Submitted by तृप्ती आवटी on 31 December, 2013 - 12:43
लहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात. तुम्हाला माहिती असलेल्या कार्यक्रमांविषयी कृपया इथे लिहा. कार्यक्रमाची एक-दोन ओळींत माहिती, वयोगट, तिकिट मिळण्याची सोय इ. पण लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
न्यु यॉर्क मधल्या बॉटनिकल
न्यु यॉर्क मधल्या बॉटनिकल गार्डनमध्ये 'द हॉलिडे ट्रेन शो' दर वर्षी असतो. मिनिएचर ट्रेन्स आणि सिटीतल्या इमारतींची मॉडेल्स तिथे असतात. बर्याच वेगवेगळ्या वयोगटांतली लहान मुलं तिथे दिसली. असे शो खरं तर मोठ्यांना पण आवडतील असे असतात.
http://www.nybg.org/exhibitions/2013/holiday-train-show/index.php
फ्रेश बीट बँडचा लाइव्ह
फ्रेश बीट बँडचा लाइव्ह पर्फॉर्मन्स एक वर्षाआड सगळीकडे होतो. इकडे इस्ट कोस्टवर २०१२ मध्ये बर्याच राज्यांमध्ये झाला. २०१४ चे कॅलेंडर इथे बघता येइल- http://www.ticketmaster.com/The-Fresh-Beat-Band-tickets/artist/1659193
तुमची मुलं फ्रेश बीट बँड हा टिव्ही शो बघत असतील तर लाइव्ह शो बघायला नक्की घेऊन जा. मुलं खूप प्रचंड धमाल करतात. मधल्या पायर्यांवर येऊन अगदी त्या चौघांसारख्या स्टेप्स करत नाचणे, गाणी तर त्यांना तोंडपाठ असतातच ती म्हणणे. एकुणात एकदम पैसा वसूल अनुभव.
खालच्या लिंकवर ब्रॉडवे आणि
खालच्या लिंकवर ब्रॉडवे आणि जवळपासच्या थेटरातल्या लहान मुलांसाठी असलेल्या नाटकांची माहिती आहे.
http://www.broadway.com/shows/tickets/?category=kid-friendly
अनेक वर्षांपूर्वी 'ब्लूज क्लूज्'चा ब्रॉडवे शो बघितला होता. इतका अप्रतिम होता की आजही मुलाच्या लक्षात आहे.
मृणच्या लिंकवरचा गझिलियन बबल
मृणच्या लिंकवरचा गझिलियन बबल शो पण भारी आहे. जरा पुढे बसलेलो असु तर मोठे मोठे बबल्स आपल्या डोक्यावरून तरंगत जातात. हा शो पण मुलं तुफान एंजॉय करतात. शो संपल्यावर एका ह्युमंगस बबलमध्ये उभं राहून फोटो काढायचा
सेसमे स्ट्रीट लाइव्ह
सेसमे स्ट्रीट लाइव्ह http://www.theateratmsg.com/sesame
जरा लिहायला उशीरच झालाय पण
जरा लिहायला उशीरच झालाय पण - ज्यांना सँटाचे आकर्षण आहे अशा वयोगटातल्या मुलांसाठी ही पोलर एक्सप्रेस ची ट्रेन राइड खूप छान आहे.
http://www.raileventsinc.com/polar-express
ख्रिस्मस डेकोरेशन केलेली अॅन्टीक स्टीम इंजिन वाली ट्रेन, ते टिपिकल जुन्या स्टाइल चे स्टेशन, मस्त वातावरणनिर्मिती करतात.
पोलर एक्सप्रेस मूव्ही बघितला असेल तर अजूनच एन्जॉय करतात मुलं.
१ तासाच्या ट्रेन राइड मधे सँटा येऊन गिफ्ट देतो, हॉट चॉकोलेट आणि कुकीज मिळतात, अजून पण जगलर्स , कॅरल्स गाणारे वगैरे मजा असते.
ही ब्रँडेड फ्रॅन्चाइज आहे, बर्याच ठिकाणी आहे. तिकिटे बरीच आधी बुक होतात. ऐन वेळी मिळणे अवघड.
ही अजून एक नॉन ब्रँडेड पण तशीच राइड आहे- इथे तिकिटे ऐन वेळी पण मिळतात (राइड्स इथे पण फुल्ल होतात वेळ होईपर्यन्त)
https://www.newhoperailroad.com//holiday.cfm?CFID=5403249&CFTOKEN=f7928c...
चांगला बाफ आहे. थॅन्क्स
चांगला बाफ आहे. थॅन्क्स तृप्ती व इतर.
आजच शेवटचा दिवस आहे असं
आजच शेवटचा दिवस आहे असं दिसतंय. आज ब्राँक्स झु मधल्या आइस कार्व्हिंग आणि आइस राइडचा पण शेवटचा दिवस आहे. http://bronxzoo.com/plan-your-trip/events-calendar/ice-sculpting-weekend...
ही एक कनेटिकटमधली नॉर्थ पोल
ही एक कनेटिकटमधली नॉर्थ पोल ट्रेन- http://www.essexsteamtrain.com/northpole.html
यांच्या समर आणि फॉलमध्ये स्टीम ट्रेन + क्रुझ राइड्स पण असतात.
कनेटिकटमधलीच आणखी एक-
कनेटिकटमधलीच आणखी एक- http://www.rmne.org/schedule/index.php
इथे लाइट फेस्टिवल पण असतो.
डिस्ने ऑन आईस चे शो सगळ्या
डिस्ने ऑन आईस चे शो सगळ्या राज्यांमधून ठराविक काळाने होत असतात. आईस स्केटिंग करत डिस्नेच्या गोष्टी सादर करतात. सगळे कलाकार खूप उत्तम आईस स्केटर्स असतात. माझ्या मुलीला खूप आवडतात हे शोज.
तसेच वॉकिंग विथ डायनासोर पण मस्त शो असतो.
चांगला उपयोगी बाफ आहे. किड्स
चांगला उपयोगी बाफ आहे.
किड्स फ्रेंडली ब्रॉडवे शोज खूपच इंटरेस्टींग वाटत आहेत, तो गझिलियन बबल्स शो तर जबरी वाटतोय. (पण तो आमच्या इथे दिसत नाहीये सध्या. :()
सगळ्याच लिंक्स छान आहेत, धन्यवाद.
डिस्ने ऑन आईस चा शो आम्हाला पण खूप आवडला.
डिस्नी ऑन आइस बघितला नाहीये.
डिस्नी ऑन आइस बघितला नाहीये. इथे जानेवारीत काही शो आहेत असं दिसतंय- http://www.newyorkcitytheatre.com/theaters/barclays-center/disney-on-ice...
आम्ही डिस्नी ऑन आइस शो बघितला
आम्ही डिस्नी ऑन आइस शो बघितला गेल्या वीक एंडला. दोन-तीन शो आहेत त्यातला आम्ही A hundred years of Disney बघितला. अतिशय देखणा शो आहे. कलाकारांचे कपडे, गेट अप, रंगसंगती, सेट, त्या त्या कॅरेक्टरसाठी खास बनवून घेतलेले कस्टम स्केट्स सगळंच एकदम भारी. सगळ्या कलाकारांची कामं पण मस्त आहेत. निमो बनलेल्याने माशांच्या पोहण्याची इतकी अप्रतीम नक्कल केली आहे. मला खूपच आवडला तो पार्ट. पण टायटलच्या मानाने एकूण कंटेंट्स ठिकठाक वाटले. १०० वर्षातली कॅरेक्टर्स आणि त्यांच्या गोष्टी यात निवड करणे कठीण झाले असेल. तरी काही गोष्टींची आणि गाण्यांची लांबी कमी केली तर आणखी कॅरेक्टर्स घेता येतील. साधारण ४-५ वयोगटाला आवडेल असा आहे. फिगर स्केटिंग आवडत असेल तर मोठ्यांनी पण अवश्य पहावा.
धनश्री, या शो ची माहिती दिल्याबद्दल खास धन्यवाद
मॉन्स्टर जॅमचे चाहते आहेत का
मॉन्स्टर जॅमचे चाहते आहेत का कुणी? यावर्षीचं कॅलेंडर- http://www.monsterjam.com/events/
मस्त बाफ आहे. आम्ही डिस्नी चा
मस्त बाफ आहे.
आम्ही डिस्नी चा द लिटल मर्मेड शो बघायच म्हणतोय . फेब मध्ये आहे आमच्या इथे.
http://www.thirteen.org/islan
http://www.thirteen.org/islanders/
"अमेरीकन म्यूझियम ऑफ नॅचरल
"अमेरीकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी" चे ग्रेडनूसार भरपूर उपक्रम आहेत... मनोरंजन आणि शिक्षण बरोबरीने...
http://www.amnh.org/learn-teach/
http://store-locator.barnesan
http://store-locator.barnesandnoble.com/event/4675157 लेगो मुव्ही बिल्डिंग इव्हेंट.
काल फ्रॅन्कलिन इन्स्टिट्यूट
काल फ्रॅन्कलिन इन्स्टिट्यूट मधे गेलो होतो. http://www2.fi.edu/
पूर्वी तिथे गेलो आहे प़ण आता जायचं कारण म्हण्जे तिथे सध्या पॉम्पेवर एक्झिबिशन सुरु आहे ते बघायला. हे एप्रिल पर्यन्त असणार आहे. २००० वर्षांपूर्वी व्हेसुव्हियस या ज्वालामुखीच्या अचानक उद्रेकामुळे राखेत गाडलं गेलेलं शहर म्हणून पॉम्पे ऐकून माहित होतं, पण बाकी काही माहिती नव्हती.
हे एक्झिबिशन, इथले आर्टिफॅक्ट्स ३ महिन्याकरता इथे असणार आहेत. त्यात तिथे उत्खननात सापडलेली फ्रेस्को पेन्टिन्ग्ज, भांडी, आयुधं हे तर आहेच पण राखेत इन्स्टन्टली गाडले जाऊन जिवंतपणी बनलेले मानवी पुतळे बघणे हा एक वेगळाच टचिंग अनुभव होता. त्यावर आधारित , त्या दिवशी नक्की कसे अन काय घडले असेल यावर एक छोटा शो पण आहे तोही फार सुरेख केलाय. त्यात स्क्रीन वर दृष्य, जमीन हादरवणारे आवाज, लाइट्स, धूर इ. वापरून रिएलिस्टिक अनुभव दिला आहे. अवश्य बघण्यासारखं प्रदर्शन. आम्हाला खूप आवडलं. यानंतर आयमॅक्स ला रिंग ऑफ फायर नावाचा व्होल्कॅनोज वर शो आहे तोही पहा.
साइट वर अजून डीटेल्स बघा.
इंटरेस्टिंग आहे एकदम.
इंटरेस्टिंग आहे एकदम.
गार्डन दी लाईटस शो पण खुप छान
गार्डन दी लाईटस शो पण खुप छान आहे.
डॅलस किंवा आजुबाजुच्या शहरात
डॅलस किंवा आजुबाजुच्या शहरात असाल तर हे दोन महिने प्रत्येक वीक एंडला थॉमस ट्रेन च्या राईड्स सुरु आहेत. ग्रेप वाईन डाऊन टाऊन मध्ये. राईड्स संपल्या कि कार्निव्हल वगैरे पण आहे. तिकिट दर साधारण १८ डॉ पासून २४ डॉ पर्यंत आहे.
आम्ही गेल्या आठवड्यात
आम्ही गेल्या आठवड्यात ग्लोबट्रॉटर्स शो बघितला. बास्केटबॉल गेम + थोडी कॉमेडी असा शो आहे. ८+, ५+ आणि ३+ अशा वयोगटातली मुलं सोबत होती. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. विनोद लहान मुलांना आवडतील असे (including but not limited to potty jokes :फिदी:) आहेत. सगळी मुलं जे पोट धरधरून हसतात, ते बघूनच आपल्याला मजा येते
http://www.harlemglobetrotters.com/full-schedule?country=us
मी मागे या धाग्यावर आणि
मी मागे या धाग्यावर आणि रंगिबेरंगीवर ज्याबद्दल लिहिलं होतं तो हॉलिडे ट्रेन शो यंदा पण आला आहे बॉटनिकल गार्डनमध्ये. ट्रेन्स आवडत असतील मुलांना तर नक्की घेऊन जा.
https://www.blueman.com/
https://www.blueman.com/ म्युझिक, टेक्नॉलॉजी आणि सिली ट्रिक्स अस कॉम्बिनेशन असलेला शो आहे. आम्हाला आणि आमच्या पोर्याला भयंकर आवडला.
या शनवारपासून पुढच्या
या शनवारपासून पुढच्या रविवारपर्यंत फिलाडेल्फिया कंव्हेन्शन सेंटरमधे ऑटो शो आहे . वेळा, तिकिटांचे दर आणि कुठल्या कुठल्या गाड्या बघायला मिळतील हे सर्व खालील दुव्यावर.
http://www.phillyautoshow.com/