जरा गोड बोलू जरासे हसू

Submitted by Prashant Pore on 15 December, 2013 - 03:49

अटळ दुःख हे; आसवे या पुसू
जरा गोड बोलू जरासे हसू

किती क्षीण झाली बघा काळजी
तिच्याही जरासे उशाशी बसू

असा वेदनेचा जिव्हाळा जिवा
तिला टाळता लागते हे रुसू

सख्या घे जगूनी जसे पाहिजे
उद्या ना भरोसा असू वा नसू

कसे यार सारे मिळाले असे
पहाडापरी कोण; कोणी तसू

मला शब्द हे वाटती लेकरे
कुणा जोजवू मी कुणा खेकसू?

शहर बेगडी हे नको वाटते
चला गावच्या त्या जमीनी कसू

जसा भृंग भेटे फुलाला कुणी
तसे लागते ते निराळे दिसू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती क्षीण झाली बघा काळजी
तिच्याही जरासे उशाशी बसू

शहर बेगडी हे नको वाटते
चला गावच्या त्या जमीनी कसू

...हे २ अधिक आवडले

अनेक खयाल प्रॉमिसिंग आहेत. अनावश्यक शेर टाळण्याकडे लक्ष द्यावे असे वाटते.

फार चांगले पोटेन्शियल असलेला गझलकार इन मेकिंग......कीप इट अप प्रशांत.

मला शब्द हे वाटती लेकरे
कुणा जोजवू मी कुणा खेकसू?

जसा भृंग भेटे फुलाला कुणी
तसे लागते ते निराळे दिसू >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.

अटळ दुःख हे; आसवे या पुसू
जरा गोड बोलू जरासे हसू

किती क्षीण झाली बघा काळजी
तिच्याही जरासे उशाशी बसू

व्वा. आश्वासक.

किती क्षीण झाली बघा काळजी
तिच्याही जरासे उशाशी बसू

शहर बेगडी हे नको वाटते
चला गावच्या त्या जमीनी कसू

जसा भृंग भेटे फुलाला कुणी
तसे लागते ते निराळे दिसू >> वा वा, खूप आवडले हे शेर.

सुंदर