पुढे असलेले दात तार लावून आत वळवणे - उपचाराबद्दल अधीक माहीती हवी आहे.

Submitted by मेधावि on 16 November, 2013 - 22:07

माझ्या मुलीच्या पुढील दातांमधे बरीच फट होती तसेच दातही थोडे पुढे होते. ती ३ री मधे असताना आम्ही कोथरुडच्या एका सुपर प्रसिद्ध ऑर्थोडोंर्टीस्टकडे उपचाराकरता गेलो. त्यावेळेस ती (मुलगी) ट्रीटमेंटसाठी घाबरत होती कारण ह्या प्रकारात खूप दुखते हे तिला तिच्या मैत्रिणींनी सांगितले होते. आम्ही डॉ. ला दाखवल्यानंतर डॉ ने, हे लहान वयातच केले तर बरे होईल असे सांगितले व त्यावेळची ट्रीटमेंटची किंमत सांगितली. (२००३ साली संपूर्ण ट्रीटामेंटाचे १६हजार, १ ह. अ‍ॅडव्हान्स व नंतर दर तिने वर्शे ५ हजार प्रमाणे) मुलगी ह्या ट्रीटमेंटसाठी तयार नाहीये त्यामुळे आता कसे करायचे असे आम्ही विचारल्यावर त्यांनी सांगितले की तुम्ही ते काम माझ्यावर सोपवा. मी तिला तयार करून घेईन. आम्ही तयार झालो. मग त्यांनी अ‍ॅडव्हान्स रक्कम ५ हजार + १ हजार घेतले व तिला पंधरा दिवसांनी यायला सांगितले. पंधरा दिवसांनी १ तास नं लावून वगैरे त्यांना भेटल्यावर त्यांनी तिला सांगितले, मी तुझ्या मनाविरुद्ध ही ट्रीटमेंट करणार नाही. त्यांनी तिला दात आत वळवल्यावर होणारे फायदे व तोटे सांगितले व विचारले, की आईबाबा किंवा मला न घाबरता सांग की तुला ही ट्रीटमेंट करायला आवडेल का नाही? तिने टिळकांच्या स्पष्टवक्तेपणाने "नाही" असे सांगितले. झाले, पुढची अपॉइंटमेंट्..अजून १५ दिवसांनी. नंतरही तेच्....असे तब्बल ३ वर्षे चालले. आम्ही जायचे, त्यांनी विचारायचे, तिने नाही म्हणायचे त्यांनी ओके म्हणायचे व नंतर आम्ही परत घरी यायचे. (पैसे दिले होते न जाऊन काय करता?) शेवटी तिच्या सहावीत तिने त्यांना "होकार" दिला व तिच्या दातांना क्लीप बसली. त्यावेळेस त्यांनी रिवाइज्ड पैसे सांगितले, की पुर्वी ह्या कामासाठी १६ ह. होते पण आता त्याचीच किंमत २५ ह. झाली आहे. आम्ही मुकाट्याने तयार झालो. तिच्या दहावीत ही ट्रीटमेंट पूर्ण झाली, दात सरळ झाले व क्लीपा निघाल्या. नंतर ते परत पुढे येऊ नयेत म्हणून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे रिटेनर्ससुद्धा ५ह. करून घेतल्या. (रिटेनर्स हा प्रकार जरा विचित्र असतो. म्हणजे त्या घालायल मुलांना आवडत नाही कारण त्याची तार सतत टाळ्याशी असल्याने त्यांना मळमळते व ती घालायचा ते कंटाळा करतात. ) तिने आळस व हट्टीपणा करून ह्या रिटेनर्स वापरल्या नाहीत व तिचे दात एक वर्षात परत पुढे आले. आता हे दात परत आत कसे वळवायचे असा विचार करत आम्ही परत त्या डॉ. न शरण गेलो तेव्हा त्यांनी परत सगळी ट्रीटमेंट करावी लागेल व त्याची सद्ध्याची किंमग ४५ ह असे सांगितले. आम्ही परत आलो कारण आता परत हे सगळे करवून घेण्याइतकी शारीरिक व मानसिकसुद्धा ताकत आमच्यात शिल्लक नाही. पण आता लक्षात येते आहे की, त्यावेळेस तिच्या बरोबर दात सरळ करून घेतलेल्या बर्‍याच जणांच्या बाबत हे घडले आहे. म्हणजे रिटेनर्स न वापरणे, मग दात परत माघारी येणे हे जर एवढे कॉमन असेल, तर ती ट्रीटमेंट त्यानुसार बदलत का नाहीत? म्हणजे पर्मनंट क्लीप्स हळूहळू काढत मग आवश्यक काळापर्यंत त्या ठेवत का नाहीत? त्याने हा सगळा त्रास व खर्च वाचणार नाही का? आतासुद्धा ह्या प्रकारात परत पहिल्यापसून ही ट्रीटमेंट करावी लागेल व तेवढा खर्च परत येईल हे बरोबर आहे क? कृपया जाणकारांनी प्रकाश पाडावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझेही दात पुढे होते. मी १६ वर्षांचा असताना दोन उपदाढा काढुन जागा बनवुन क्लिप बसवुन ते मागे गेले आहेत. हे दात नॉर्मल झाले नाहीत कारण वरची हिरडीच पुढे आहे. फरक इतकाच की पुर्वी दातांमुळे तोंड पुर्ण मिटले जाऊ शकत नव्हते. आता ते पुर्ण मिटते. पण मला पेरु किंवा चिक्की पुढच्या दातांनी तोडुन खाता येत नाही.

ह्यात अगदीच विद्रुप दिसणारा चेहरा बरा होतो पण आदर्श दातांची ठेवण साधणे अशक्य असावे.

बाप रे!

आमच्या लेकीचेही दात पुढे आणि बरेच वाकडेतिकडे आहेत. तिला एका भारतीय डेंटिस्टकडे नेले होते. त्याने भितीच घातली की ही मुलगी मोठी झाली की किती वाईट दिसेल वगैरे दुसर्‍या क्लिनीकमधल्या भारतीय डॉ.कडे गेलो तर तो म्हणाला की थोडे थांबा. लेक आत्ता ८ वर्षाची आहे...

दरम्यान, लेकीने शाळेतील मोठ्या मुलींना विचारुन कितपत दुखते, कसे वाटते, काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणता डॉ चांगला आहे वगैरे माहिती काढून ठेवली आहे/काढते आहे. तिच्या चौकस बुद्धीचे आणि तिला माहिती सांगणार्‍या मुलींचेही कतुक वाटते.

तुमचा अनुभव वाचून ही ट्रीटमेंट बरीच त्रासदायक आहे आणि फेलही जाऊ शकते हे समजले. खार्चिक आहे हे माहित होते.

कोणी बाहेरच्या देशात राहून भारतात जाऊन-येऊन मुलांची ही ट्रीटमेंट करवून घेतली आहे का? असल्यास काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते?

फार चांगला आणि अत्यावश्यक असा हा धागा आहे. सुमेधा यानी अगदी सविस्तरपणे मांडला आहेच शिवाय आर्थिक बाजूही थेट दिली असल्याने मुळात डॉक्टरांकडे जातानाच बॅन्क बुक हाती घेतले पाहिजेच असे दिसते. 'सध्याची किंमत ४५ हजार आहे...' असे वर लिहिले गेले आहे. ही सध्याची म्हणजे २०१३ ची आहे का ? कारण मी इथे कोल्हापूरात चौकशी केली तर हा खर्च ६० हजाराच्या पुढे गेला आहे असे समजले. ज्या मुलीच्याबाबतीत ही ट्रीटमेन्ट करायची होती तिच्या आईवडिलांना एवढ्या एकाच कारणासाठी इतकी रक्कम उभी करणे अशक्य असल्याने त्यानी थांबायचा निर्णय घेतला आहे [आम्हा मित्रांकडून पैसे घ्यायला त्यानी नकार दिला]....मुलगीही चारपाच वर्षाचीच आहे.... मुलगीच्या दातात फट किंवा ते पुढे असणे हा पालकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय होऊ शकतो....त्यामुळे उपचार आवश्यक ठरतात. पण किती पैसा खर्च करावा....आणि केलातरी त्याचे साईड इफेक्ट्स दिसतात असेही सुमेधा आणि नितीनचंद्र यांच्या लिखाणावरून दिसते.

मायबोलीवरील डॉक्टर मंडळींचे याबाबतीतील मत व सल्ला वाचायला उत्सुक आहे.

नात्यातील एकीचे दात पुढे होते. ते ट्रीटमेन्ट करून सरळ झाले. तिच्याच भावाचेही दात किंचित पुढे आहेत. पण त्याने तडफदारपणे सांगितलेय की कोणी हसले तर हसू दे.पण मी माझ्या दाढा काढून ती ट्रीटमेन्ट घेणार नाही.

ह्या ट्रीटामेंटला एवढा जास्त खर्च का येतो? म्हणजे ह्या कामासाठी येणारा कच्चा मालाचा खर्च व ट्रीटमेटचा खर्च ह्याच काही ताळमेळ आहे का? ही ट्रीटमेंट योग्य किमतीत होउ शकेल अशी इतर हॉस्पिटल्स/दवाखाने आहेत का? सुरुवातीपासून सुरवात नसलेल्या माझ्या मुलीसारख्या केसेस मधे ह्याला शॉर्ट टर्म साठी स्वस्तातली उपचार पद्धत नसते का?

माझ्या मुलीचे दात पुढे नाहीत पण वाकडेतिकडे होते त्यामुळे दोन वर्षापूर्वी ती ११ असताना ब्रेसेस लावल्या. पहिल्या एक्सरेमध्ये एखाददोन दात काढावे लागून बाकीच्या दातांना जागा करून देण्याची शक्यता निर्माण झाली कारण तिची जिवणी लहान आहे. पण नशिबाने तशी वेळ आली नाही. ब्रेसेस लावल्यावर एक दोन दिवस जरा दुखणं वगैरे झालं. पण त्याचीही सवय झाली. दोनच आठवड्यापूर्वी तारा निघाल्या आहेत. दात एकदम छान दिसत आहेत. रिटेनर्स करायला टाकले आहेत जे मंगळवारी मिळतील आणि लावले जातील.

बापरे, सुमेधाव्ही! एवढे करून पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणजे अवघड आहे.
(पण तुमच्या मुलीचा ठामपणा जबरी आहे.)

अशोकमामा, तुम्ही म्हणता त्या पालकांकडे जरी आर्थिक जुळणी झाली तरीही तसेपण त्यांना थांबावेच लागेल ना? कारण मुलगी फक्त चारपाच वर्षांचीच आहे, म्हणजे तिचे दुधाचे दात पडून नवे यायला अजून वेळ आहे. की दुधाच्या दातांवरही ही ट्रीटमेंट करता येते?

नाही गजानन, दुधाच्या दातांवर लावून उपयोग नाही. इथे १० पैकी ५,६ मुलांच्या दातांना तार लावलेली दिसते. फार कॉमन आहे. सगळी मुलं १०+ ह्या वयोगटातली बघितली आहेत.

ithe koni Dentists nahit ka? kuna nadnya Dr. kadun tyanche vichar aaikayala avadatil.

होय गजाननराव..... त्या दंतवैद्यांच्या अगोदर मित्राच्या फॅमिली डॉक्टरांनीच 'थांबा अजून दोनतीन वर्षे' असा सल्ला दिल्याचे समजते. तुमचा वरील प्रतिसाद वाचताक्षणीच मी त्याला फोन केला होता, त्यावेळी ही माहिती मिळाली होती....पण खर्चाचा आकडा मात्र बदललेला नाही.

पण मला पेरु किंवा चिक्की पुढच्या दातांनी तोडुन खाता येत नाही

बापरे, म्हणजे ही ट्रिटमेंट करुन घेतल्यावर दात थोडे नाजुक होतात??
माझ्या एका मैत्रिणीचे दात एकदम तिरके बाहेर आलेले. पण त्यांना सरळ करण्यासाठी दाढा काढायच्या हे ऐकल्यावर तिनेही ठाम नकार दिलेला. वाचली बिचारी.

हा असला प्रकार मी कधीच ऐकला नव्हता. अ‍ॅडव्हान्स पैसे, त्यातली तीन वर्ष फक्त काऊन्सेलिंग आणि ट्रीटमेंट पूर्ण करूनही दात पुन्हा पुढे येणे... कहर आहे सगळाच.

ललीने या विषयावर एक मस्त मजेशीर अनुभव लिहिला होता - दंतमनोरंजन

तार लावल्यावरची ५-६ काय असतील ती वर्ष दात कुरूप दिसतात म्हणून तार लावायला नकार असेल तर मी समजू शकते. पण आता तारही सिरॅमिकची उपलब्ध होऊ लागली आहे, जी दातांच्याच रंगाची असते.
पण दाढा काढून घेण्यासाठी लोकांचा एवढा तीव्र नकार का असावा?
आपल्याला चारही बाजूंना ४-४ दाढा असतात. अक्कलदाढा आल्या तर बोनस. त्यातली १-१ दाढ काढली तर काय झालं असं आपलं मला वाटतं Happy

लहान वयात ही ऑर्थोडेन्टल ट्रीटमेन्ट केल्यावर मुलं रिटेनर्स लावायला कंटाळा करतात, आणि जरी लावले तरी तीन-चार वर्षांनी म्हणजे दातांची, जबड्याची पूर्ण वाढ झाल्यावर दात पुन्हा थोडे पुढे आल्यासारखे वाटतात, त्यामुळे करेक्शन ट्रीटमेन्ट करुन घ्यावीच लागते.

माझ्या मुलीला वयाच्या दहाव्या वर्षी पार्ल्याच्या डॉ. पारुल दोशी या ऑर्थोडेन्टीस्टकडून ट्रीटमेन्ट घेतली तेव्हा सोळा हजार खर्च आला होता. तिने रिटेनर्स फक्त रात्री झोपताना वापरले, ४ वर्षांनी आम्हाला वाटत होते की पुन्हा थोडे पुढे आल्यासारखे वाटत आहेत दात, पण डॉक्टर म्हणाले तेव्हढं नॉर्मल असतं त्यामुळे काही केलं नाही. मात्र मुलीने दहावीत गेल्यावर हट्ट धरला की तिला अगदी सरळ रेषेत दात हवे आहेत. ऑर्थोडेन्टीस्टचा खर्च त्यावेळी ५० हजार झाला होता. पारुल दोशीने तिच्याकडेच आधी ट्रीटमेन्ट झाली होती म्हणून २५ हजार सांगीतले,तरी पुन्हा इतके पैसे खर्च करायचे जीवावर आले, दातही अगदी फार पुढे नव्हते. पण मुलीने हट्टच धरला. तेव्हा पारुलनेच आम्हाला सायनच्या मानव रुग्ण सेवा ट्रस्टचा पत्ता दिला, तिथे ही ट्रीटमेन्ट फक्त ७-८ हजारात होईल असे सांगीतले. तिथल्या ऑर्थोडेन्टीस्टही तज्ञ होत्या खूप, पण तिथे जाणे येणे त्रासदायक होईल असे वाटले. तिथल्या ऑर्थोडेन्टीस्टना आम्ही विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की मी अंधेरी पूर्वला तेली गल्लीच्या जवळ असलेल्या लायन क्लबच्या पॉली क्लिनिकमधे आठवड्यातून एकदा संध्याकाळी जाते, तुम्ही तिथे येऊ शकता. इथल्या पेक्षा तिथे टॄटमेन्टला थोडा जास्त खर्च येऊ शकेल. आम्ही तिथे जाऊन पुढे दीड वर्ष ट्रीटमेन्ट केली. ट्रीटमेन्ट खरंच सुंदर झाली. नंतर घरी असताना, झोपताना मुलीने आवर्जून रिटेनर्स लावले. अक्षरशः मोत्यासारखे सरळ झालेत मुलीचे दात. यावेळी साधारण १२ हजार खर्च आला. अंधेरी पूर्वच्या लायन्स क्लब क्लिनिकमधे चौकशी करा. ऑर्थोडेन्टीस्टचे नाव आहे डॉ. सीमा देवधर.

मी हि Treatment २००२ - २००३ मधे केली होती. माझे दात मोठे आणी जबडा लहान होता त्यामूळे दात वेडेवाकडे पूढे आले होते. मी Treatment Doctor सुधीर जोशी ( J M Road, Shivsagar hotel chya var , Pune ) इथे केली होती. तेन्व्हा २५००० रू खर्च आला होता. माझे वय १९ होते. माझ्या ४ दाढा काढाव्या लागल्या. Doctor खूप चान्गले होते. त्यान्नी सर्व व्यवस्थित समजावून सान्गितले. ते तेन्व्हाच म्हातारे होते सो सध्या Practice करतात की नाही माहित नाही. त्यान्ची मुलगी पण Orthodontist होती आणी त्यान्च्या बरोबरच Practice करत होती.

मला खूपच फायदा झाला. अजून तरी दात पूढे आलेले नाही.

शर्मीला, खूप चांगली माहीती. आता असे काही पुण्यात आहे का ते शोधावे लागेल. करेक्शन ट्रीटमेंटसाठी पण तितकीच किंमत सांगणार्‍या पुण्यातल्या त्या डॉ. ला सलाम.

सुमेधाव्ही, तुमच्याकरता इथे लिहायला विसरले नंतर. आमचे रिटेनर्स लागले आहेत. सध्या दोन आठवडे सतत लावायचे आहेत. आणि दोन आठवड्यांनी फक्त रात्री झोपताना 'फॉर द रेस्ट ऑफ हर लाईफ'. Uhoh
आम्ही ही ट्रिटमेंट सुरू केली तेव्हा मला ह्या रिटेनर्सबद्दल अजिबातच माहित नव्हतं. जर हे कायम लावायचं हे माहित असतं तर आम्ही कदाचित पुढे गेलो नसतो (कदाचित अशाकरता की दात वाकडेतिकडे असल्याने घासलेही नीट जाय्चॅ नाहीत त्यामुळे गरज होतीच)

सायो, मुलांना झोपताना रिटेनर्स लावायला आवडत नाही. आजूबाजूच्या दहा मुलांपैकी कदाचित २ जण लावत अस्तील फक्त. बाकी पालक ओरडाआरडा करत रहातात आणि मुले काही त्यांचे ऐकत नाहीत. आणि जन्मभर कोणी ह्यासाठी मागे लागू शकत नाही. पण हे सगळे आधी का सांगत नाहीत? तसेच रिटेनर्सचे पैसे ट्रीटमेंटमधे का नाही सांगत. आणि जर रिटेनर्स लावणे एवढे त्रासदायक असेल, तर मग पर्मनंट ब्रेसेस हळूहळू का नाही काढत?

आमच्याकडे इन्शुरन्स कव्हर करतो म्हणून ठीके.
पण डॉक्टर म्हणून त्यांनी सांगायला हवं होतं हे आहेच पण आता हाताशी गुगल असताना रिसर्च करणं ही माझी जबाबदारी होतीच. पण मला अजिबातच कल्पना नव्हती ह्या शेपटाची. असो,
सध्या तरी ते लावायला कटकट करत नाहीये. सुरूवातीचे दोन तीन दिवस जीभ जड असल्यासारखं बोलणं होतं पण आता ते ही ठीक आहे.

मी हा धागा आत्ताच बघितला.
माझ्या मुलीला ऑगस्ट २०१२ मध्ये ब्रेसेस लावले होते ते जुन २०१३ मध्ये काढले आहेत आणि आता ती रोज रीटेनर लावते. फक्त रात्री झोपताना काढते. सकाळी ब्रश केले की लगेच लावते, कधीतरी विसरलीच तर मी तिला सांगितले की लगेच लावते.

माझ्या लेकीचे दात वेडेवाकडे होते, दातात फट होती म्हणुन मी तिला डॉ. करबेळकर (गोरेगाव वेस्ट, मुंबई) ह्यांच्याकडे घेऊन गेले होते, तेव्हा त्यांनी मला ३ प्रकाराची माहिती दिली -
१) नॉर्मल ब्रेसेस - खर्च - रु. २५०००/-
२) कलर ब्रेसेस - खर्च - रु. ३५०००/-
३) सिरॅमिक ब्रेसेस - खर्च - रु. ४५०००/-

ह्या तिनीमधुन एक सिलेक्ट करायला सांगितले होते. मी त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या की नॉर्मल लावा. सिरॅमिक टिव्ही अ‍ॅक्टर लावतात कारण त्या आजिबात दिसत नाहीत. मग आम्ही नॉर्मल लवल्या. एक आठवडा तिला त्रास झाला पण नंतर सवय झाली. तिचा वरचा एक दात कमी आहे आणि तो ईम्प्लांट करायचा आहे. आता ती १६ वर्षाची आहे. डॉक्टर म्हणाल्या आता करायला हरकत नाही पण १८ पुर्ण होईपर्यंत थांबलात तर बरे.
त्यामुळे त्यांनी तिला रिटेनरमध्येच एक दात लावुन प्लेट बनवुन दिली आहे ती काढ घाल करावी लागते पण खालच्या दाताला त्यांनी आतुन एक बारिक वायर बसवली आहे त्यामुळे वेगळे रिटेनर बसवायची गरज नाही.

हे सगळे २५००० मध्येच झाले आहे. आता जर का रिटेनर/ प्लेट तुटले तर मात्र १००० रु देवुन घ्यावे लागतील असे सांगितले आहे.

Varsha, he khup kami rates ahet. Dr.n kadun punyacha changala v similar ref milu shakel ka? amhala hi treatment purnapane parat karavi lagnar ase disate ahe.

Me swata hi treatment ghetali ahe. I had 4 molars extracted. I wore permanent braces since I was 13 and had them extracted at 21 and later on I wore retainers. He me ajoon sambhaloon thevlet. Treatment Ni Daat ekdum mast zhalet.

Nantr Mala mool zhala tevha Daat pudhe alele vatle. Doc said we cannot go against nature. every time you are pregnant, when you hit your 30s, 40s and menopause (basically all major milestones) your body will change so will your teeth alignment...it will be subtle but it will be there. So I still use my retainers and it helps.

English sathi sorry.

BS, vayomanapramane 10-20 varshat farak padane vegale ani 2 mahinyat dat pudhe yene vegale. hyamadhe dr. ne nit mahiti dili nahi ani fakt swat:cha karyabhag sadhala he vaitach ahe. mi recently ase aikale ki ha braces n lavalyamule dat parat pudhe yene ha problem evadha common zalay ki ata tyanni treatment purna zalyanantar suddha datachya atil bajune ek tar pudhe anek varshankarata lavunach thevatat.hi sudharana gele 2 varshapasun dr.s vaparat ahet.

Pages