Submitted by मी मी on 7 December, 2013 - 08:49
हल्ली मी लिहित नाही तुझ्यावर काही
उल्लेख तुझा ... हवाय कशाला ??
पूर्वी असायचा कवितेतल्या प्रत्येक ओळीत
शब्दा शब्दा मागे छुप्या भावनेच्या खोलात
अलगद हसून केलेला तुझा उल्लेख …
पण तेव्हा त्या ओळीत असूनही कुठे असायचास तू ….??
अन आज कुठेच नसतोस … तरीही असतोच ना?
उर्दू गझलेच्या काही शब्दांचे अर्थ संदर्भातून शोधावे लागावे
नाहीच मिळाले तर जुळवून घ्यावा अर्थ लागतो तसा
तसेच काहीसे …
तसेच काहीसे …
तुझ्या असण्याचे अन नसण्याचे संदर्भ
शोधूनही लागत नाही हल्ली…
संवेदना जाणवत राहतात …. फक्त
अन त्या संवेदनांचा न लागलेला अर्थ
शोधत राहते मग … प्रत्येक ओळीत
आणि म्हणूनच …
जाणून असणार्या या संवेदनांचा
उल्लेख करायचे सोडून दिलेय मी
हल्ली मी लिहित नाही तुझ्यावर काही …
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
मला आवडलं!
मला आवडलं!
Malahi...
Malahi...
मयी, मस्तच जमलय. आवडलंच.
मयी, मस्तच जमलय. आवडलंच.
Thaaanku
Thaaanku