Submitted by अंड्या on 16 November, 2013 - 05:48
आपल्या सचिनला भारतरत्न जाहीर झाले आहे हो sssssss !!!!
त्याच्या जाण्याने जड झालेले मन हलके करायला यापेक्षा आनंदाची बातमी ती आणखी काय..
माझ्यासह सर्वच सचिनच्या चाहत्यांचे अभिनंदन !! अभिनंदन !!! अभिनंदन !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< ...... कन्फेसिंग व्हॉट वुई
<< ...... कन्फेसिंग व्हॉट वुई आर! >> मलाही असंच वाटतं ! खेळही 'टवाळा आवडे विनोद ', ह्याच दृष्टीतून आपण पहातो. खेळामुळे होणारी सुदृढ मानसिक घडण व त्याचा राष्ट्रीय लाभ आपल्याला मान्यच नसावा. निर्लज्ज्पणे भ्रष्टाचारात केलेल्या अमाप पैशाकडे नाईलाज म्हणून कां होईना आपण कुरकूर न करतां दुर्लक्ष करूं शकतो. पण प्रचंड तपश्चर्येने, निखळ गुणवत्तेवर खेळामुळे मिळालेला पैसा मात्र आपल्याला अजिबात सहन होत नाही. दिवस-रात्र राजकीय पुढार्यांचीं अर्थशून्य, दांभिक भाषणं आपल्या डोळ्यांवर, कानांवर अत्याचार करत असतात तें आपल्याला चालतं पण एखाद्या असामान्य खेळाडूच्या अव्वल प्रतिभेचं, वागणूकीचं कांहीं दिवस कौतुक झालं कीं आपण बेचैन होतों. इंग्लंडमधे असामान्य खेळाडूना दिला जाणारा उच्चतम ' नाईटहूड' किताब, जॉन वेनसारख्या सिनेनटाचं अमेरिकेत काढलेलं पोस्टाचं तिकीट म्हणजे आपल्याला अचरटपणाच वाटतो !![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हा लेख का
हा लेख का तो?
http://www.loksatta.com/sampadkiya-news/bharat-and-ratna-266717/
उदय, मुद्देसूद वगैरे अजिबात सहमत नाही. एक रास्त मुद्दा आणि अनेक रॅण्डम मुद्द्यांची जंत्री असलेला लेख आहे तो.
पहिलाच नोबॉल:
आयुष्यभराच्या तपश्चर्येचा आणि इतरांचे आयुष्य उंचावण्याच्या साधनेचा सन्मान 'भारतरत्न' या उपाधीने करावयाचा असतो. जरूर असतो. पण ही अर्धीच व्याख्या का वापरली? याव्यतिरिक्त आपल्या क्षेत्रात केलेल्या सर्वोच्च कामगिरीमुळेही दिला जातो हा पुरस्कार. दिला गेलेला आहे. एम एस सुब्बालक्ष्मी, भीमसेन जोशी, लता, बिस्मिल्ला खान हे सगळे, आणि सचिन यांच्या नामांकनात गुणात्मक फरक काय आहे?
रास्त मुद्दा एवढाच आहे, की "अजून तो त्या लेव्हलला पोहोचलेला नाही". आख्खा लेख या एका मुद्द्यावर असता तर मत म्हणून ग्राह्य होते. मी सहमत नाही, पण हे मत जरूर ग्राह्य आहे. त्याचा आदर आहे.
कोणी म्हणेल भारतीय क्रिकेटमधे द्रविडचे स्थान जास्त उच्च आहे. त्यावरही मी वाद घालणार नाही. मला स्वतःला सचिन काकणभर सरस वाटतो, पण अनेकांना द्रविड का वाटेल ते समजू शकतो.
पण लेखकाने यावर भर दिलेलाच नाही.
त्यात असलेले बाकीचे रॅण्डम संदर्भ कशाला? त्याचा काय संबंध आहे? मुळात लायक असलेल्या व्यक्तीला "आपल्या आजूबाजूला होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधी आवाज उठवला नाही" म्हणून लायक न ठरवणे याला काही प्रिसिडन्स नाही. असे कधीच केले गेलेले नाही? मग सचिनबद्द्लच का?
बीसीसीआय भारताचे प्रतिनिधीत्व करत नाही ई. मुद्दे स्वतंत्रपणे खरे असले तरी येथे त्याचा काहीही संबंध नाही.
सचिन आणि सी एन आर राव यांना एका पंक्तीत बसवण्यात काय चूक आहे? त्यात काय कमीपणा आहे? एखाद्याने ४०-५० वर्षे संशोधन केले असले तरी खेळ या क्षेत्रातील व्यक्तीला २४-२५ वर्षे काही कमी नाहीत.
ज्याला पुरस्कृत करायचे आहे तो/ती त्यांच्या क्षेत्रातील शिखरावर असतानाच करणे योग्य आहे. नंतर ३०-४० वर्षांनी करून काय उपयोग?
अवांतर - एक प्रेमळ विनंती
अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा. <<<
असल्या प्रेमळ विनंत्या फारच भ्या दाखवतात ब्वॉ!
ही कसली असली लाडीक प्रेमळ विनंती?
'दुसरा वापरा'??????
>>>>>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>
आता वापरा बिनधास्त हाच धागा, त्या दोनेक दिवसांसाठी ती प्रेमळ विनंती होती, आता तो भावनेचा जोर ओसरला आहे, आता प्रॅक्टीकल चर्चा करायला हरकत नाही, तसेच धाग्याला टीआरपीची गरज सुद्धा आहेच की, शेवटी आपल्या सचिनचा धागा आहे, प्रतिसादांचे शतक झळकायलाच हवे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्युअर मनोरंजन? प्युअर
प्युअर मनोरंजन? प्युअर तपश्चर्या, खेळाप्रती/कलेप्रती प्युअर निष्ठा, प्युअर गुणवत्ता,प्युअर चिकाटी....बरीच मोठी यादी होईल.
मनोरंजन तर मनोरंजन . ते कधीपासून तुच्छ वाटायला लागलं?( तेही कोणाला?)
"त्याला खेळण्यासाठी पैसे मिळालेत मग भारतरत्न कशाला" यावरून एक विनोद आठवला. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह यांच्या एका परदेश दौर्यात त्यांच्यासोबत एक सांस्कृतिक शिष्टमंडळही न्यायचे होते. त्यासाठी ओडिसी नृत्यांगना सोनल मानसिंह यांना विचारणा केली गेली. त्यांनी मी पाच लाख रुपये घेईन असे सांगितले. त्यावर अहो, एवढा खर्च तर दौर्यात राष्ट्रपतींवरही होणार नाही असे उत्तर आले. यावर बाईंनी, "'हो का? मग त्यांनाच नाचायला सांगा'" असे उत्तर दिले.
लोकसत्ता मध्ये आलेला लेख काही
लोकसत्ता मध्ये आलेला लेख काही धाडसी वगैरे नाही, टिपीकल मुद्दे आहेत, टीआरपी खेचायचे प्रयत्न, मला कोणत्याही थोर व्यक्तीचे नाव द्या मी थोडावेळ अक्कल गहाण ठेऊन आरामात त्या थोर व्यक्तीच्या कर्तुत्वाची चिरफाड करू शकतो, पण मजा नाही त्यात जी गुणगाण गाण्यात येते.
सी एन राच यांना सचिनसोबत
सी एन राच यांना सचिनसोबत पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे नाव झाकोळले गेले. त्यांना एकट्यांनाच पुरस्कार जाहीर झाला असता तर किती लोक त्यांच्याबद्दल माहिती करून घेणार होते? सचिनच्या पुरस्काराबद्दल नाके मुरडायला निमित्त शोधणार्यांना काहीही चालते.
कालनिर्णय २०१४ च्या डिसेंबरच्या मागच्या पानावर सचिनचा (सचिनने लिहिलेला) लेख आहे. त्यात त्याने अजूनतरी निवृत्तीचा विचार केलेला नाही असे म्हटले आहे. किती आधीपासून हा लेख लिहून घेतला असेल? की अन्यत्र पूर्वप्रकाशित झालेला लेख कालनिर्णयकारांनी पुन्हा छापलाय?
मनोरंजन तर मनोरंजन . ते
मनोरंजन तर मनोरंजन . ते कधीपासून तुच्छ वाटायला लागलं?( तेही कोणाला?)<<<
लोकं लग्गेच वैयक्तीक पातळीवर उतरतात आणि नंतर एकदम बुद्धीप्रामाण्यवादात घुसू पाहतात. काय लिहावे तेच कळत नाही काही वेळा!
>>>प्युअर मनोरंजन? प्युअर तपश्चर्या, खेळाप्रती/कलेप्रती प्युअर निष्ठा, प्युअर गुणवत्ता,प्युअर चिकाटी....बरीच मोठी यादी होईल.<<<
ह्या बर्याच मोठ्या यादीतील बरेचसे निकष माणसांच्या बर्याच मोठ्या यादीला लागू होऊ शकत असतील नाही का? आपल्याला इतर कोट्यावधींप्रमाणे एकजण आवडतो म्हणून एरवीची मुद्देसूदपणाची काटेकोर शिस्त सोडून आंधळेपणा करणे हे म्हणजे...... असो!
>>>'हो का? मग त्यांनाच नाचायला सांगा'" असे उत्तर दिले.<<<
तुम्हाला सचिनला दिलेल्या भारतरत्नवरून जर हा विनोद आठवत असेल तर सचिनला भारतरत्न मिळाले यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
खेळही 'टवाळा आवडे विनोद ',
खेळही 'टवाळा आवडे विनोद ', ह्याच दृष्टीतून आपण पहातो.<<<
सरसकटीकरण करणे पहिले म्हणजे योग्य नाही वाटत. सचिनविरुद्ध बोलणे म्हणजे क्रीडाप्रकाराला विरोध करणे हे गृहीतही जरा गैरच वाटत आहे. एक नक्की म्हणायचे आहे, की राष्ट्र, समाज, तंत्रज्ञान अश्या क्षेत्रात / अश्या गोष्टींसाठी केलेले कार्य आणि क्रीडाप्रकार या दोहोंना दिल्या जाणार्या पुरस्कारांच्या स्वरूपात साधर्म्य नसावे.
खेळामुळे होणारी सुदृढ मानसिक घडण व त्याचा राष्ट्रीय लाभ आपल्याला मान्यच नसावा<<<
सचिनला भारतरत्न दिल्यामुळे कोणाची मानसिक जडणघडण आधीपेक्षा सुदृढ झाली आणि राष्ट्राला कोणता लाभ झाला?
आधीच्या प्रतिसादात 'प्युअरली
आधीच्या प्रतिसादात 'प्युअरली मनोरंजनासाठी भारतरत्न?' असा प्रश्न विचारलाय. त्याच्या उत्तरार्त मनोरंजनात काही गैर असते का? मनोरंजन क्षेत्रातल्या त्या व्यक्तींनी आणखीही काही गुण दाखवले आहेत. त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे ते कर्तृत्व.
माणसांची बरीच मोठी यादी? असेल तर आनंदच आहे. शिखरावर पोचणार्या प्रत्येकाचाच सन्मान व्हायला हवा. इथे तर एका माणसाने शिखरे उभारली आहेत.
जोक भारतरत्नावरून नहे, तर त्याला क्रिकेट खेळण्यासाठी पैसे मिळाले होते, असे म्हणण्यावरून आठवला. सचिन, लता यांना मिळतात तितके पैसे दिले तर तो माणूस तसा खेळ, तसे गाणे देऊ शकणार आहे का?
सचिन, लता यांना मिळतात तितके
सचिन, लता यांना मिळतात तितके पैसे दिले तर तो माणूस तसा खेळ, तसे गाणे देऊ शकणार आहे का?<<<
एखाद्या माणसाने स्वतःच्या क्षेत्रात सचिन, लता ह्यांच्याइतकेच प्रावीण्य दाखवले तर त्याला भारतरत्न मिळणार आहे का?
(अपेक्षित उत्तर - अशी माणसे असली तर आनंदच होईल वगैरे)
चला झाले का चालु..
चला झाले का चालु..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
.
.
.हाताच्या बाह्या वर कराव्या लागतील
.
.
.
सचिन ब्रिगेड जिवंत हो ..ऽऽऽऽऽ
सचिनला भारतरत्न दिल्यामुळे
सचिनला भारतरत्न दिल्यामुळे कोणाची मानसिक जडणघडण आधीपेक्षा सुदृढ झाली आणि राष्ट्राला कोणता लाभ झाला?
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>>>>>>>>>
एखाद्या शास्त्रज्ञाला दिला जातो त्या वर्षी ईंजीनीअरींग मेडीकल न बीएसस्सीचा रिजल्ट चांगला लागतो का?
'सॉरी अंड्या, अंड्यातच गफलत
'सॉरी अंड्या, अंड्यातच गफलत असली तर कोंबडे कसेही असले तरी गुबगुबीत मानले जावे ही अपेक्षाच फोल आहे'
>>>>>>>>>>
हे वाक्य माझ्यासाठी आहे की सचिनसाठी ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माझ्यासाठी असेल तर ओके, मला सवय आहे, लोकांना एक अंड्या नाव दिले की असे पीजे येतच राहतात.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पण सचिनसाठी असेल तर अर्थ प्लीज, काहीच नाही समजले
एखाद्या शास्त्रज्ञाला दिला
एखाद्या शास्त्रज्ञाला दिला जातो त्या वर्षी ईंजीनीअरींग मेडीकल न बीएसस्सीचा रिजल्ट चांगला लागतो का? अ ओ, आता काय करायचं अ ओ, आता काय करायचं<<<
भाऊसाहेबांना विचारा, मूळ मुद्द त्यांचा आहे.
एखाद्या अभिप्रायावर केलेल्या प्रतिवादावर प्रतिवाद अशी चर्चा केली की स्ट्रेस निर्माण होऊ लागते.
हे वाक्य माझ्यासाठी आहे की
हे वाक्य माझ्यासाठी आहे की सचिनसाठी ? अ ओ, आता काय करायचं
माझ्यासाठी असेल तर ओके, सचिनसाठी असेल तर अर्थ प्लीज, काहीच नाही समजले अ ओ, आता काय करायचं<<<
सचिन तेंडुलकर मायबोलीकर आहे किंवा कसे व असल्यास त्याने अंड्या हे सदस्यनाम घेतले आहे किंवा कसे याबद्दल काही माहीत नाही.
भाऊसाहेबांना विचारा, मूळ
भाऊसाहेबांना विचारा, मूळ मुद्द त्यांचा आहे.
एखाद्या अभिप्रायावर केलेल्या प्रतिवादावर प्रतिवाद अशी चर्चा केली स्ट्रेस निर्माण होऊ लागते.
>>>>>>>
म्हणजे तुमच्या प्रतिवादात मुद्दाच नव्हता असे स्वताहून कबूल करत आहात का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
म्हणजे तुमच्या प्रतिवादात
म्हणजे तुमच्या प्रतिवादात मुद्दाच नव्हता असे स्वताहून कबूल करत आहात का<<<
माझ्या प्रतिवादात मुद्दाच नसेल तर नक्कीच कबूल करेन. पण या पर्टिक्युलर प्रतिवादात मुद्दा आहे असे मला वाटते व तो भाऊसाहेबांच्या मुद्याच्या विरोधी मुद्दा आहे. तुम्ही चर्चा सुसंगतपणे व पूर्वग्रह (असले वगैरे तर - सचिनप्रेमामुळे) बाजूला ठेवून वाचलीत तर पटू शकेलही.
तुम्ही चर्चा सुसंगतपणे व
तुम्ही चर्चा सुसंगतपणे व पूर्वग्रह (असले वगैरे तर - सचिनप्रेमामुळे) बाजूला ठेवून वाचलीत तर पटू शकेलही.
>>>>>>>>>
यात मी सचिनद्वेष हा शब्द वापरून हेच वाक्य तुमच्यासाठीही वापरू शकतो.
असो, मला त्यांचा मुद्दा पटला तर मी त्यांना का खोडू, तुमचा प्रतिवाद गंडला म्हणून तुम्हाला विचारले.
ओ बेफी, तुम्ही शायरी करा हो.
ओ बेफी, तुम्ही शायरी करा हो. ते सोडून यॉर्कशायरी खवटपणा कशाला करताय?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चर्चा नेहमीप्रमाणे भरकटतेय
चर्चा नेहमीप्रमाणे भरकटतेय .
विरोध करणार्यानी फक्त एकाच प्रश्नाच उत्तर द्या .
लता आणी सचिन या दोघाना भारतरत्न मिळण्यात काय फरक आहे ?
आता लताजीना का दिला अस असेल तर इतरांचे पाहू .
<< भाऊसाहेबांना विचारा, मूळ
<< भाऊसाहेबांना विचारा, मूळ मुद्द त्यांचा आहे. >> अशा पुरस्काराने खेळांचं महत्व औचित्यपणे अधोरेखित होतं व तें आवश्यक आहे, हा माझा मुद्दा होता व आहे. पूर्णविराम ! [ कृपया माझ्या नांवाला 'साहेब' नका जोडूं. सध्या माझ्यासाठी तरी खरा 'साहेब' एकच आहे !!]![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तर, असामान्य क्रिकेट प्रतिभा
तर,
असामान्य क्रिकेट प्रतिभा आणि आजही ढोर मेहनत करायची तयारी;
कोट्यावधी रुपये कमवूनही पाय घट्ट जमीनीवर असलेला;
अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, कुटुंबवत्सल;
आपल्या यशाचं श्रेय आपले गुरू, वडील व कुटुंबीय, मित्र, सहकारी अशांना प्रांजळपणे देणारा;
अगदी शत्रूराष्ट्रातल्या खेळाडूंपासून खवट यॉर्कशायरी म्हातार्यांपर्यंत सुद्धा ज्याचं मुक्तकंठाने कौतुक करतात असा एक चांगला माणूस;
आपल्या सगळ्या सहकार्यांमधे प्रचंड लोकप्रिय असलेला;
जिकडेतिकडे भ्रष्टाचार, देशद्रोह, बेशिस्त, गुंडगिरी अशा गोष्टींची बजबजपुरी माजलेली असताना आपल्या वरील गुणांनी सहकार्यांपुढेच नव्हे तर संपूर्ण भारतापुढे आपल्या वर्तणूकीने आदर्श ठेवणारा.
अशा व्यक्तीला भारतरत्न नाही द्यायचं? वाह!!!
लता आणी सचिन या दोघाना
लता आणी सचिन या दोघाना भारतरत्न मिळण्यात काय फरक आहे ?<<< काहीही फरक नाही. फार तर इतकेच म्हणता येईल की लता मंगेशकर वयाने बर्याच ज्येष्ठ आहेत.
आता लताजीना का दिला अस असेल तर इतरांचे पाहू .<<< तसे आहेच की मग? लता मंगेशकरांना भारतरत्न का दिले जावे बुवा?
चर्चा नेहमीप्रमाणे भरकटतेय <<< मायबोलीवरील स्टँडर्ड विधान आहे हे, आपल्याला आवडले नाही की चर्चा भरकटत आहे असे म्हणायचे.
अशा पुरस्काराने खेळांचं महत्व
अशा पुरस्काराने खेळांचं महत्व औचित्यपणे अधोरेखित होतं व तें आवश्यक आहे, हा माझा मुद्दा होता व आहे. पूर्णविराम !<<<
सचिनला भारतरत्न दिल्यामुळे खेळाचं महत्व उचितपणे अधोरेखित होते / झाले? हद्द आहे.
जिकडेतिकडे भ्रष्टाचार, देशद्रोह, बेशिस्त, गुंडगिरी अशा गोष्टींची बजबजपुरी माजलेली असताना आपल्या वरील गुणांनी सहकार्यांपुढेच नव्हे तर संपूर्ण भारतापुढे आपल्या वर्तणूकीने आदर्श ठेवणारा.<<<
अहो हे सचिन तेंडुलकरबाबत चाललेले आहे, तो क्रिकेटर आहे, भारतापुढे वर्तणुकीचा आदर्श ठेवायला तो कोणी संतमहात्मा नव्हे हो!
अहो हे सचिन तेंडुलकरबाबत
अहो हे सचिन तेंडुलकरबाबत चाललेले आहे, तो क्रिकेटर आहे, भारतापुढे वर्तणुकीचा आदर्श ठेवायला तो कोणी संतमहात्मा नव्हे हो!>> बेफी यु हॅव लॉस्ट इट. तो क्रिकेटर तर आहेच, पण त्याच बरोबर हे सगळे गुणही आहेत. नुस्ता क्रिकेटर हा निकष असता तर कपिलदेव आणि गावसकर होतेच की!!!!!
लता मंगेशकरांना भारतरत्न का
लता मंगेशकरांना भारतरत्न का दिले जावे बुवा? >> ठीक आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग भीमसेन जोशी , बिसमिल्ला अन लता यांना भारतरत्न मिळण्यात काय फरक आहे ?
सचिन पेक्षा चांगली वर्तणुक
सचिन पेक्षा चांगली वर्तणुक अजुन कुणाची असेल तर सांगा त्याचे नाव ........![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
पण त्याच बरोबर हे सगळे गुणही
पण त्याच बरोबर हे सगळे गुणही आहेत. नुस्ता क्रिकेटर हा निकष असता तर कपिलदेव आणि गावसकर होतेच की!!!!!<<<
मग होतेच की? होते काय आहेतच की? (व्यक्तिशः तर मला कपिलला ते मिळालेले अधिक रुचले असते पण ते माझे मत). कपिलच्या वेळीही बजबजपूरी होती, भ्रष्टाचार होता, कपिलही प्रामाणिक होता, अष्टपैलू होता, त्याने कर्णधार म्हणून विश्वचषकही जिंकून दिलेला होता, तोही भारताला हेही माहीत नसताना की आपण कधी विश्वचषकही जिंकू शकतो.
दुरुस्ती - मुळात खेळाडूला भारतरत्न मिळूच नये असे माझे मत आहे, पण द्यायचेच झाले व तुलनाच करायची झाली तर क्रिकेटर्सपैकी ते कपिलला मिळावे असे माझे वैयक्तीक मत आहे.
केदार जाधव, भारतरत्न हे
केदार जाधव,
भारतरत्न हे पुरस्काराचे नांव वाचले तरीही पुरस्काराबाबत काहीही माहीत नसलेला माणूसही म्हणेल की ज्या माणसाने देशातील नागरिकांचे, देशाचे भले करण्यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले त्याला हा पुरस्कार मिळत असणार!
बेफिकीरजी , मुद्द्यानुसार
बेफिकीरजी ,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुद्द्यानुसार जाऊया ना
मग भीमसेन जोशी , बिसमिल्ला अन लता यांना भारतरत्न मिळण्यात काय फरक आहे ?
Pages