सर्व बाजूंनी प्रयत्न झाल्यामुळे प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासून गर्दी झाली. मागचा अनुभव आणि काही अनुभवी लोकांचे सल्ले लक्षात घेऊन सुनंदाने काही पत्रकारांना पण आमंत्रित केले होते. त्याचा परिणाम असा झाला की, परिषदेसंबंधी बातमी मध्ये प्रदर्शनाविषयी पण २-३ वाक्ये लिहून आली. रोजच्या रोज गर्दी वाढतच होती.सुब्रतो तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत थकून जात होता.लोकांनी केलेल्या गर्दीचे त्या दोघांना जास्त अप्रूप वाटत होते. काही विदेशी लोकांनी पण सुब्रतोची चौकशी केली. अनेकप्रोत्साहक अभिप्राय पण दिले. ३-४ दिवसांनी थॉमसन नावाच्या एका युरोपिअन माणसाने सर्व चित्रांचे बारकाईने निरीक्षण केले आणि सुब्रतोशी ओळख करून घेतली.त्याने सुब्रतोला आपले व्हिजिटिंगकार्ड पण दिले.थॉमसन लंडनच्या एका आर्टgalleryचा प्रमुख होता. पर्यावरणाबरोबर बिझिनेस हा हेतू मनात ठेवूनच भारतात आला होता. तो पुण्याबरोबर मुंबई, दिल्ली, चेन्नई ह्या शहरांना पण भेट देणार होता. त्याने लगेच विषयाला सुरुवात केली.
“ही चित्रे तुम्हाला विकायची आहेत का?”
“अंsssssss....चांगली किंमत आली तर नक्कीच विकेन.” सुब्रतो.
“तुमच्या काय अपेक्षा आहेत?” थॉमसन.
“खरे तर मी काहीच ठरवलेले नाही. बरे, एक मिनिट थांबा.” त्यानेसुनंदाला हाक मारून तिला विचारले. ती पण ह्याबद्दल काहीच सांगू शकली नाही.५-६ हजार एका चित्राचे म्हणाले तरी दीड-दोन लाख रुपये यायला हरकत नाही. तिच्या परीने तिने अंदाज दिला. ही मंडळी काहीच बोलत नाहीत म्हणाल्यावरथॉमसननेऑफर दिली, तो म्हणाला, “मी तुम्हाला प्रत्येक पेंटिंगचे५००० डॉलर द्यायला तयार आहे. तुमची सर्व पेंटिंग मी विकत घेईन.हो म्हणत असाल तर आत्ता आगाऊ १०,००० डॉलरचा चेक देईन आणि शेवटच्या दिवशी पेंटिंग्स घ्यायला येईन तेंव्हा आपला सौदा पूर्ण करेन.पुढची सर्व जबाबदारी माझी! मात्रकॉपीराईटचे सर्व हक्क तुम्ही मला दिले आहेत, अश्याफॉर्मवर सही करावी लागेल.”
‘एवढी मोठ्ठी रक्कम!!’ दोघांचा विश्वासच बसेना!सुब्रतोने आपल्या आई-वडिलांना पण बोलावले. तेदोघे पण चकित झाले आणिआनंदातिरेकामुळे आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.करारावर सह्या झाल्या.सुब्रतोने मिळालेला चेक वडिलांच्या स्वाधीन केला.
प्रदर्शन संपल्यावर एके दिवशी सुब्रतोने बाहेर जेवणाचा बेत आखला.सुब्रतो-सुनंदा,सुब्रतोचे आई-वडील,सुनंदाचे आई-वडील,रामप्रसाद-सुचित्रा आदी मिळून सुब्रतोच्या आयुष्यातला तो महत्वाचा दिवस साजरा केला.सुब्रतोनेसुनंदासाठी एक खास प्रेझेंट आणले होते.
थॉमसननेसर्वच्या सर्व पेंटिंग्स नेली. ६ महिन्यांनी तो पुन्हा येईल असे म्हणाला.तोपर्यंत जी काही पेंटिंग्स होतील ती पण घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन गेला.
........क्रमश:
फिनिक्स पान १५
Submitted by पशुपति on 27 November, 2013 - 04:50
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users