मी मुंबईत - बोरिवली पश्चिमेला राहाते. इमारतीत, पाचव्या मजल्यावर. गॅलरी नाही. छोटासे तीन फ्लॉवर बेड आहे ९ फूट बाय दीड फूट. ऊन येईलच याची गॅरण्टी नाही. दोन फ्लॉवर बेडचा अक्सेस घ्ययला तीन फुटाची भिंत आहे. इमारतीला अकराव्या मजल्यावर गच्ची आहे आणि खाली छोटी बाग आहे. सोसायटीने बागेत सध्या तगर लावली आहे. इमारतीच्या मागे मोठी मोठी आठ दहा झाडं आहेत, कडूनिंब, चिंच आणि मला वाटतं रेन ट्री आहे. त्या झाडांवर खारी, पोपट, साळुंक्या आणि कावळे असतात. त्यामागे मुसलमान लोकांची दफन्भूमी आहे. त्या मोठ्या मोठ्या झाडांजवळ मी कोरफड लावली होती, पण ती मरून गेली, कधी कशी मला कळलेही नाही.
मला स्वत:ला बागकामाचा काहीही अनुभव नाही. आवड आहे का नाही तेही माहित नाही. पण असं वाटत राहावं स्वत:ची भाज्यांची, फळांची बाग असावी. जेवणात स्वतःच्या बागेतल्या मिरच्या, टॉमेटो, वांगी, कोथिंबीर, कढीपत्ता, मेथी एवढ्या तरी भाज्या असाव्यात असे वाटते. आई तिच्या घरच्या बागेत झाडं लावली आहेत पण तिच्याच्याने देखभाल फारशी होत नाही (असे मला वाटते, म्हणजे वरचे वर माती खुरपणे, झादे छाटणे इ.)
घरी कुंड्या आणि माती आणली आहे, परंतु काय करावे कसे करावे सुचत नाही. एक छोटे लिंबाचे झाड येते आहे कुण्डीत. माझ्या घरात तुळस अज्जिब्बात टिकत नाही. आसाबांनी लावून पाहिली मी लावून पाहिली, अनेक वेळा लावून पाहिली. आई म्हणते, तिला "त्या" दिवसातला वारा लागतो आणि मागे स्मशानभूमी आहे म्हणून,पण मला ते पटत नाही. आता मी माझी छोटीशी बाग कशी बनवू? कुठल्या झाडापासून सुरुवात करू.
इमारतीच्या कम्पाउण्ड मध्ये मला वासाची मोठी होणारी झाडं लावायची आहेत, उदा. बकुळ किंवा मिडियम साईजची राहतील अशी रातराणी किंवा जुई चालतील. ती कशी लावायची? बियाणे कुठे मिळेल? नारळ आंबा लावता येतील का?
अनुभवी हुषार लोकांनी मला मदत करा.
वल्लरी, मुसलमानांच्या
वल्लरी, मुसलमानांच्या दफनभुमीत पांढर्या चाफ्याची झाडे असायला हवीत. त्यांचा वारा वगैरे काही नसतो.
सोसायटीच्या आवारात बकुळ, चाफा, बूच अवश्य लावा. तुमच्या परीसरात बिमलीची झाडे छान वाढतात, आवळ्याची पण वाढतात. लहान मुलांना तो खाऊ मिळू दे.
सिताफळ, पेरू, डाळींब पण छान वाढतील.
फ्लॉवरबेड मधे अनेक भाज्या लावता येतील. लाल माठ व इतर पालेभाज्या, अलकोल, मुळा, बीट यांच्या बिया दादर / भायखळा येथे मिळतील. भायखळ्यालाच दाणेदार खत मिळेल. ते वापरल्यास भाज्या छान जोमाने वाढतात.
गाजराची, बीटची वरची चकती कापून खोचा. सहज वाढेल. शोभिवंत पण दिसेल.
किचनच्या जवळ मिरची, कोथिंबीर, पुदीना, बेसिल, भजीचा ओवा, आले, लसूण, कांदा, सबजा अशी बरीच झाडे लावता येतील. या सर्वांची वाढ मर्यादीत असते.
फुलझाडे सांताक्रुझला विद्यानगरी मार्गावर मिळतील. डहाणूला पण चांगली नर्सरी आहे. त्यांच्याकडे गुलाब मिळतील, फक्त सुरवात करा. झाडे आपोआप वाढतील.
मुसलमानांच्या दफनभुमीत
मुसलमानांच्या दफनभुमीत पांढर्या चाफ्याची झाडे असायला हवीत. त्यांचा वारा वगैरे काही नसतो.
सोसायटीच्या आवारात बकुळ, चाफा, बूच अवश्य लावा. तुमच्या परीसरात बिमलीची झाडे छान वाढतात, आवळ्याची पण वाढतात. लहान मुलांना तो खाऊ मिळू दे. सिताफळ, पेरू, डाळींब >> मज्जा येईल. कुठे मिळतील, कशी लावायची, दादर / भायखळ्याला कुठे? मी जाऊन घेऊन येईन.
तुळशीला वारा - बायकांच्या "त्या" दिवसांचा. तुळस कशी टिकवू? बाजारात ते ढकलगाडीवर तुळस घेऊन उभे असतात त्यांच्याकडून घेऊन लावली होती.
बेसिल म्हणजे तुलस नाही का, मी तुळसच समजत होते.
ह्या सगळ्या झाडांच्या बिया मिळतील का?
त्या मोठ्या मोठ्या झाडांजवळ
त्या मोठ्या मोठ्या झाडांजवळ मी कोरफड लावली होती, पण ती मरून गेली, कधी कशी मला कळलेही नाही.
>>
सावलीत लावली होती का? अजिबात ऊन नाही मिळाले म्हणूनही कदाचित मेली असावी.
बोरीवली पश्चिमेला बाभई नाक्याकडून वजीराला जाताना उजवीकडे २-३ दुकाने आहेत. तिथे बियाणे, खते, बागकामाची अवजारे (खुरपी, छाटणी वगैरे) मिळतात. २-३ वर्षांपासुन त्या भागात जाणे नाही झाले त्यामुळे सध्याची परिस्थिती माहिती नाही.
बोरीवली पूर्वेला नेशनल पार्कात रोपवाटिका आहे. तिथे जरा बघा. चांगली झाडे मिळली तर. पर्यावरण दिनाला (५ जून) मोफत रोपे देतात.
तुळशीला रोज देवपूजेनंतर देवांच्या आंघोळीचे पाणी घालता का? ते घालू नका. आजकाल देवाला लावायच्या गंधात केमिकल्स असतात, त्याने तुळस मरते. (हा स्वानुभव)
दादर पश्चिमेला छबिलदास गल्लीतून प्लाझाकडे जाताना धुरु हॉलजवळ पायर्यांशी भिंतीला लागूनच एक नर्सरी आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची रोपे मिळतात.
जमल्यास पारिजातक, बेल, जास्वंद यांची झाडे पण लावा.
तुळस म्हणजे "होली" बेसिल.
तुळस म्हणजे "होली" बेसिल. इतालियन पदार्थात वापरतात ती बेसिल वेगळी. भाजी बाजारात नक्की मिळेल. तिची फांदी सहज जगते. पुदीन्याचीही जगते.
वल्लरिच घरी गवती चहा, तुळस,
वल्लरिच घरी गवती चहा, तुळस, जास्वंद आणि कोरफड ही चार झाडे हवितच म्हणे.
कोरफडीला मुंबईत २-३ दिवसातून एकदा पाणि घालावे लागेल, त्या झाडाला अती पाणी मारते.
सोसायटीच्या भिंतीवर,
सोसायटीच्या भिंतीवर, पॅशनफ्रुट, पडवळ, दूधी, कारली, शिराळी, घोसाळी यांचे वेल चढवा. भाज्या मुलांना विकू द्या. त्यातल्या पैशांनी त्यांचे खेळाचे साहित्य, पुस्तके विकत घ्यायला लावा. कुंपणाच्या कडेने भाजीचा, वडीचा अळू, सुरण लावा. तुमच्या परीसरात पावसाळ्यात करांद्याचा वेलही लावता येईल.
बाजारात चिवचिव वांगे नावाची पेरूसारखी दिसणारी भाजी मिळते. ते अख्खे फळ पेरा. त्याच्या वेलाला भरपूर फळे लागतात. केनयात ठिकठिकाणी त्याचे वेल आहेत.
शेवग्याचे झाडही लावा. त्याची फांदी सहज जगते. हादग्याचेही लावा. या दोन्ही झाडांचा पसारा फार नसतो.
कुंपणावर चढवायला रताळे, कोनफळ, डबलबीन्स यांचे वेलही चांगले. रताळ्याची पाने शोभिवंत असतात. कोनफळाचे देठ सुंदर गुलाबी रंगाचे असतात. मायाळूचा वेल पण लावा. त्याच्या निळ्या जांभळ्या रंगाच्या फळांनी मुलांना होळी खेळू द्या. फक्त शोभेची झाडे लावणे टाळाच.
बोरिवली पश्चिम कोरा केंद्र
बोरिवली पश्चिम कोरा केंद्र इथे नर्सरी आहे. आर एम भट्टड मार्ग, हरि ओम नगर
तुळशीला वारा - बायकांच्या
तुळशीला वारा - बायकांच्या "त्या" दिवसांचा. तुळस कशी टिकवू? >>> काय ??? सिरियसली ???
भायखळ्यालाच दाणेदार खत
भायखळ्यालाच दाणेदार खत मिळेल.==>
दिनेशदा
तुम्हाला हे सुचवायचे आहे का...
Namdeo Umaji Agritech India Pvt Ltd
(022) 23722628
161-167, Dr Ambedkar Road, Byculla, Mumbai - 400027
ह्याच्याकडे वांगी,टॉमेटो च्या बिया देखील मिळ्तात,,,,
Vertical Garden किंवा Live
Vertical Garden किंवा Live walls गुगलमधे सर्च करुन पहा त्यात तुम्हाला काही चांगले ऑप्शन्स मिळु शकतील. कमी जागेत खुप्सारी छोटी छोटी झाड लावता येतील.
http://www.eltindia.com/
दिनेश दा, सोसायटी च्या भिन्ती
दिनेश दा, सोसायटी च्या भिन्ती वरची कल्पना खुपच आवडली.
(No subject)
काल गुगल वर काही छान छान
काल गुगल वर काही छान छान पक्षी दिसलेत, नुसती चित्र बघुन सुद्धा ताण हलका होतो.
स्वर्ग नाचण (पिल्लु)
स्वर्ग नाचण (पिल्लु)
(No subject)
बाजारात चिवचिव वांगे नावाची
बाजारात चिवचिव वांगे नावाची पेरूसारखी दिसणारी भाजी मिळते.>>> दिनेशदा, चाव चाव अथवा सीमेबदनीकाई असे नाव आहे त्या भाजीचे. मुंबईत वाढते की नाही माहित नाही.
फ्लॅटमधे फ्लॉवर बेड्समधे मेथी, पालक, कोथींबीर, राजिगिरा असल्या पालेभाज्या व्यवस्थित काढता येतात.
सध्या आमच्याकडे भेंडी, पालक, मेथी, टोमॅटो, कोथिंबीर आणी वांगी लावली आहे. शेवंती लावली होती तिला फुले आलीच नाहीत. कढीपत्ता चांगला दोन पुरूष वाढलाय. कडुनिंब चांगला वाढला होता, मागच्या पावसांत त्यावर नारळ पडला आणि गेलाच.
राजगिरा पालेभाजी म्हणून
राजगिरा पालेभाजी म्हणून वापरतात? माझं ज्ञान बरच तोकडं आहे. कशी करायची ती भाजी? ही पालेभाजी उपासाला चालते का?
हो सतीश तेच ते दुकान.
हो सतीश तेच ते दुकान. त्यांच्या बिया आणि खते दोन्ही दर्जेदार आहेत. मी इथे पण वापरतोय.
नंदिनी, तिच भाजी ती. कधी कधी तिला कोंब आलेला असतो. लावली तर सहज रुजते. या भाजीची आवडती बाब म्हणजे यात काहीच टाकण्यासारखे नसते. हिच्या कोवळ्या पानाची पण भाजी करतात.
आमच्या सोसायटीत नारळाची झाडे लावली होती. बर्यापैकी नारळ मिळायचे. सभासदांनाच विकून ते पैसे मुलांसाठी वापरले जात. पण नंतर सगळी जमीन काँक्रीटची केल्याने आता नवीन झाडे लावायला वाव नाही.
ज्यांना जागा उपलब्ध आहे त्यांनी अवश्य अशी झाडे लावावीत. बोरीवली / कालिना अश्या ठिकाणी जिथे मँगलोरी लोकांची घरे आहेत त्यांनी बिमलीची झाडे लावलेली आहेत, आणि त्यांना भरपूर फळे लागतात.
मुंबईच्या बाजारात मात्र ती क्वचितच असतात.
मुंबईत फणसाचे / नीरफणसाचे ( विलायती फणस ) पण झाड चांगले वाढते, पण त्याचा पसारा फार असतो.
पण जांभूळ आणि आंबा सावलीसाठी चांगले. उन्हाळ्यातही यांची पाने शाबूत असतात.
पांढरा जाम पण मुंबईत छान वाढतो. आता लहान मुले या छोट्या छोट्या आनंदाला पारखी झाली आहेत. आपण आता हि झाडे लावली तर काही वर्षांनी मुलांना हे सुख अनुभवता येईल.
नीरफणस मुंबईत.. मी प्रयत्न
नीरफणस मुंबईत.. मी प्रयत्न करते झाड लावायचा. नुस्ता नीरफणस कुठे विकत मिळतो माहित आहे का? मुंबईत. आम्ही सगळे वेडे आहोत त्याच्यासाठी. मिळाला तर नक्कीच लावेन..
वल्लरी, राजगिरा माठ वर्गातली
वल्लरी, राजगिरा माठ वर्गातली भाजी आहे. तो पेरला तर सहज उगवतो. मुंबईत ही पालेभाजी मिळते.
जाड देठ आणि थोडी मोठी पाने असतात. इतर कुठल्याही पालेभाजीसारखीच करायची. देठ सोलून घ्यायचे.
परंपरेने नाही पण तर्काने विचार केल्यास ( ज्या अर्थी राजगिरा चालतो त्या अर्थी ) ही पालेभाजी उपवासाला चालायला हवी. उकळते पाणी वापरून पिठ भिजवल्यास, राजगिर्याच्या पिठाच्या चपात्याही करता येतात.
त्या पण उपवासाला चालायला हव्यात. मी कृती दिली होती.
उपासाला चालते का मला माहित
उपासाला चालते का मला माहित नाही. मी उपास केले तर निर्जळीच करते त्यामुळे.
राजगिर्याची पालेभाजी चवीला खूप मस्त लागते. माझ्या आवडत्या भाज्यांपैकी एक!!
पालक कशी लावायची? उगवायची?
पालक कशी लावायची? उगवायची?
पालकाचे बी मिळते
पालकाचे बी मिळते बियाण्यांच्या दुकानात. ते आणून लावले की पालक उगवतो, वरील पाने हवी तेव्हढी कापून घेतली तरी त्याला काय्म फुटवा येत राहतो.
आता मी पालक तरी लावतेच आणि तो
आता मी पालक तरी लावतेच आणि तो तरारला की फोटू टाकते.
मेथीचं सुद्धा पालकासारखं असत का? की ती सतत लावावी लागते. माझ्या मुलाने एकदा एका छंदवर्गात मेथी लावली होती. तीन चारच झाडं आली मुळापासून उपटली होती पण त्याचे ठेपले खाताना त्याला काय आनंद झाला होता मी लावलेल्या झाडाचे ठेपले बनवले म्हणून, चार वर्षाचा होता तो.
मेथी मी तरी आली की मुळासकट
मेथी मी तरी आली की मुळासकट उपटते. ईवढी बारकाली पानं कोण खुडत बसनार?
आपल्या घरातले मेथीचे दाणे
आपल्या घरातले मेथीचे दाणे लावले की कोणती मेथी येते, साधी की समुद्र मेथी? दुसर्या प्रकारच्या मेथीसाठी काय लावायच? समुद्रमेथी वाळून नको का लावायला?
कढीपत्ता म्हणजे कढीलिंबाची पानं का? कढीलिंबू म्हणजे नक्की काय?
गाजर बीट लावले तर फक्त पानांची भाजी करून खायची का?
आणि कुंड्या किती मोठ्या वापरायच्या?
कढीपत्ता म्हणजे कढीलिंबाची
कढीपत्ता म्हणजे कढीलिंबाची पानं का? कढीलिंबू म्हणजे नक्की काय?>> हो. कढीपत्ताला काही लोक कढीलिंब म्हणतात.
कडुनिंब म्हणजे हर्बल कॉस्मॅटिक वाल्यांचा आवडता "नीम के पत्ते" वाला. याचं खूप मोठं झाड आमच्या गेटच्या पुढच्या बाजूला रस्त्यावर आहे. त्याची सावली आमच्या घराच्या अर्ध्या गच्चीवर येते. अगदी ऐन उन्हाळ्यात सुद्धा त्या सावलीचा थंडावा जाणवतो.
मेथीच्या बिया पेरल्या की साधी मेथी येते, इथे मायबोलीवर कुणीतरी बाटलीमेथी नावाचा इण्टरेस्टींग प्राकार लिहिला होता. तोदेखील घरच्या घरी करता येईल.
.
.
घरातल्या कुंडीत (८-९ लिटर ची
घरातल्या कुंडीत (८-९ लिटर ची कुंडी)साध्या लिंबाचं झाड आलं आहे. दोन फूट उंच झालय, त्याला मातीत लावायला हवं का?
वल्लरीच, घरी भाज्या
वल्लरीच, घरी भाज्या निवडल्यावर उरलेली सालं, देठ वगैरे बारीक कापून तुळशीत टाका. दिसायला जरा बरं दिसणार नाही. पण पानांचा साईझही वाढलेला दिसेल आणि तुळस फोफावेलही. स्वानुभव. केमिकल्स असलेलं गंधमिश्रीत पाणी घालत असाल तर ते घालू नका. बाथरुममध्ये टाकवत नसेल तर बेसिन मध्ये ओता. जरी देवांच्या अंघोळीचं असलं तरी ते हार्मफुल असेल तर ओतून टाकलेले बरे. देव अज्जिबात रागावणार नाहीत
Pages