन्सिटिव्ह झाले की सेन्सिटिव्ह टूथपेस्ट स्वतःच्या मनाने वापरली तर चालते आणि कायम वापरावी लागते. - डेंटिस्टला ला विचारूनच मग सेन्सिटिव्ह टूथेपेस्ट वापरावी. किती दिवस वापरायची हेही विचारून घ्यावे.
१०. दात दुखत असेल तर एखादी पेनकिलर / अ‍ॅण्टिबायोटिक घेऊन काम चालते - दात दुखतो आहे ह्याचा अर्थ कीड मुळापर्यंत गेली आहे. ती कीड रूट कॅनाल प्रोसिजरनेच काढावी लागते. पेनकिलर घेऊन दूख दाबण्यात अर्थ नाही. ती कीड आणि इन्फेक्शन आजूबाजूच्या दातातही पसरू शकते. पेनकिलर अँटिबायोटिक स्वत:च्या मनाप्रमाणे घेऊ नये किंवा केमिस्टने दिले म्हणूनही घेऊ नये. अँटिबायोटिक घेताना डेंटिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावे. पेन्किलर आणि अँटिबायोटिक तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला अ‍ॅसिडिटिचा त्रास आहे की नाही, कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी आहे की नाही हे विचारूनच मग डॉ प्रीस्क्राईब करतात. शिवाय अँटिबायोटिक हे सांगितले तितके दिवस घेतली गेलीच पाहिजे नाहीतर मेडिसिन रेझिस्टन्स येऊन मग कोणतीच अँटिबायोटिक तुम्हाला लागू पडणार नाही अशीही वेळ येऊ शकते.
११. दात दुखण्यावर दात काढणे हाच उपाय आहे, दात तुटला असेल तर दात काढावाच लागतो. दात काढला तरी हरकत नाही इम्प्लाण्ट करून नवीन दात बसवता येतो. - आधुनिक तंत्रज्ञानात दात काढण्याऐवजी रूट कॅनाल, तुटलेल्या दाताला पूर्वीप्रमाणे बनवणे - पोस्ट अँड कोअर, कॅप करणे हे उपाय आहेत. केवळ इम्प्लांट जास्त आधुनिक आहे म्हणून नैसर्गिक दात काढून त्याठिकाणी कृत्रिम दात बसवणे योग्य नाही.

दात व हिरड्या साफ करून घेणे ही दंतस्वच्छतेची शेवटची ट्रीटमेण्ट नव्हे तर सर्वात पहिली प्रोसेस आहे. हिरड्या साफ असतील तरच तोंडात अगदी शेवटपर्यंत दात टिकतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेरिऑडोन्टल डिसिज झाल्यावर डीप क्लिनिंगचा(स्केलिंग,रूट प्लॅनिंग) कितपत फायदा होतो? डीप क्लिनिंगचे काही तोटे आहेत का?
मला कळालेल्या माहितीनुसार जर एकदा डीप क्लिनिंग करण्याची गरज पडली तर ते वारंवार करुन घ्यावे लागते.
पेरिऑडोन्टल डिसिज पुन्हा होऊ नये म्हणून काय करावे?

Hi वेल,
Sorry for english typing but cannot type through ipad.

I have one question. Today i had a appointment from dentist. From last couple of days i had pain the right side jaw especially at the evening time when i was drinking tea.
I went to Dentist here(in US) and she examined and cleaned the teeth. At the same time she gave floss like you said and told me that i have to do it every night. She said she cannot see any reason for pain but saw some cavities and possibly that could cause a pain.
Now is that true? Because of cavities is it possible that we can have pain? Anyway i am going to take treatment for filling up cavities.

Again secondly she said my wisdom teeth are not completely out but have a alot of tissues on them?They don't have space to come out so i have to operate on that and remove those though i don't have any problem as its not good for hygine? Should I go for removing wisdom teeth even if i don't have any problem ?

Also she observed that i have some infection on the uppen skin of jaw and it swells. She said i have to check route cannl if done properly before 4 years though i don;t have any problem?

Request you to please answer these questions. It will really helpful for me.
Thanks in Advance.

- Ashwini

.

पूर्वा, ash11 - इतके दिवस धागा पाहिला नव्हता, आज पाहिला. सन्ध्याकाळपर्यंत उत्तर देते.

वेल,
माझी रूट कॅनाल ट्रीटमेंट सुरू आहे. रूट कॅनाल झाले, पण कॅप बसविणे बाकी आहे. या प्रोसिजरसाठी डॉक्टरने मला रूट कॅनालचे २५०० आणि कॅपचे २५०० असे एकूण पाच हजार रुपये सांगितले आहेत. ते योग्य आहे का? कारण जुलै महिन्यात मी दुसऱ्या एका डॉक्टरकडे एका दाढेची रूट कॅनाल केली होती. त्याला कॅपसह अवघा २३०० रुपये खर्च आला होता. कृपया मार्गदर्शन करावे..

वेल, माझ्या डॉक्टरने आकारलेली फी योग्य आहे की नाही, एवढेच मला विचारायचे होते..कारण दोन्ही डॉक्टरांच्या फीमध्ये दुपटीने फरक आहे. मेटल कॅप (स्टिल) बसविणार आहेत.

धन्यवाद वेल.
आधीचा डॉक्टर मित्राचा मित्र आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी कमी पैसे घेतले असावेत. आधीचा डॉक्टर बीडीएस आहे आणि आता ज्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे ते एमडीएस आहेत आणि डेन्टल कॉलेजला लेक्चरर आहेत.

Thanks वेल alot in advance.Pain increases in so much that cannot even drink tea and eat anything. Taking rice, liquid diet. Doctor gave antibiotics and pain killer and trying to get root canal appointment from other doctor as that doctor doesnot do root canal. But here difficult to get appointment at earliest.Don't know what to do now.

ash - I know how difficult it is to get appointments. such a severe pain indicates that you have too much of infection and you need antibiotics and pain killer as prescribed before you get root canal done.. if medicine is prescribed for 3 times a day, take medicine every 8 hours, if it is 2 times a day take medicines every 12 hours. pain will be reduced.

you really cannot do much apart from taking medicines. all the best. u can send me email if u need anything more.

Hi वेल,
Sorry for English, I have typed meaasge in Marathi but due to some wrong key pressed it is deleted. Now it wil take again 1/2 hour to type so eng.

One of my tooth is troubling me alot, First time it had small cavity so Dr. did fillling in 2010. From last 1 year it was troubling me while drinking hot and cold or eating sour things. Dr. did filling once again and told tooth was senetive so it was paining. But pain had not stopped after 2/3 months after using sensodyne also. I went to Dr. again, She removed old feeling and placed new one(with 2 horrible Injections). After that I was not able to eat anything from that tooth after 15 days also. When I told that to her, she said just use Sensodyne it works.
At last 3/4 days before, I went to another Dr. , He said tooth was not filled properly. He remove all old fillings and placed new silver filling (with 3 horrible Injections). But still I can not drink hot milk, tea, some what cold water.

Should I go to Dr again or Do I wait for 1 more week before go to Dr. ?

Is sensitiveness beacuse of teeth only or it can be beacuse of Jaws issue too ?

Please give me some suggestion , I really tired of this now.

कनक,
तुम्हाला फक्त सेन्सिटिव्हिटि आहे का दात दुखतो? तुम्ही दात दुखतो म्हणून डॉ कडे गेला होतात तेव्हा दातावर ट्रीटमेण्ट करण्याआधी तुमच्या दाताचा एक्स रे काढला होता का? गरम वस्तूंनी दात दुखतो म्हणजे म्हणजे दाताच्या मुळात इन्फेक्शन असू शकते. ते आहे की नाही हे एक्सरे पाहून रुल आऊट करायला हवे. असेल तर रूट कॅनाल थेरपीने दात साफ कराय्ला हवा. मग तरीही जर दात / जबडा दुखत असेल तर पुढची लाईन ऑफ ट्रीटमेण्टचा तुम्हाला विचार करता येईल. मुळापर्यंत इन्फेक्शन पोचले नसेल तर मग लगेचच पुढच्या लाईन ऑफ ट्रीटमेण्ट चा विचार करता येईल. कधी कधी तोंडावर मार लागल्याने दात फ्रॅक्चर होऊ शकतो. कधी कधी दात खूप किडल्यावर त्यावर काही जोरात चावल्यासही फ्रॅक्चर होऊ शकतो. कोणतेही डाय्ग्नॉसिस करण्याआधी एक्स रे महत्वाचा. सिल्वर फिलिंग करताना तीन इन्जेक्शन द्यायची गरज पडली म्हणजेच दातात मूळापर्यंत इन्फेक्शन असण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि ते साफ न करताच त्यावर फिलिंग केल्याने दुख वाढलेली असू शकते.

तुम्हाला पेन किलर्स आणि अ‍ॅण्टिबायोटिक्स दिले होते का? ते वेळच्या वेळी घेऊन सांगितलेला डोसेज पूर्ण केला होता का?

इथे मी ह्या सगळ्या शक्यता वर्तवते आहे. खरे काय ते फक्त एक्स रे वरच ठरू शकते.

दोन्ही डॉ ने जर एक्स रे न काढता ट्रीटमेण्ट केली असेल तर त्यापैकी दुसर्‍या डॉ कडे जाऊन एक्स रे काढून घ्यावा. आणि जर एक्स रे काढून ट्रीटमेण्ट केली असेल तर त्यांना तुमच्या दुखण्याबद्दल सांगावे हे योग्य.

Thanks वेल.
पहिल्या डॉ ना एक्स रे काढा म्ह्नल्या वर पन नाहि काढला. दुसर्या डॉ ने एक्स रे काढला. ते म्ह्नाले कि रुट कनल करायचि अजुन गरज नाहि. फिलिग नि होइल.
December मधे जेव्हा ट्रीटमेण्ट सुरु केलि होति तेव्हा फक्त सेन्सिटिव्ह होता. फक्त गरम आणि थन्ड वस्तूंनी कळ निघाचि. पण नन्तर ट्रीटमेण्ट केल्यावर दात दुखला लागला.
म्ह्नुण आता दुसर्या डॉ कडे गेले होते. आता ४ दिवस झाले पन अजुन हि गरम आणि थन्ड वस्तूंनी कळ येत आहे. इन्जेक्शन मुळे जबडा पण दुखत आहे.

दोन्हि डॉ नि पेन किलर्स आणि अ‍ॅण्टिबायोटिक्स दिले नव्हते. दुसर्या डॉ नि दुखत असेल तर 1-2 दिवस Combiflame घ्यायला सान्गितलि आहे. एकदा घेतलि रात्रि.

आता ४ दिवसानि दुखण थाबयला पाहिजे होत का? कि वेळ लागतो.

As per Dr., there was very less cavity and more sensitive. But I dont know why it is troubling me that much. May be First Dr. treatment had gone wrong. I am crossed my finger for second Dr. treatment should work. so after 3/4 days also I am worring and asking u. Thanks a lot.

Hi वेल,

आता डॉ ला call केला होता. ते म्हणतात,आताहि त्रास होत असेल तर रुट कनल करुन घेउ, otheriwse wait for 15-20 days may be sensitiveness जाइल. For pain take combliflem for 3 days.
काय करु, खुपच टेश्नल आल आहे. आता तर ट्रीटमेण्टचि भीति वाटयला लागलि आहे.
Idealy filling नन्तर थोडे दिवस त्रास होतो का दात सेट होइ पर्यन्त?

जर फिलिंग डेण्टिन पर्यंत गेलं असेल तर कधी कधी त्रास होतो. तो थोड्या दिवसात थांबतो. पण जर कळ मारत असेल तर डॉने सांगितल्याप्रमाणे पेन किलर घेतलेली बरी. १० -१५ दिवसात त्रास वाढला किंवा थांबलाच नाही तर रूट कॅनाल करावे लागेल. घाबरू नका. दातात सिल्वर फिलिंग का केले कॉम्पोझिट का नाही केले ह्याबद्दल जरा विचारून घ्या म्हणजे ह्या सेन्सिटिव्हिटि / पेन मागचं कारणही कळेल,

खूपच सुंदर लेखन आहे. मी दातांना क्फ्लीप बसवण्यास ४ चांगले दात काडले. पण क्लीप्चा काहिच उपयोग झाल्यासार्खा वट्त नाहि. आत खूप वाइट वाटत आहे. पण आता काय उपयोग.

पल्लवी अनु पल्लवी - दातांना तारा बसवण्याची ट्रीटमेण्ट पूर्ण झाली का? रिटेन्शन प्लेट लावली होती का नाही, किती वेळ लावेली. ह्यावर सुद्धा दात सरळ झाले की नाही हे अवलंबून आहे.
काय उपयोग म्हणून निराश होऊ नका. पुन्हा एकदा त्याच डॉ ना भेटा.

आजच कुठेतरी वाचलेले..

वेल.. प्लीज शक्य असेल तर याचा तुझ्या कोणत्यातरी लेखात समावेश कर.

काल मला खूप दातांची निगा ह्यावर उपयुक्त माहिती वाचायला मिळाली.ती शेअर करते.

दंतवैद्याकडे जाणं कुणालाही आवडत नाही. म्हणूनच बहुतेक वेळा दाताची दुखणी अंगावरच काढली जातात. अगदीच नाइलाज झाला म्हणजे डेंटिस्टकडे जाणे होते. दातांचे दुखणे नको आणि त्यावर औषधोपचार तर नकोच नको, असे वाटत असेल, तर मुळात हे दुखणेच उद्भवू नये यासाठी काहीतरी करायला हवे. हे काहीतरी करायचे, म्हणजेत चक्क विवधि फळे, भाज्या आणि कडधान्य खायची.

टूथब्रश फूड्स ही संज्ञा हेच सुचवते. टूथब्रश फूड्स ही संज्ञा युरोप आणि अमेरिका या देशांपाठोपाठ आता भारतातही लोकप्रिय होऊ लागलेली आहे. टूथब्रश फूड्स हे प्रत्येकासाठीच सुंदर हास्य आणि आरोग्यदायी जीवनशैली राखण्यासाठी आवश्यक आहे. नैसर्गिक टूथब्रश फूड्ससाठी खालील काही पदार्थांचे आणि फळांचे नियमित सेवन केले पाहिजे.

१) आपले दात स्वच्छ आणि मजबूत राहावेत यासाठी स्ट्रॉबेरी हे एक अत्यंत उपुयक्त फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक गुणधर्म आणि वैशिष्टये आहेत, जे दात स्वच्छकरून त्यांना ब्लीच करण्यास मदत करतात. चहा आणि कॉफीमुळे दातांवर पडलेले डाग स्ट्रॉबेरीमुळे स्वच्छ होतात. जेवणानंतर नियमितपणे थोडीफार स्ट्रॉबेरी खायला हवी. स्ट्रॉबेरीमधील आम्ल दातांना नैसर्गिकरीत्या उजळपणा आणते.

२) कोबी खाताना त्याचे दातांना घर्षण होते. त्यामुळे दात उजळण्यास मदत होते. कोबी हा नैसर्गिक टूथब्रश आहे. कोबी खाताना तोंडात लाळ तयार होते. ती दातांवर जमलेले सूक्ष्मकणही दूर करते.

३) कलिंगडाचे दोन काप दररोज खाल्ल्याने शरीरास जितकी 'क' जीवनसत्वाची गरज असते, त्यातील 25 टक्के व जीवनसत्व यातून मिळते. हे जीवनसत्व दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. लोह अधिक प्रमाणात शोषूण घेण्याची क्षमता या जीवनसत्त्वात असते. त्याचबरोबर शरीरातील घातक रसायनांचाही ते सामना करू शकते. वाढत्या वयानुसार दातांची होणारी झीज रोखण्यासाठीही त्याची मदत होते.

४) संत्र हे 'क' जीवनसत्वाचे उत्तम स्त्रोत आहे. म्हणूनच संत्रीही नियमितपणे आहारात घेतली पाहिजेत. त्यामुळे दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहते. लोह अधिक प्रमाणात शोषले जाते. तसेच 'क' जीवनसत्त्वाचे पदार्थ चघळल्यामुळे दातांचा नाश किंवा र्‍हास रोखला जाऊ शकतो.

५) सफरचंदामुळे दातांचे आयुष्यमान वाढते. सफरचंदाचा रस पिण्यापेक्षा ते चावून खाल्ल्यास दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्यामुळे दात स्वच्छ आणि बळकट होतात. त्याचबरोबर शरीरातील अनावश्यक शर्करादेखील कमी होते.

६) द्राक्षांमध्ये असलेले मॅलिक अॅसिड उत्प्रेरकांसारखे कार्य करते. त्यामुळे दात पांढरे शुभ्र होतात अन् दातांवरील डाग कमी होतात. जेवणानंतर पाणी प्यायल्यामुळे किंवा चूळ भरल्यामुळे दातांत अडकलेले कण निघून जाण्यास मदत होते.

७) गडद हिरव्या रंगाच्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरास रास बेटा केरोटिन मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे मिळालेले 'अ' जीवनसत्व आपल्या शरीराला आणि दातांना बळकटी आणते.

८) दूध, दही, लोणी यसारख्या दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरास लॅक्टिक अ‍ॅसिड मिळते. त्यामुळे दातांची झीज रोखता येते. त्याचबरोबर दात किडणे, पोकळी निर्मार होणे यापासूनही बचाव होऊ शकतो. दुग्धजन्म पदार्थांमुळे असलेल्या कॅल्शिअममुळे दात आणि हिरड्या बळकट होतात. घट्ट लोणी खाल्ल्यामुळे किंवा चघळल्यामुळे तोंडात लाळ तयार होते आणि त्याचबरोबर दातांमध्ये अडकलेले अन्नकणही निघून जातात.

९) ताज्या हिरव्या द्विदल कडधान्यांचे दातांवर घर्षण होऊन दात स्वच्छ होतात. तसेच तोंडात लाळ तयार होते.
विविधप्रकारे दातांची होणारी हानी तुम्ही योग्य पदार्थ खाऊन थांबवू शकता. आपली जीवनशैली आरोग्यदायी बनवून सुखी व आनंदी जीवन जगू शकता. दातांना दीर्घायुष्य देऊ शकता.

काढ कि.. तू ह्या विषयावर जास्त चांगलं लिहु शकतेस.
वर लिहिलंय त्याच्या जोडीला तुला आणि डेंटिस्ट सरांना जी माहिती आहे या विषयात तीही अ‍ॅड कर याच्यात.

Thank you वेल. प्लेट वापरते आहे.ं माझे दात्च खूपमोथए मोथे आहेत. बहुतेक त्यामुळे उपयोग झाला नाहि असे वट्ते.

Maaze daat 1.jpgMaaze daat 1.jpgMaaze daat 1.jpgMaaze daat 1.jpgMaaze daat 1.jpgMaaze daat 1.jpgMaaze daat 1.jpgMaaze daat 1.jpgMaaze daat 1.jpg

Extreamly sorry, kahitari chukale maze, ekatar adhi typing dhad jamat navhat.ani aata tar daat dakhavayala gele ani:-(:-(:-( zale
Javu de.
Tar hease maze daat yana clip tari kay karnar

Pages