गेल्या काही दिवसात माबोकर भटक्यांशी झालेल्या चर्चेतून एक गोष्ट ध्यानात आली की सह्याद्रीमधल्या किल्ल्यांचा एक सर्वंकष असा डाटाबेस बनवणे गरजेचे आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या या चर्चेचे फलीत म्हणजे हा बाफ आहे.
यात टप्प्याटप्प्याने सह्याद्रीतले सर्व किल्ले समाविष्ट करण्यात येतील.
सुरुवात पुणे विभागापासून....
ज्यांना कुणाला हे किल्ले करण्यात रस असेल त्यांनी इथेच त्यासंदर्भात प्रश्न विचारावेत जेणे करून एक उत्तम संदर्भ निर्माण होईल.
जु्न्नर विभाग
१. शिवनेरी आणि जुन्नर किल्ला
२. नारायणगड
३. हडसर
४. निमगिरी
५. सिंदोळा
६. चावंड
७. जीवधन
८. दुर्ग (आणि धाकोबा शिखर)
यापूर्वी इथल्या किल्ल्यांवर माबोकरांनी दिलेली माहीती
दुर्ग: किल्ले शिवनेरी
http://www.maayboli.com/node/39195
जीवधन ते नाणेघाट : शेवट उन्हाळी भटकंतीचा
http://www.maayboli.com/node/43469
हडसर - निमगिरी
http://www.maayboli.com/
नाणेघाट
http://www.maayboli.com/node/40605
सह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम अहुपे व्हाया हातवीज
http://www.maayboli.com/node/31733
सिंदोळा !
http://www.maayboli.com/node/29578
नाणेघाट - नानाचा अंगठा ... !
http://www.maayboli.com/node/18801
निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !
http://www.maayboli.com/node/18872
दुर्ग आणि ढाकोबा... सह्यकड्याचे पहारेकरी
http://www.maayboli.com/node/13213
==============================================================
मुळशी विभाग
९. तुंग
१०. तिकोना
११. लोहगड
१२. विसापूर
१३. राजमाची
१४. कोरीगड उर्फ कोराईगड
१५. घनगड
१६. तेलबैला
१८. अनघाई किल्ला
१९. मोरवी उर्फ मोरगिरी
एका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’
http://www.maayboli.com/node/40197
आडरात्री नाळेच्या वाटेने विसापूर
http://www.maayboli.com/node/35351
धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...
http://www.maayboli.com/node/30751
धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला...
http://www.maayboli.com/node/14254
तीन कोनांची टोपी चढविलेला.... तिकोना
http://www.maayboli.com/node/24351
'तुंग किल्ला' (कठीणगड)
http://www.maayboli.com/node/21508
गिरिकुहरांमधील भैरव-ढाक बहिरी
http://www.maayboli.com/node/21587
पवनाकाठचा तिकोना ...
http://www.maayboli.com/node/20700
ढाक-भैरी ते राजमाची ... !
http://www.maayboli.com/node/22705
तेलबैला : 'क्लायंबिंग- व्हॅली क्रॉसिंग- रॅपलींग'
http://www.maayboli.com/node/13020
घनसुधा बरसे..
http://www.maayboli.com/node/17802
पवनामाळेचा राखणदार वितंडगड ऊर्फ किल्ले तिकोना
http://www.maayboli.com/node/15114
किल्ले विसापुर
http://www.maayboli.com/node/14782
ढाक बहिरी - अवघड झाले सुघड
http://www.maayboli.com/node/16287
घनगड आणि तेलबैला
http://www.maayboli.com/node/38786
घनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड
http://www.maayboli.com/node/16326
=======================================================
वेल्हा विभाग
२०. राजगड
२१. तोरणा उर्फ प्रचंडगड
सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
http://www.maayboli.com/node/21940
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !
http://www.maayboli.com/node/21952
सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... !
http://www.maayboli.com/node/21977
राजगड - बस नाम ही काफी है
http://www.maayboli.com/node/42956
गडांचा राजा, राजियांचा गड "राजगड"
http://www.maayboli.com/node/17692
राजगड - शोध सह्याद्रीतून ....२६/२७- २०१३
http://www.maayboli.com/node/40625
‘तोरण्या’चं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...
http://www.maayboli.com/node/41246
राजगड - दुर्ग रचना...
http://www.maayboli.com/node/34035
राजगड-एक वास्तुवैभव
http://www.maayboli.com/node/24846
राजगड... गुंजवणे दरवाज्याने
http://www.maayboli.com/node/14312
राजगड-तोरणा
http://www.maayboli.com/node/25973
=========================================================
सासवड विभाग
२२. पुरंदर आणि वज्रगड
२३. दौलतमंगळ
२४. मल्हारगड उर्फ सोनोरी
मी मल्हारगड बोलतोय....
http://www.maayboli.com/node/40871
==========================================================
भोर विभाग
२५. रोहीडा उर्फ विचित्रगड
रायरेश्वर पठार
लोणावळा विभाग
२६. राजमाची
हवेली विभाग
२७. सिंहगड
खेड विभाग
२८. चाकण उर्फ संग्रामदुर्ग
२९. इंदुरीचा भुईकोट किल्ला
३०. भोरगिरी
मायबोलीकर कॉँप्युटर ओंकार ओक उर्फ सह्याद्रीमित्र यांनी पुण्यातून कोकणात उतरणार्या घाटवाटांची पण माहीती दिली आहे.
पुण्यातून ठाणे जिल्ह्यात उतरणार्या वाटा
१. नाणेघाट (घाटघर ते वैशाखरे)
२. भोरांड्याचे दार (अंजनावळे ते मोरोशी)
३. दार्या उर्फ अंबोली घाट (अंबोली-पळू ते सिंगापूर)
४. खुटेधार (दुर्गवाडी ते रामपूर)
५. पोशिशी नाळ (दुर्गवाडी ते सिंगापूर)
६. त्रिगुणधारा उर्फ तिरंगी धार उर्फ डोणी दार (दुर्गवाडी ते सिंगापूर)
७. मदाची वाट (दुर्गवाडी ते सिंगापूर)
८. आहुपे (आहुपे ते खोपोवली)
फारच छान उपक्रम हाती घेतला
फारच छान उपक्रम हाती घेतला आहेस आशु. शुभेच्छा!
शुभेच्छा
शुभेच्छा
अरेरे,, या लिस्टवरुन 'बरेच
अरेरे,, या लिस्टवरुन 'बरेच करायचे राहीलेत' म्हणून चुकचुकायला होतेय !! बाकी मस्तच उपक्रम !
मस्तच की...
मस्तच की...
डेटाबेसमध्ये काय अपेक्षित आहे
डेटाबेसमध्ये काय अपेक्षित आहे ? नकाशे आणि ऐतिहासिक माहिती ?
पुण्याहून निघणाऱ्यांसाठी बहूतेक असावे .
मुंबईसाठी (मालाड ,बोरिवली आणि ठाणे डोंबिवलीसाठी )जाण्याची माहिती किंचिँत वाढवणार का ?
काही किल्ले 'करायचे' आहेत .
एसआर्डी - ऐतिहासिक माहीती
एसआर्डी - ऐतिहासिक माहीती नाही पण नकाशे आणि अन्य माहिती देण्याचा प्रयत्न राहील.
मुंबईवरून येणार्यांसाठी माहीती गोळा करण्याचे काम सुरु आहे. लवकरच ते इथे उपलब्ध केले जाईल.
तुम्हाला काही विशिष्ट माहीती हवी असेल तर ती पण इथेच विचारा म्हणजे बाकीच्यांना पण माहीती होईल.
मस्तच कल्पना आहे. यातही
मस्तच कल्पना आहे.
यातही जमल्यास प्रत्येक किल्ल्यावर्/विभागावर स्वतंत्र धागा काढता येईल आणि वरती नावांमधे लिंक्स अॅड करता येतील. म्हणजे इथे खूप शोधाशोध करायला लागेल तसं नको
वरदा अनुमोदन... यातल्या अनेक
वरदा अनुमोदन...
यातल्या अनेक किल्ल्यांवर किती लिहू असे वाटते. त्यामुळे सगळीकडे भरकटण्यापेक्षा एकाच धाग्यावर सगळी माहीती गोळा करता येईल. त्यातही मी आत्तापर्यंत या किल्ल्यांवर प्रकाशित झालेले धागे एकत्र करून त्याची लींक इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे.
तुला एखादा फॉर्मॅट करता येईल
तुला एखादा फॉर्मॅट करता येईल का प्रत्येक किल्ल्यासाठी. म्हणजे एक चांगला डेटाबेस तयार होईल
उदा:
लोकेशन (तालुका, जिल्हा, अक्षांश-रेखांश, इ.)
रस्ता (कसं जायचं)
नकाशा
ऐतिहासिक माहिती
भौगोलिक माहिती
आसपास आणखी काय पहाण्यासारखं आहे
खादाडीची सोय
चढाईबद्दल माहिती, टिप्स, अनुभव, इ.
याआधी आलेले धागे, इ, इ, इ
आधी आलेले धागे शोधून शोधून
आधी आलेले धागे शोधून शोधून टाकण्यात आले आहे. काही धागे ज्यात फक्त फोटो किंवा नुसतेच वर्णन आहे असे काही वगळण्यात आले आहेत. तरीसुद्धी कुणाला रिक्षा चालवायची असेल तर खुशाल इथे चालवू शकता. :प
आशू: कल्पना छान आहे. शंकाच
आशू: कल्पना छान आहे. शंकाच नाही.
अवघ्या सह्याद्रीच्या दुर्ग-लेणी-धबधबे-मंदिरे-घाटवाटा असे data points गोळा झाले, तर मदत नक्की होणार!!!
(माहितीच्या Versioning/ updates साठी बाफ हा मार्ग थोडा गैरसोयीचा असू शकेल.)
सह्याद्रीमधल्या किल्ल्यांचा
सह्याद्रीमधल्या किल्ल्यांचा एक सर्वंकष असा डाटाबेस बनवणे गरजेचे आहे >>> सह्याद्रीवर अनेक पुस्तकं आहेत भटक्यांची. निदान तीन पुस्तकात तरी मी पूर्ण डेटाबेस पाहिला आहे. . इनफॅक्ट वरदा वर जे काही लिहितीये (माहिती अशी हवी) ते त्या पुस्तकात ऑलरेडी आहे
तो ऑनलाईन डेटाबेस नाही पण त्या लेखकांना कनेक्ट होऊन त्या पुस्तकाचे ऑनलाईनीकरण केले की तो ही होईल असे वाटते. ( रादर इटस अ न्यू अॅव्हेन्यू फॉर मायबोली - पुस्तकांचे संगणकीकरण) अगदी डिटेल माहिती मी तश्या पुस्तकात वाचली आहे. पण नेमके लेखकाचे नाव लक्षात येत नाही,
जस्ट फुड फॉर थॉट.
केदार पुस्तकात आणि इथल्या
केदार पुस्तकात आणि इथल्या डाटाबेसमध्ये फरक असा आहे की इथे आपण प्रचंडच विस्तृत प्रमाणात माहीती देऊ शकतो. आणि वेळोवेळी ती अपडेटही करू शकतो. (जसे की गाड्यांच्या बदलेल्या वेळा, नविन रस्ते, संपर्क इ. इ.)
त्यामुळे एक ऑनलाईन डाटाबेस हा कधीही जास्त उपयुक्त ठरतो.
ऐतिहासिक नकोच कारण त्याच्याशी
ऐतिहासिक नकोच कारण त्याच्याशी संबंध जोडणाऱ्या गोष्टी फारच थोड्या गडांवर राहिल्या आहेत .
नकाशे गुगलचे नकोत ,
रेखाचित्रे आणि मोठ्या गावापासूनचा मार्ग हवा .
बसचे वेळापत्रक हे वारंवार
नवीन ठेवले पाहिजे आणि शेवटी कधी तपासले ती
तारीख (last updated on
. .) ,
उदा :तैलबैलासाठी लोणावळा/स्वारगेट कडून
भांबुर्डे बसची वेळ . पावसाळ्यात बंद असते का ?
पुरंदरला ,कोरीगडला ,वासोट्याला जाण्यासाठी कुठे परवानगी काढावी लागते .हे पाहिजे .
बरेच गट वाहन भाडयाने ठरवतात .
त्यांच्यासाठी आणि
बाईकसवाल्यांचा पल्ला
जास्ती असतो त्यांच्या गरजाही
(पेट्रोल पंपस ,
दुरूस्ती वगैरे )
वेगऴया आहेत .
एसआर्डी - चांगल्या सूचना
एसआर्डी - चांगल्या सूचना आहेत. सगळ्यांनी जर आपापला शेअर दिला तर लवकरच चांगली माहीती इथे जमा होईल.
हे एकट्याचे काम नाही.
तिथल्या स्थानिक वाटाड्यांची
तिथल्या स्थानिक वाटाड्यांची नावे, असल्यास मोबाईल नंबर अवश्य द्या. त्यांच्याशी आधी संपर्क करता आला तर त्यांनाही सोयीचे. ( अर्थात त्यांच्या परवानगीने )
त्यांना जर काही वस्तू हव्या असतील ( भांडी, ताटे, औषधे, पुस्तके वगैरे ) तर आधी विचारून नेता येईल.
हो. मी ही ऑनलाईन हवा असेच
हो. मी ही ऑनलाईन हवा असेच लिहित आहे. पण वेगळ्या अँगल मधून. असो.
मस्त आशु ..
मस्त आशु ..
नमस्कार मित्रहो… मी मायबोलीचा
नमस्कार मित्रहो…
मी मायबोलीचा नवीनच सदस्य आहे.
सह्याद्रीतील किल्ल्यांचा डाटाबेस बनविण्याचा उपक्रम खूपच छान आहे.
लै भारी ………...
आशुचॅम्प, मी आणि नचिने एकत्र
आशुचॅम्प, मी आणि नचिने एकत्र केलेल्या ट्रेक्सच्या एक्सेल फाईलमधे आम्ही राहिलो त्यांचे नाव पत्ता फोन नं, रुट, मदतीसाठीच्या सर्वांचे फोन नं., मुंबईहून बस/वाहन बुक केले त्या सर्वांचे नाव नंबर इ. डेटा आहे. तो तुला तो/मी इमेल करुन पाठवू शकू. फक्त थोडा वेळ लागेल, कारण त्या फाईल्स वर पार्टिसिपेन्टसची माहिती पण आहे. थोडं एडिटींग वगैरे करुन मग पाठवता येईल.
पुस्तकांमधे, सांगाती सह्याद्रीचा हे पुस्तक खूप मस्त आहे. पण सध्या ते आउट ऑफ प्रिंट आहे. माझ्याकडे त्याची एक कॉपी आहे.
आशुचँप:- प्रथम तुमचे अभिनंदन.
आशुचँप:- प्रथम तुमचे अभिनंदन. फारच मस्त कल्पना आहे, आणि नुसती मस्त नाही तर गरजेची सुद्धा आहे. कारण नवीन आणि जुन्या ट्रेकर्स लोकांनासुद्धा फार उपयोगाची पडेल.
एक सूचना करावीशी वाटते, १) जो ट्रेक करायचा आहे, त्या ट्रेक करिता जवळचे मुख्य ठिकाण कोणते
उदा.:- पुणे, नासिक, ठाणे--- इत्यादि. व तेथून कसे जायचे उदा.:- केंजळगड करिता - पुणे - भोर - कोर्ले असे.
२) तसेच एखाद्या ट्रेकला दूसरा कोणता ट्रेक जोडता येईल. त्यामुळे जर जास्त दिवस हातात असतील तर पुढचा एखादा ट्रेक त्याला जोडता येईल.
मी मायबोलीचा फार पुर्वीपासून वाचक आहे, परंतु सभासद आत्ता झालो आहे. आणि नवीन असूनसुद्धा सूचना करत आहे त्यामुळे नाराज होऊ नये.
स्वागत या उपक्रमाचे - तुझ्या
स्वागत या उपक्रमाचे -
तुझ्या सायकल बाबत लिखाणामुळे प्रेरणा मिळाली आजच सायकल घेवून आलोय ३/७ ची , (आतापर्येंत दूधवाला सायकल चालवित होतो.)
आता इथून भरपूर माहिती गोळा होईल आणि जवळपासचे गड तरी नक्कीच सर होतील .
धन्यवाद
निसर्गयात्री - राग कसला...उलट
निसर्गयात्री - राग कसला...उलट जास्तीत जास्त सूचना याव्यात अशीच अपेक्षा आहे. जेणेकरून सर्वांना उपयुक्त असा डाटाबेस तयार होणार आहे.
तुमची सूचना चांगली आहे. थोडे काम करावे लागेल त्यावर..
किरणकुमार - तुमचे डबल अभिनंदन....सायकल घेण्याचा निर्णय तर फारच छान...त्या धाग्यावर कुठली सायकल घेतली, घेताना काय अनुभव आला हे शेअर करणार का...बाकीच्यांना पण ते वाचून हुरुप येईल.
मलाही काही अपडेट्स असतील तर कळतील..
खुपच उपयुक्त उपक्रम.
खुपच उपयुक्त उपक्रम. इंटरेस्टिंग काम हाती घेतलंयस, तुझं कौतुक वाटतंय.
रायरेश्वर आणि केंजळगड असा
रायरेश्वर आणि केंजळगड असा जोडून ट्रेक करायचा असल्यास तिथे राहण्या-खाण्याची सोय करण्यासाठी लागणारा कॉ. नं. देऊ शकेन.
तसंच तिकोना वर पण.
रच्याकने, कोणाकडे द्यायची आहे हि सगळी माहिती ??
आशु मस्त रे.. चांगला उपक्रम..
आशु मस्त रे.. चांगला उपक्रम.. शुभेच्छा!!