पेपर क्विलिंग दिवाळी शुभेच्छा पत्रे

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 11 November, 2013 - 07:42

नमस्कार मित्रमैत्रिणींने,
सर्वप्रथम दिवाळीच्या उशीराच्या शुभेच्छा !!
खुप म्हणजे खुप दिवसांनी आलेय इथे..तुम्हा सगळ्यांच्या खुप खुप कलाकृती बघुन अक्षरशः थक्क झालेय..काय आणि किती किती करता बाबा तुम्ही..मस्त एकदम.
मी ही जरा काही गोष्टी बनवण्यात व्यस्त होती..दिवाळी शुभेच्छा पत्रे हो...हल्ली हे सगळं भुतकाळात जमा झालेय.पुर्वी ज्याम धमाल यायची ..खुप कार्ड्स आम्ही हाताने बनवायचो..मग आमचे बाबा ही भली मोठी नावांची यादी द्यायचे आम्हाला..मस्त मजा वाटायची.पण आता नेट मुळे सगळंकसं बदलालयं नै..आधी १२३ ग्रिटींग्ज कार्ड्स वरुन मेल पाठवली जायची मग एखादा फॉर्वर्ड एसएमएस चालुन जायचा आणि आता तर काय वॉस्सप वर पटापटा बिन पैशाचा फ्री मेसेज दुसर्‍याच्या विंडोत डोकावतो...खरं म्हणजे आपणच आपल्याला अशा वाईट सवयी लावतो आणि मग जुनं ते सोनं म्हणुन आपणच रडतो... हो की नाही????मी मात्र ह्याला अपवाद आहे.मी दरवर्षी किमान १० कार्ड्स बनवतेच..स्वतः बनवलेली शुभेच्छा पत्रे आपल्या जिवलग मैत्रिणीला किंवा नातेवाइकांना पाठवताना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद होतो.चला तर मग पुढल्या दिवाळी करता कमीत कमी ३ कार्ड्स तर बनवुयात..
माझा यंदा जोर माझा पेपर क्विलिंग वर होता..बघा कसा ते..
1375929_10200390350992152_751338534_n.jpg1377169_10200396624028974_771014277_n.jpg1385352_10200390350312135_1689918281_n.jpg599811_10200396623748967_1411379214_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

खूप सुंदर. शुभेच्छापत्रांसाठी क्विलिंगआर्ट वापरण्याची कल्पना आवडली. पोस्टानं पाठवायचं झालं तर कसं पाठवता? एवढी मेहेनत घेऊन केलेलं मुडपून सपाट व्हायची भिती.

छान!

मृण्मयी,
मी पाठवलेली कार्ड्स सगळ्यांना व्यवस्थित पोचलीत.मला नाही वाटतं मुड्पून जातील.तसेही कवर्स थोडी मोठीच असतात.सो..ईझीली पॅक होतात.
धन्यवाद सगळ्यांचे !