मायबोली - द्वितीय सह्यमेळावा

Submitted by सह्याद्रीमित्र on 2 January, 2014 - 10:38

नमस्कार मित्रांनो. १७ जुलै २०१३ रोजी नितांत सुंदर आणि निसर्गरम्य अशा मढे घाटात रंगलेल्या मायबोलीच्या अट्टल भटक्यांच्या सह्यमेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. जातिवंत भटक्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि अविस्मरणीय अशा आठवणी घेऊन पुढच्या सह्यमेळाव्याचे पडघम वाजले.

आता ती वेळ येउन ठेपली आहे. नवीन वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मायबोलीकर भटक्यांचा द्वितीय सह्यमेळावा सांधण व्हॅली येथे दिनांक २५ व २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्रीचा अद्वितीय असा अविष्कार असलेल्या या निसर्गनवलाच्या सान्निध्यात पुन्हा एकदा आपल्या जीवलग मित्रांची गाठ पडणे यापेक्षा दुसरा सुवर्णयोग कोणता असू शकेल !!!

सो. गेट रेडी. २६ जानेवारीला सांधण दरीला पुन्हा एकदा जीवंत स्वरूप येणार आहे. खाली यो रॉक्सने काढलेले सांधण व्हॅलीचे अप्रतिम फोटो टाकत आहे. सर्वांनी आपापली नावं आणि ईमेल पत्ते प्रतिसादांमध्ये नोंदवा. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.

"/>

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही रे सही ! ठरले पण ! मस्त.. पण अरे प्लीज त्या दरीतून रॅपलिंगने खाली उतरून पुढचा ट्रेक पण साधायचे बघा ना... टेकनिकल आहे थोडे पण सुन्या व इतर काही मायबोलीकर आहेतच.. फारसे अवघड नाहीये.. माझ्यामते होउन जाईल.. त्या दरीतून पुढे काही अंतर चालल्यावर पाण्याचा एक डोह लागतो. अगदी बाण सुळक्याला साक्षी ठेवून कँप करण्यासाठी मस्त जागा आहे म्हणे.. जमल्यास नक्की विचार करा.. नक्कीच एक अविस्मरणीय बाब ठरेल.. नि सामुहिक अंघोळ देखील होईल.. Wink !!

२६ ला मी असेनच.. २४ ला रात्री निघायचे झाल्यास पुर्णतः प्रयत्न करेन..

वाह.. सही.. मी येईन...
अजून गेल्या सह्यमेळाव्याच्या आठवणी ताज्या आहेत..ह्या वेळीही असाच मेळावा घडो..

अप्रतिम फोटो...

मी पुण्याहून येणार आहे.

नावः शरदचंद्र शंकरराव पाटील (शरद)
मेलः scpcs2011@gmail.com
MObile: 08805152951

सर्व माहिती कळवल्यास अत्यंत आभारी होईन...

धन्यवाद! Happy

वा ..मस्त,
पण रतनगड चा बेत केलाय त्याच दिवशी ............... Sad
नव्या मित्रांना भेटायला नक्कीच आवडलं असत .