पालक म्हणून मोठे होताना

Submitted by वेल on 13 November, 2013 - 06:25

ह्या विषयावर दुसर्‍या बीबीवर बोललं नाही गेलं म्हणून नीधप ह्यांनी दिलेल्या सजेशन नुसार हा बी बी काढला आहे.

<<इथल्या सर्व सुजाण पालकांनी आपापले नोकरी व्यवसाय आणि मूल वाढवणे हे दोन्ही करताना आई व वडिल दोघांनी काय प्रकारच्या तडजोडी केल्या, सपोर्ट सिस्टीम निवडताना/उभारताना काय विचार केला, कश्या प्रकारे कामाची आणि जबाबदार्‍यांची विभागणी केली इत्यादी गोष्टींबद्दल सांगितले तर जे अजून सुपात आहेत त्यांना मार्गदर्शन होईल. तसेच काय गोष्टींची उणीव जाणवली, त्यातून मार्ग कसा काढला, ती उणीव कश्या प्रकारे भरून निघू शकते इत्यादी गोष्टींची चर्चा झाल्यास अजून बरे.>>
<<'मुलांना त्रयस्थांच्या हाती सोपवतांना घ्यावयाची काळजी' >> हाही चर्चेचा विषय असेल.

पाळणाघरे, शाळा, बस सर्व्हिस इत्यादी सर्व्हिसेस कडून आपल्या काय अपेक्षा आहेत हेही लिहावे.

आपल्या पालकांनी काय केले त्याचा आपल्याला काय फायदा तोटा झाला हे आपण आपल्या दृष्टीकोनातून लिहिण्यासही हरकत नाही.

कृपया तुम्ही केलेत ते चूक आणि आम्ही म्हणतो ते बरोबर असा अ‍ॅटिट्युड ठेवू नये.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीती/ज्ञान्/मॉरल्स मुलांना जड जड पुस्तकांचा काढा किंवा टॅबलेट स्वरुपात देण्यापेक्षा नॉर्मल क्युट आणि थोडे पॉझिटिव्ह विचार असलेल्या गोष्टिंमधून दिले तर जास्त चांगले पचेल असे वाटते Happy
मुलं प्रत्येक गोष्टीतून शिकत असतात.त्यांचे आकलन वापरुन.
मला स्वतःला विली वोंका किंवा हॅरी पॉटर विशेष लहान मुलांची वाटत नाहीत.(स्पेशल लहान मुलांचे म्हणून आलेले हॉलीवूड चित्रपट पण.ते 'लहान मुलांच्या स्टाईल मध्ये चित्रपट बघायची मानसिक भूक न भागलेल्या' मोठ्या मुलांसाठीचे आणि अडल्ट्स साठीचे वाटतात.)
पण जिथे मी स्वतः टॉम अँड जेरी मध्ये माण्जरावर वरवंटा पडून ते सारखे चप्पट होताना, त्याच्या बुडाला उंदीर काहीतरी तापवून त्यावर बसायला लावून बूड नारिंगी होईपर्यंत चटका देताना पाहत मोठी झाले तिथे या मुलांच्या हॅरी पॉटर किंवा शिन चॅन किंवा हॉरीड हेन्री बघण्यावर काय बोलणार?
आय टर्न्ड आउट फाईन.आय होप दे विल टु.त्यातल्या त्यात अगदी पूर्ण हाणामारीचे पिक्चर, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया इतके त्यांनी एकट्यांनी बघणे टाळता आले तरी पुष्कळ.

डे केअर सारख्या भानगडीत का पडावे लागते ?
विभक्त परिवार म्हणून...??? आई वडील सोबत राहिले तर डे केअर ची गरज नाही .
सर्वच नाही पण काही पालक आजी आजोबा जिवंत असताना पण मुलांना डे केअर, प्ले स्कूल , पाळणाघर ,यांचा आधार घेतात......
माझा स्वतःचा अनुभव आहे माज्या मुलांना जी शिकवण आणि सांभाळ आजी आजोबा कडून मिळत आहे ते कोणत्या हि डे केअर, प्ले स्कूल , पाळणाघर इ. कडून मिळणार नाही..
(ज्यांचे आई वडील हयात नाहीत / वाढते वय आणि आजारपण मुळे त्रस्त असतील त्यांनी गैरसमज न करावा, पण मुंबई, पुणे सारख्या महानगरात बहुतेक कुटुंब हे विभक्तच आढळतात म्हणून ... )

सर्वच नाही पण काही पालक आजी आजोबा जिवंत असताना पण मुलांना डे केअर, प्ले स्कूल , पाळणाघर ,यांचा आधार घेतात...>>>>>>>>>> यामागे आजी आजोबांना मुलांना सांभाळायचे नाहीये, जमणार नाहीये, त्यांना एकाच जागी मुलांसाठी राहयचं नाहीये, गावी, मुलीकडे वैगेरे फिरता यायला स्वातंत्र्य हवंय ही कारणं असु शकतात की ओ बॉण्ड.

Pages