सचिन रमेश तेंडुलकर. नुसत्या नावाने अंगावर अभिमानाचे रोमांच उठतात असा तो सचिन, सच्या, सच्यू,तेंडल्या,मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, रन मशिन, बॉलर्सचा कर्दनकाळ, शतकांचा बादशाह, क्रिकेट बुक, आणि असे कितीतरी नावे व विशेषने असणारा हा महामाणव आमच्या महाराष्ट्रात जन्मावा हे आमच भाग्यच.
क्रिकेट विश्वात आपल्या असामान्य खेळ प्रतिभेने व अथक परीश्रमाने क्रिकेटजगतावर निर्विवाद अधिराज्य गाजवनारा हा महान क्रिकेटपटू आज जेव्हा आपली शेवटची ७४ धावांची तुफानी खेळी करून परतला, तेव्हा, हा सचिन आता भारतीय संघात कधीच क्रिकेट खेळतांना दिसनार नाही यावर विश्वास ठेवनं अजुनही जडच जातय. जिथे क्रिकेट हा खेळ नसून एक धर्म मानला जातो, तिथे क्रिकेटच्या या देवाला क्रिकेटपासून दुरावतांना देशातील ११४ कोटी लो़कांना वाईट वाटले नसेल तरच नवल. म्हणून आज दिवभर टेलिव्हिजनवर सचिनमय वातवरण झालेले. आणखी कित्येक दिवस ते असेच राहिल्यास त्यात नवल ते काय!
सचिनला आज महात्मा गांधीच्या बरोबरीने लोकप्रियता मिळतेय. त्याची जी जगात सर्वत्र चर्चा होतेय ही त्याची खेळ क्षमतेमुळेतर आहेच पण, त्याच बरोबर त्यामध्ये जो एक चांगला माणूस आहे त्यामुळे. त्यामध्ये असे काही गुण आहेत कि ज्यांच्यामुळे भारतातील नव्हे तर आज जगातील लोक त्याला आयकॉन म्हनून पाहतात. सचिन अश्यावेळी क्रिकेट स्टार म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये अवतरला जेव्हा भारतात कुठल्याच क्षेत्रात आयकॉन म्हनून गनला जावा असा होरो नव्हता. १९८३ चा वर्डकप सोडलातर भारतीय क्रिकेट म्हणजे हारण्यासाठीचा खेळ समजला जायचा, त्यातही भारताची फलंदाजी म्हणजे कासवगती हे समीकरण ठरलेले. हि परीभाषा बदलली ती सचीनने. सचिनच्या फलंदाजीने नुसते भारतीय क्रिकेटच नाहि तर भारतीयांची माणसिकताही बदलली. दुसर्यांच्या दबावात जगने, भिवून घावरून राहणे, संकुचित दृष्टीकोन ठेवणे या भारतीयांच्या मानशिकतेत तर फरक आलाच पण जगाचा भार्ताकडे पहाण्याचा दृष्टीकोनही बदलला.म्हणजे एखादी विशिष्ट गोस्ट ही कोणत्या विशिष्ट व्यक्तीची वा देशाची मालकी नसते हे सचिनने आपल्या खेळातून दाखवून दिले. यातुन भारताच्या सर्वच क्षेत्रात क्रिंती घडून यायला मदत झाली म्हणने चुकिचे ठरणार नाहे.
आज सचिनच्या एका नावावर सर्व देश एकवटून येतो. अशी ताकत सध्या तरी कुठल्या नावात वा संस्थेत व पक्षात नाही. (अगदी अणा हजारेंनाही ते जमल नाही) म्हनून तर भारतातील १०० मुलांच्या पालकांपैकि २० पालकांना त्याच्या मुलांचे नाव सचिन ठेवन्याचा मोह आवरला नाही. सचिन राक्षसाप्रमाने बॉलर्सना थोकायचा, तसा चुकिची विकेट दिली तरी न कुरकुरता परत यायचा. म्हणून तो लोकांना भावला.
टिचभर यशाने हुरळून जावून अनेक वादात सापडून जितक्या वेगाने वर गेले तितक्याच वेगाने खाली येणारांची संख्या भारतात कमी नाही. पण गेली २४ वर्ष अविरत यशाच्या शिखरावर विराजमान राहूनदेखील कुठल्याही वादात न सापडनारा सचिन तसा एकमेव म्हणून तो लोकांना तो हिरो वाटला. जिथे एखाद्या दुखापतिने त्रासून माणूस आपले करिअर सोडून देतो, तिथे टेनिस एल्बो सारख्या अनेक दुखापती पचवून २४ वर्ष क्रिकेटची सेवा करनारा सचिन हिरोसारखाच वाटतो. सुईअएव्हढ्या दुखा:ला डोंगराएव्हढे करून सांगणार्या या जगात स्वताच्या वडिलांच्या निधनाचे दुखः विसरून देशासाठी शतक ठोकून देश्याची शान राखणारा सचिन हा भारताच्या कुनाचाही हिरो असणाराच. आज कुणाला १० रू. ची मदत देवून तिची १०० वेळा पब्लिसिटी करणारे सगळीकडेच सापडात, पण करोडो रूपयांची मदद वेगवेगळ्या संस्थाना देवूनहि प्रसिध्दी पासून दूर राहणारा सचिन भारतीय लोकांना देवासारखा नाही देवच वाटनार. आज क्रि़केटची सगळी शिखरे पादाक्रांत करूनही कुठल्याही प्रकारची हवा डोक्यात जाऊद्यायची नाही हे सामान्य माणूस नाही करू शकत ते सचिनलाच जमत. अशा एक ना अनेक कॉलीटीज ज्यामुळे भारतीयच नाही तर जगातले सर्वच क्रिकेटप्रेमी सचिनला क्रिकेटस्टार बरोबरक्रिकेटचा गॉडफादर म्हणतात.
शेवटी मी एव्हच म्हणेल धन्यवाद सचिन तु आम्हाला तुझ्या खेळांने, महागाई, गरीबी, बेरोजगारी, युध्द, भ्रष्टाचार, यापासून वेळोवेळी टेन्शन फ्री केलस आणि अप्रत्यक्षरीत्या त्याच्याविरूध्द लढण्याची ताकदही दिलीस. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे, सगलीकडे जात, धर्म, प्रदेश, दहशतवाद, यासारख्या संकटानी देश जेव्हा जेव्हा गटातटात वाटला जायचा, तेव्हा-तेव्हा तुझ्या खेळीने प्रत्येकाच्या मनात देशप्रेम निर्माण व्हायचे. अन त्याच देशप्रेमाने देश पुन्हा एकवटून जायचा. तुझ्या सारखा खेळाडू आता होणे नाही.
तुझा खेळाचा झंजावात संपतांना पाहिला कि वाटत राजकारणाच्या खेळातही एखादा सचिन असावा ज्यान भारतीय राजकारणाची परीभाषाच बदलून टाकावी आणि सर्वार्थाने प्रगत महासत्ता म्हणून भारताचा उदय व्हावा.
अविनाश खेडकर
बीड, महाराष्ट्र.
अविनाश खेडकर, अजून चांगले
अविनाश खेडकर, अजून चांगले लिहीता येऊ शकेल.
लिहीत रहा.
अविनाश खेडकर, अजून चांगले
अविनाश खेडकर, अजून चांगले लिहीता येऊ शकेल.
लिहीत रहा.>>> सहमत. हे जरा कट्ट्यावर लोक बोलतात तसे वाटले.
शेवटच्या दोन ओळी मात्र आवडल्या.
छान... तेवढं शुद्धलेखनाकडे
छान... तेवढं शुद्धलेखनाकडे लक्ष द्या... वाक्ये छोटी करा.
सचिनच्या अनेक गोष्टी भारावून टाकणाऱ्या आहेत. ही लिंकही तुम्ही पाहू शकता.
https://www.kheliyad.com/2019/11/sachin-tendulkar-records.html