.......आत्ता कळले!!!

Submitted by मी मधुरा on 1 December, 2013 - 03:21

नकळत मी ही गुंतत गेले, आत्ता कळले
तुझ्यात मजला मीच गवसले, आत्ता कळले

अडवत होते मी तर वसुली करणाऱ्यांना,
ते तर होते खाकीवाले, आत्ता कळले...

सोसायला शिकवत होती दु:खे मजला,
सुखानेच होते बिघडवले, आत्ता कळले

संधीचे तर केले होते ज्यांनी सोने,
परिस बनाया होते झिजले, आत्ता कळले

दारोदारी भटकत होते न्यायासाठी,
इमान होते त्यांनी विकले, आत्ता कळले

सवाल केले नियतीला मी किती तऱ्हांनी,
उत्तर हि होते ठरलेले, आत्ता कळले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सवाल केले नियतीला मी किती तऱ्हांनी,
उत्तर हि ठरलेले होते, आत्ता कळले

>> बढिया, मधुरा!!

अलामत मिसिंग आहे. विना-अलामत काफियात मजा येत नाही किंवा कमी मजा येते. अलामत नसल्याचे तुला आत्ता कळले असेल, तर ठीक; माहित असूनही तसेच ठेवले असशील तर नको करत जाऊस तसं. Happy

सुप्रियाजी,

धन्यवाद!!
Happy

रसप,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy

मला अलामत वगैरे डिटेल्स शिकायचेत अजून.
आता सुरवात केलीये गझलेला, तर आता शिकेनच!

अलामत कफियांच्या शेवटच्या अक्षरावर आलेला ए हा स्वर धरावी लागेल असे एकंम्दर गझल वाचून झाल्यावर वाटत आहे
रदीफ छानच पण अत्ता /आत्ता ह्यामधील अत्ता हा शब्द अधिक छान वाटला असता असे माझे वैयक्तिक मत

गझल चांगली आहे

वैभव कुलकर्णी,

धन्यवाद !!

मी गझल अजून जास्त शिकत आहे. 'अत्ता' शब्द खरतर मी वापरणार होते.. पण मात्रा बसल्या नसत्या म्हणून 'आत्ता' शब्द वापरला.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

संधीचे तर केले होते ज्यांनी सोने,
परिस बनाया झिजले होते, आत्ता कळले

सवाल केले नियतीला मी किती तऱ्हांनी,
उत्तर हि ठरलेले होते, आत्ता कळले

हे दोन सर्वात विशेष.

वैभव कुलकर्णी,

होय, पण लिहिताना मात्रेत बसत नव्हत. असो, धन्यवाद!!!

उल्हास भिडे,

धन्यवाद!!!

लिहिताना मात्रेत बसत नव्हत<<< Happy
अहो ..अत्ताच्या-नंतरच्या उच्चारानुसार असे म्हणत नव्हतो मी.. तर "अत्ता" ह्या शब्दाच्या ,... उच्चारानुसार (म्हणजे "अत्" .. "ता" )ह्याच्या मात्रा चारच होतात ...मग त्या आत्ता मोजा किंवा नंतर ....उद्या परवा कधीही मोजा चारच होतात असे मी म्हणत होतो म्हणजे "-त्त्ता" च्या ज्या चार मात्रा होतात म्हणून तुम्ही ते तसे योजले असे जे आपण म्हणालात त्याबद्दल मी बोलत होतो ......की अत्ताच्याही चारच होतात तो का योजला नाहीत तो जास्त छान आहे असे म्हणालो मी

असो एक शेर आठवला (नेहमीप्रमाणे माझाच्चय )

ही भाषा माझी गझलेने बिघडवली
अर्थांचे म्हणणे तसेच नाही मित्रा

Happy

मतला सुरेख …

सोसायला शिकवत होती दु:खे मजला,
सुखानेच होते बिघडवले, आत्ता कळले

सवाल केले नियतीला मी किती तऱ्हांनी,
उत्तर हि ठरलेले होते, आत्ता कळले

हे दोन शेर ही खूप आवडले

नकळत मी ही गुंतत गेले, आत्ता कळले
तुझ्यात मजला मीच गवसले, आत्ता कळले
>>>>>> वा मस्त

सवाल केले नियतीला मी किती तऱ्हांनी,
उत्तर हि ठरलेले होते, आत्ता कळल >>>>>>> सहीच

सुरेख गझल…

सोसायला शिकवत होती दु:खे मजला,
सुखानेच होते बिघडवले, आत्ता कळले

मस्तच…

अलामत नाहीये त्याच्यावर तात्पुरता उपाय म्हणून

सानी मिसर्यात 'तुझ्यात मजला मीच गवसले, आत्ता कळले' ऐवजी 'तुझ्यात मजला मीच गवसते, आत्ता कळले' असे केल्यास ??

काळ बदलतो आहे. पण तरीही सानी मिसरा हा आत्मसंवाद असल्याने कदाचित चालेल असे वाटते.

शुभेच्छा.

>> सवाल केले नियतीला मी किती तऱ्हांनी,
उत्तर हि ठरलेले होते, आत्ता कळले
हा शेर चांगला आहे.
"उत्तर ही होते ठरलेले " असं केलं तर काय होईल? Uhoh
नाहीतरी मतल्याप्रमाणे बघितलं तर ले च्या आधी अलामत (hope thats the word) नाहीच आहे.
परिसाच्या शेरात पण सेम.