नुकत्याच दोन बातम्या आल्या
साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1_...
2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sanstha...
काही महिन्यापूर्वी झालेल्या दाभोळकर हत्येबाबतही सनातन वर भरपूर गरळ मीडियातून ओकण्यात आले ,परंतु आजतागायत एकाही सनातन कार्यकर्त्या विरुद्ध ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत , त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पोलिसांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही धार्मिक संघटनेचा हात या कृत्यात नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले होते .
गुजरात मध्ये गोध्रा हत्याकांडांनंतर उसळलेल्या दंगलीत तेथील स्थानिक हिंदूंनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारास " अल्पसंख्यांका वरील हल्ले" ठरवून गेली 14 वर्षे हेच ढोंगी सेक्युलरवादी अन मीडिया ,नरेंद्र मोदींना "मौत का सौदागार " ठरवून ढोल बडवत आहेत . पण परवाच मोदींनाही क्लीन चिट मिळालेली आहे .
शंकराचार्य प्रकरणातही त्यांच्यावर असलेले हत्येचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झालेले आहे .
एकंदरीत सर्व प्रकरणांचा आढावा घेता ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया हे साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार करत असल्याचे लक्षात येते . दिग्गी भाऊनी आणि सुशील कुमारनी तर "भगवा आतंकवाद" वगैरे पर्यन्त मजल मारली होती.याचा अर्थ येनकेन प्रकारेण खोटेनाटे आरोप करून भगव्या संघटनांना / नेत्यांना "मारेकरी" ठरवून बदनाम करायचे आणि लांगूलचालन करून निवडणूकात मतांची पोळी भाजून घ्यायची ,असे साधे सोपे "व्होट-बँक पॉलिटिक्स " या सगळ्या प्रकारामागे आहे हेच सिद्ध होते .
प्रश्न हा आहे की सामान्य जनता या ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया यांनी फेकलेल्या भ्रामक मायाजालातून बाहेर पडून सामान्य जनता खरे मुद्दे काय आहेत ते समजून घेईल का ? आणि येत्या निवडणुकीत Good Governence आणि विकास हे मुद्दे सातत्याने लावून धरणार्या पक्षाला निवडून देईल का?
प्रश्न हा आहे की सामान्य जनता
प्रश्न हा आहे की सामान्य जनता या ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया यांनी फेकलेल्या भ्रामक मायाजालातून बाहेर पडून सामान्य जनता खरे मुद्दे काय आहेत ते समजून घेईल का ? >>>>>>>>>>>>>>>>>
हो नक्कीच.
पण,
येत्या निवडणुकीत Good Governence आणि विकास हे मुद्दे सातत्याने लावून धरणार्या पक्षाला निवडून देईल का? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
दुर्दैवाने बहुतेक नाही. कारण केवळ Good Governence आणि विकास हे एक-दोन राज्यात सत्ता असताना करणे, इतकं पुरेसं वाटत नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष आहे, हे ढोल पिटवुन सांगीतलं तरी विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. हेच भाजपाचं दुर्दैव आहे.
दिल्लीत सहज जिंकता येईल अशी परिस्थिती असताना, जनतेशी संवाद तोडलेल्या लोकांना जवळ घेत आप ने भाजपाला सत्तेजवळ आणुन तहानलेलंच ठेवलं. MCDत भाजपाची सत्ता असुनही ते काहीच करु शकले नाही.
बंद खोल्यात राजकारण करण्याचे दिवस संपले, तसच रस्त्यावर येऊन आंदोलनं करणे इतकच विरोधी पक्षाच काम नाही, हे भाजपाला (आणि मित्रपक्षांना) कधी कळणार देव जाणे.
नाहीतर इतक्या मोठ्या संखेत कार्यकर्ते (रास्वसंघाचे निस्वार्थ) असुनही सामान्यांना भ्रष्टाचारी, सत्तेची आसुसलेली, हजारो वाईट कामात गुंतलेली काँग्रेसची बरी का वाटते, याबद्दल एकदा जनतेचं मत (सर्व्हेतुन) घेउन त्यावर काम केले तरच पुढच्या लोकसभेत मोदी/ भाजपा सत्तेवर येईल, नाहीतर पुन्हा एकदा अटलजींसारखं कोणाच्या ना कोणाच्या नाकदुर्या काढायला तयार रहा.
आणि भलेही आप ला फारसं यश मिळणार नाही, काँग्रेस बुडेल, पण भाजपालाही फायदा होणार नाही.
जनतेची नाराजी कशी कॅश करायची जरा केजरीवालांकडुन शिका.
>>>> सत्तेची आसुसलेली, हजारो
>>>> सत्तेची आसुसलेली, हजारो वाईट कामात गुंतलेली काँग्रेसची बरी का वाटते, <<<<
स्वतःसही कधी गरज पडली तर नियमबाह्यरितीने काम करवुन घ्यायला बरी पडते म्हणून सामान्यलोकान्नाही कॉन्ग्रेसच बरी पडते, अन तुम्ही म्हणता तो सन्घ वगैरेंची सत्याधारीत आदर्श शिकवणूक/रामायण महाभारतातील शिकवणूक आधीच्या निधर्मी व आत्ताच्या सर्वधर्मसमभावी सरकारांच्या अभ्यासक्रमातून केव्हाच वगळली गेली असल्याने स्वप्नातील वचनही जागेपणि पुरे करण्याचा अट्टाहास धरणार्यां पूर्वजांच्या देशातील तथाकथित सामान्य नागरीक पुन्हा पुन्हा "भ्रष्टाचार्यान्नाच" निवडून देतात तेव्हा ती त्यान्ची मजबुरी/हतबलता आहे असे नसते, तर सन्धी मिळेल तेव्हा भ्रष्टाचाराच्या गटारगन्गेत हात धुवुन बक्कळ पैका गाठीशी मारण्याची सूप्त इच्छाच असते हे निर्विवाद पणे सिद्ध होऊ शकते. अर्थात यास अपवादही आहेतच, जसे की धाकदपटशा वगैरे. पण पाचशे/हजारच्या गान्धिबाबाच्या नोटेच्या लालुचीला बळी पडणारि जनता या देशात आहे तोवर कॉन्ग्रेसला मरण नाही!