हरलो.....

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

... पुन्हा एक लढाई हरलो. जवळपास तीनशे नागरिक अन पन्नास सुरक्षा कर्मचार्‍यांच्या जीवाच्या बदल्यात मुंबई मधील इतर लोक आता शांततेने जगु शकतील....... पुढील हल्ला होईपर्यंत!

यासारख्या असंख्य फोरम वर आता काय करायला पाहीजे अन काय केले गेले नाही हे चर्चीले जाईल्.....अर्थात त्याला काही अर्थ नसेल्...कारण ही चर्चा करणारी सगळी सामान्य जनता ..... ह्यातला कोणीही सिस्टीम मध्ये नाही.....अन सिस्टीम च्या बाहेरच्या लोकांचे ऐकायला अन त्यावर विचार करायला सिस्टीम च्या आतल्या लोकांना वेळ नसतो अन तो त्यांचा स्वभावही नसतो....

आता परिस्थीती बदलण्यासाठी सरकार बदलवण्याचे खेळ खेळलेल जातील्......पण सगळ्याच पक्षाच्या सरकारांनी लढाई हरण्यात आपणही कमी नाहीत हे कधी च सिद्ध केले आहे.... अर्थात सरकार बदलुन परिणाम शुन्य!

कधी काळी युद्ध जिंकलेले होते, त्याच्या पुण्याईवर आज चे सत्ताधारी गर्वाने माना ताठ करीत धन्यता मानतील.......

´यशवंत´ मधाला यशवंत लोहार आठवतो........ टेबल के उर पार हमारा भी कोइ चाहिये....... सिस्टीम मध्ये घुसल्या शिवाय सिस्टीम बदलवता येणे शक्य नाही....मग ती राजकिय असो कि प्रशासकीय...............!

अतिरेक्यांकडुन एक गोष्ट शिकण्यासारखी असते, ती म्हणजे समर्पण! जे ध्येय त्यांना दिलेले असते त्यासाठी जीव कुर्बान करुन टाकतील..... अगदी अमेरिकेवर हल्ला केलेल्या विमानांनी लक्ष्याचा इतका अचुक वेध घेणे सुरक्षायंत्रणेला चक्रावणारे ठरले.... संरक्षण संशोधन क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीही ह्या चुक हल्ल्याने अचंबित झाल्या....... अर्थात अतिरेक्यांचे उदात्तीकरण करण्या चा हा प्रयत्न नाही.....पण वाईटातुन ही काही चांगले घेणे शक्य आहे.....!

....... आजच्या घडीला भारतीय सेना ही भारतातील एकमेव विश्वसनीय संस्था अस्तित्वात आहे.... तिच्याच भरवश्यावर एक भारतीय असल्याचा अभिमान ही आहे! अनेक लढाया हरलो तरी शेवटी युद्ध आम्हीच जिंकणार हा विश्वास ही आहे...तो भारतीय सेने मुळे च!

म्हणुणच वाट पहातोय.......युद्धाची! .......तोवर लढाई हरणे चालु च राहील!

विषय: 
प्रकार: 

खरे आहे मित्रा.............. घाण साफ करायची तर घाणीत उतरावेच लागते, चर्चा अन मसुदे तयार करून उपयोग नाही.
या धाम्धूमीत bjp's prime minster candidate" म्हणून अडवाणींचे नाव जाहिर केले आहे. या इतकी दुसरी हतबलता नाही. मला वाटले पर्वा tv वर बोलताना याना heart attack येतो का काय? हे असले हातात काठी घ्यायला टेकलेले नेते आम्ही पंतप्रधान म्हणून का निवडून द्यायचे? शरमेची बात आहे इतके वर्षे राजकारणात असलेल्या पार्टीला एक तरूण नेता एव्हाना तयार करता आला नाही..shame!!! इतरांचेही तेच आहे... भारतात फार फार अमूलाग्र बदल घडून यायला हवे आहेत. Sad

पण युद्ध कुणाशी? आपले शत्रू आपल्या समाजात सर्वत्र पसरलेले आहेत, अगदी शासनात सुद्धा, पोलीसात, कस्टममधे सुद्धा. निष्क्रियता, लाच लुचपत, स्वार्थ, सत्ता मिळवण्यासाठी शत्रूची मदत हा तर फार जुना पायंडा आहे भारतातला. मग दाऊदचे पैसे घ्यायला, नि मोबदल्यात त्याला काय वाट्टेल ते करू द्यायला कुणालाच लाजा वाटत नाहीत.

म्हणजे असे की समजा पायाला गँग्रिनसारखा रोग झाला तर पाय कापून सुद्धा माणूस पुनः बर्‍यापैकी जीवन जगू शकतो, विशेषतः कृत्रिम पाय मिळाला तर. पण जिथे डोक्यापासून पायाच्या नि हातांच्या बोटापर्यंत, आतपासून बाहेरपर्यंत रोग पसरला आहे, तिथे काय करणार? अपेंडिक्स कापून टाकता येते, टॉन्सिल्स काढून टाकता येतात. पण इथे अगदी हृदय, जठर नि फुप्पुसे पण रोगग्रस्त.

नेता घडवावा लागतो. एक म्हण आहे,

"कबुतराला गरुडाचे प॓ख लावता येतील, पण गगन भरारी चे वेड रक्तात च असावे लागते."