Submitted by स्वाकु on 12 November, 2013 - 03:02
तिच्याशी नाते माझे, नावापुरतेच सुंदर आहे
जरी दिसे जोडलेले तरी, अंतरी समांतर आहे
तैलथेंबासम आयुष्य, पाण्यावर तरंगत आहे,
होत नाही एकजीव, वेगळे होणे अशक्य आहे
वेदना नात्यामधली, साहवेना ती मला आता,
दाह उरला नाही जरी, चटका तरी लागत आहे
संपतच नाही रात्र, भिती वाटे स्वप्नांची मला
वेळ जाता जाईना, दिवस असाच सरत आहे
जरी वाद होते तरीही, ते जगणे जिवंत होते
शांत शांत तू अन मी, घर दोघांचे स्मशान आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तैलथेंबासम आयुष्य, पाण्यावर
तैलथेंबासम आयुष्य, पाण्यावर तरंगत आहे,
होत नाही एकजीव, वेगळे होणे अशक्य आहे>>
खूप आवडला!!
प्रत्येक द्वीपदीत गझलियत
प्रत्येक द्वीपदीत गझलियत ठासून भरलेली !!!
लय लक्षात येत नसली तरी गझल नाही असे म्हणवत नाही
सर्व द्वीपदी खूप आवडल्या मनाच्या खूप खोलातून आलेत शब्द
धन्यवाद
शुभेच्छा