१. मैदा १ कप
२. कणीक १/२ कप
३. बेकिंग सोडा
४. साखर १ चमचा
५. फ्रिजमधील थंडगार लोणी २-३ चमचे
६. दही २-३ चमचे
७. हिरवी मिरची १
८. कढीपत्त्याची पाने ७-८
९. कोथिंबीर
१०. जिरे १ चमचा
११. मिरे ३-४
१२. आल्याचा तुकडा
१३. वरून लावण्यासाठी तीळ
१४. मीठ
एका बाऊलमधे मैदा , कणी़क, साखर, मीठ, बेकिंग सोडा घालून एकत्र करून घ्यावे.
नंतर त्यामधे थंड लोणी घालून नीट मिक्स करावे. मिश्रण ब्रेडक्रम्ब्ससारखे दिसेल.
जिरे आणि मिरे भाजून त्याची पूड करून घ्या. ती वरील मिश्रणात टाका.
आता हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता बारिक चिरून मिश्रणात घाला. आल्याचा तुकडा किसून तो किस घाला.
व्यवस्थित मिक्स करून मिश्रणात दही घाला. वाटल्यास किंचित पाणी घालून मिश्रण भिजवा आणि अर्धा तास झाकून ठेवा.
आता ओव्हन १८० डि से किंवा ३५० डि फॅ ला प्रिहिट करा.
भिजवलेला गोळा शंकरपाळ्यासाठी लाटतो तसा लाटून (आपल्या आवडीप्रमाणे जाड्/बारिक) , त्यावर तीळ पसरून, त्याला आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारात कापा.
ट्रेला थोडे तेल लावून त्यावर ही बिस्किटे ठेवून २०-२५ मि. बेक करा.
बाहेर काढून थंड होऊद्या. कुरकुरीत मसाला बिस्किट रेडी!
मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ मिक्स केले तर छान लागतात.
पूर्ण मैद्याचे केले तर अजून मस्त!
बेकिंग पावडरही थोडी घालावी लागते पण मला काही मिळाली नाही तर मी घातली नव्हती.
अर्धा तास मिश्रण भिजवून ठेवले तर छान होतात पण लगेच केले तरी चालतात. मी दोन्ही करून पाहिले आहे.
तीळाबरोबर वरती कलोंजीही लावल्यास छान दिसते.
भारी झाली. कुरकुरीत! माधवी,
भारी झाली. कुरकुरीत!

माधवी, गोड रेसिपीही दे आता
भारी प्रकरण दिसतय ! करावे अस
भारी प्रकरण दिसतय ! करावे अस वाटताय
मस्त झाली स्पाईसी बिस्किट्स.
मस्त झाली स्पाईसी बिस्किट्स. आजच केलि. मी सोडा आणी बेकिंग पावडरही वापरली .
अरे वा.. धन्यवाद पौर्णिमा,
अरे वा.. धन्यवाद पौर्णिमा, अनघा.
मस्त झालित बिस्किटे......
मस्त झालित बिस्किटे...... कढी पत्ता जरा जास्त झाला ...तर मस्त चव आलिये...
मी दोन दा केली.... छान
मी दोन दा केली.... छान झाली.... ह्यावेळी मुलांसाठी म्हणून हि. मी. वगळली ..... छान लागतात तरीहि...
ओव्हन नसेल तर दुसरा काय
ओव्हन नसेल तर दुसरा काय option आहे?
आज ट्राय केली रेसिपी .. मीही
आज ट्राय केली रेसिपी ..
मीही बेकींग सोडा आणि पावडर दोन्ही घातलं .. आलं कोथींबीर, कढिपत्ता , मिरची वाटून घातली .. जिकडे "चमचा" आहे ते टीस्पून च्या प्रमाणात वापरलं .. मीठ १ टीस्पून घातलं आणि बटर मात्र ३ टेबलस्पून .. : p
मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहेत .. चवही मस्त एकदम ..
फक्त २० ते २२ मिनीटं बेकींग पुरे आणि बिस्कीटं साधारण वरच्या फोटोत दाखवली आहेत त्या जाडीची हवीत .. मी शंकरपाळ्यांसारखी पोळ्या लाटून, कातून केली पण बहुतेक कमी-अधिक जाडीची झाली .. त्यामुळे आजूबाजूची जरा जास्त भाजली गेली ..
छान दिसताहेत बिस्किटे मला
छान दिसताहेत बिस्किटे
मला पुन्हा करावीशी वाटताहेत.
धन्यवाद सशल!
Pages