एक "जिप्सी" आहे माझ्या खोल मनात दडून...

Submitted by जिप्सी on 30 December, 2013 - 02:25

आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है....

नविन वर्ष आता उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे आणि सरत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आली आहे. गेल्या वर्षीच्या माझ्या केला ईशारा जाता जाता... या धाग्याप्रमाणेच याही वर्षीच्या भटकंतीच्या आठवणींचा हा कोलाज. "केला ईशारा...." च्या भागात बर्‍याच मायबोलीकरांनी दिलेले आशिर्वाद/शुभेच्छा या वर्षी प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी जरा "खासच" गेलं. ;-). यंदाच्या वर्षी जरी १२ महिने १२ जागेची भटकंती जरी झाली नसली तरी संपूर्ण वर्षात १२ पेक्षा नक्कीच जास्त जागी फिरलो. Happy

यावर्षी मालवण, वेंगुर्ला, मुंबई फोटो टुर, नांदुर माधमेश्वर, गोंदेश्वर मंदिर, मायबोलीकरांसोबत केलेला मढे घाट ते शिवथर घळ ट्रेक, मुळशी ताम्हिणी परीसर, पंढरीची वारी (पुणे), ड्रिम ट्रिप "लेह लडाख", पुन्हा एकदा भंडारदरा, बिनीचा किल्ला उर्फ किल्ले रोहिडा, पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड, उदयपुर, चित्तोडगड, जयपुर अशी राजस्थान सफर या सर्व आठवणींचा हा कॅलिडोस्कोप तुमच्यासाठी नविन वर्षाच्या शुभेच्छांसहित.

=======================================================================
=======================================================================

समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

=======================================================================
=======================================================================
जानेवारी

मालवणमय
फेब्रुवारी

गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)
मार्च

नांदुर माधमेश्वर, शिवडी/ऐरोली खाडी
एप्रिल

ये है मुंबई मेरी जान
मे

किल्ले रोहिडा
जुन

मुळशी ताम्हिणी भटकंती
जुलै

दिंडी चालली चालली....
ऑगस्ट

मायबोलीकरांसोबत भटक्यांचा सह्यमेळावा - मढे घाट ते शिवथरघळ
सप्टेंबर

ड्रिम ट्रिप "लेह लडाख" - दि ब्रोकन मूनलँड
ऑक्टोबर

एक ऋतु हिरवा झाला - भंडारदरा
नोव्हेंबर

एका लग्नाची गोष्ट Happy
पधारो म्हारे देस....राजस्थान
डिसेंबर

सोनसळी पट्टा अर्थात किल्ले विश्रामगड

यावर्षी भटकंती थोडी कमीच झाली Wink येणार्‍या वर्षात याची कसर नक्कीच भरून काढणार. आत्ता सोबतही आहेच म्हणा, भटकायला. Wink

हे सारं काहि तुमच्यासमोर मांडताना नकळत मंगेश पाडगावकरांच्या ओळी ओठावर आल्या........

यावर्षीचे हे शेवटचे फोटोफिचर. पुढच्या वर्षी भेटुया नवीन थीमसहित.

पुन्हा एकदा सर्वांना नुतन वर्षाच्या मनापासुन शुभेच्छा!!!!

<

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच रे Happy मस्त आढावा घेतलायस. हे वर्ष उत्तमच गेलयं तुझ्यासाठी. पुढचं वर्ष याही पेक्षा सुंदर जावो आणि तुला भरभरून क्लिकायला मिळो आणी आम्हाला 'लायकायला' Wink

hats off u jipsi.............

superbbbbbbbbbbbbbbbb ones again.

पुढच्या वर्षीची थीम आत्ताच ठरवून ठेव >> अश्वे थोडा विचार केलास तर तुझ्याही लक्षात येइल थीम Wink

काय जिप्स्या बरोबर ना. Proud

जिप्सी , खोल मनात दडलेला वगैरे कुठला रे तू तर मूर्तीमंत जिप्सी आहेस ! तुझ्या प्रचिंमुळे खूप नेत्रसुख मिळतं आम्हाला. बाकी पुढल्या वर्षाबाबत अमेयशी सहमत. शुभेच्छा.

मस्त फेरफटका! Happy

पुढच्या वर्षीची थीम आत्ताच ठरवून ठेव >> अश्वे थोडा विचार केलास तर तुझ्याही लक्षात येइल थीम >>>>>>.हा हा. मी हेच लिहीणार होते. Wink Lol

जिप्स्या....अरे अत्यंत महत्वाचाच फोटो राहीला की रे बाबा....

बाकी पुढच्या वर्षी काही 'गोंडस' थीम 'घडू' दे ही शुभेच्छा

आवरा अरे....काय घाई लोकांनाच :प Happy

अरे आशु.................... मी लग्नाचा फोटोबद्दल बोललो........जे घडले आहे Wink

ती पण एक खास आठवण आहे ना

महत्वाचा फोटो राहिला रे ... >> +१००

पुढच्या वर्षीची थीम आत्ताच ठरवून ठेव >> थोडा विचार केलास तर तुझ्याही लक्षात येइल थीम >> +१००

दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्या लाटा …
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

>> +१००००

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
महत्वाचा फोटो राहिला रे>>>>>महत्वाचा फोटो "एका लग्नाची गोष्ट" नोव्हेंबर महिन्यात अ‍ॅड केलाय. Happy

आवरा अरे....काय घाई लोकांनाच>>>>>हो ना Happy

पुढच्या वर्षीची थीम आत्ताच ठरवून ठेव >> थोडा विचार केलास तर तुझ्याही लक्षात येइल थीम >> +१००
+ १००

गुर्जी...... या सगळ्या फोटोंसाठी दंडवत, आणी पुढच्या वर्षी येणार्या थीमची वाट पहातोय हं आम्ही!

Pages