आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला (तरही)

Submitted by इस्रो on 7 December, 2013 - 00:34

जमली गझल लिहाया आनंद खास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

आरोप खूप झाले पण न्याय मज मिळाला
सत्यास मरण नाही तेव्हाच भास झाला

ललनेस पाहता त्या ओठात गीत आले-
(ती पाहताच बाला कलिजा खलास झाला)

लवल्या फुलास बघता मज वाटले जणू की
हा भार का दवाचा इवल्या फुलास झाला

राधा अता कुठे ती! तो श्यामही दिसेना
दोघांविना अता हा पावा उदास झाला

होते तयार खांदे मज न्यावया कधीचे
मी ठीकठाक दिसता सार्‍यास त्रास झाला

नाहिद नालबंद
[९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लवल्या फुलास बघता मज वाटले जणू की
हा भार का दवाचा इवल्या फुलास झाला

राधा अता कुठे ती! तो श्यामही दिसेना
दोघांविना अता हा पावा उदास झाला

होते तयार खांदे मज न्यावया कधीचे
मी ठीकठाक दिसता सार्‍यास त्रास झाला>>>> आवडले.

>>>
होते तयार खांदे मज न्यावया कधीचे
मी ठीकठाक दिसता सार्‍यास त्रास झाला>>>>
!!!

मस्तच!

मक्ता सर्वात विशेष वाटला.>>>

उल्हासजी,

आपुलकीपोटी एक दुरूस्ती करतो..

ज्या शेरात शायराने त्याचे तखल्लुस गुंफलेले असते केवळ अशाच शेराला 'मक्ता' असे म्हणतात. उरलेल्यांना शेवटचा शेर असे म्हणायची पद्धत आहे.

कृगैन.

ज्या शेरात शायराने त्याचे तखल्लुस गुंफलेले असते केवळ अशाच शेराला 'मक्ता' असे म्हणतात. उरलेल्यांना शेवटचा शेर असे म्हणायची पद्धत आहे. >>> धन्यवाद विजय. तखल्लुस असेल तरच शेवटच्या शेराला मक्ता
म्हणतात हे ठाऊक नव्हते, आज तुमच्याकडून समजले. गैरसमज कशाला होईल ? उलट तुमच्यासारख्या
जाणकार मित्रांनी ज्ञानात भर टाकली तर आनंदच वाटतो. पुन्हा धन्यवाद.

मी माझा वरील प्रतिसाद संपादित करत नाही.
इथेच त्यातला बदल लिहितो :
शेवटचा शेर सर्वात विशेष वाटला.