Submitted by तृप्ती आवटी on 26 December, 2013 - 20:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी अळीव, २ वाट्या किसलेला गूळ, २ वाट्या नारळाचा चव
क्रमवार पाककृती:
अळीव मंद आचेवर भाजून घ्यावेत. छान खमंग वास सुटतो आणि हलकासा रंग बदलतो. जरासे कोमट झाले की एका कढईत अर्धे अळीव पसरून त्यावर अर्ध्या नारळाचा थर लावावा. नारळावर अर्ध्या गुळाचा थर लावावा. त्यावर आधीच्याच क्रमाने आणखी एक एक थर लावून घ्यावा. झाकण घालून मंsssssद आचेवर शिजवायला ठेवावे. गूळ वितळला की एकदा हलवून घ्यावे. अळीव शिजलेत असे वाटले की झाकण काढून हलवत राहावे. मिश्रण लाडू वळण्यासारखे झाले की आच बंद करावी.
वाढणी/प्रमाण:
मध्यम आकाराचे १०-१२ लाडू
अधिक टिपा:
_अळीव भाजून घेतल्याने छान खमंग लाडू होतात.
_मायबोलीवर अळीव भाजून घेऊन करायची कृती सापडली नाही म्हणून ही दिली आहे.
_या आधी इथे आलेल्या कृती: http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115677.html?1158036653
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त मस्त मला अळिवाचे लाडू
मस्त मस्त
मला अळिवाचे लाडू खूप आवडतात. थंडीत तब्येतीला छान असतात.
म्हणूनच केलेत
म्हणूनच केलेत
वा, आवडतात खायला. काय म्हणतात
वा, आवडतात खायला. काय म्हणतात अळीवाला इंग्लिशमध्ये?
नवीन मायबोलीवर ह्या लाडवाची कृती नव्हती?
काही ठिकाणी वॉटरक्रेस सीड्स
काही ठिकाणी वॉटरक्रेस सीड्स असं नाव वाचलं.
सायो, मी शोधली. मला तरी अळीव
सायो, मी शोधली. मला तरी अळीव आणि हळीव नावाने एक मेधाची 'नावात काय आहे' आणि जुन्या मायबोलीतली ही वर दिली आहे या दोनच मिळाल्या.
वा मस्तच. माझ्या नणंदेच्या
वा मस्तच. माझ्या नणंदेच्या सासूबाई असेच तुळशीच्या बीचे उपासाचे लाडू करत.
करून बघण्याचे चान्सेस शून्य
करून बघण्याचे चान्सेस शून्य असले तरी मला ही पाककृती फारच वेगळ्या कारणांसाठी आवडली.
नागपुरी भाषेत सांगायचं तर, "अवं माय वं! ह्ये रेश्पी वाच्ली अन् अस्सा खकाना झाला त्यायच्या अंगाचा, का हिकडल्या तिकडल्या बाफावर लिहू लिहू बोंबले!"
मृण,
मृण,
भारी आहे नागपुरी
भारी आहे नागपुरी