"काय चाललय काय?"
"साहेब पण..."
"चुप... एकदम चुप..."
".........."
"निवडणुका आल्या, लोकं तोंडात शेण घालतील ना..."
"हो? पण दादा, ते कधी ठरलं........"
"अबे xxxx ती म्हण आहे, पण तुमच्यासारखे डुकरं असतील ना सोबत, तर तेही होईल असं दिसतय"
"दादा... आता मला काय माहित, तो वेळेवर गडबड करेल म्हणुन..."
"मुर्खा, xxxxxx शाई ओतायची कशी हे ही समजत नाही का त्या बह्याडाले"
"दादा, फस्ट टाईम होता ना..."
"मग काय प्रॅक्टिस करायला पाहिजे होती का?"
"दादा, तो घेंगल्या निघाला...."
"अबे शाईची बॉटल आधीच फोडुन नाही ठेवायची का? तो तिथं फोडुन राह्यला..."
"ते चुकलच...."
"अन ते बुटवाल्याचं काय?"
"तिथं सुर्यवंशी साहेब होते.... सगळ्या पत्रकाराले बुटं, चपला काढायला लावल्या ना..."
"एक काम करता येत नाही..... तुमच्यासारखे लोकं विरोधी पक्षात पाहिजे होते...."
"दादाsssssss.........."
"आता काय झालं बे?"
"भारी आयडीया.... उद्याच्या पेप्रात आमचा पक्षबदल छापुन आणतो..."
"बस कर बे... ते तुमच्याकतके गधे नाही, जा जरा थंड आण..."
"वाईन आणू का?"
"कोणं सांगीतलं बे ? ते फक्त बाहेरचे पाव्हणे आले की आणायची... जा आपली चपटी घेउन ये... अन हो .... आणुन ठेव अन इथुन फुट.... डोकं खाउन राह्यला फुकटचा........."
"दादा......"
"आता काय?"
"सोडा व्हाईट आणू का ब्लॅक......."
"अबे xxxxxx...... आता तुले चपलेनच हाणतो..........."
******************************************