लक्ष्मणरेखा!

Submitted by Aditiii on 26 November, 2008 - 02:19

काही सांगायच आहे तुला.

अग बोलना मग.

म्हणजे माझ्या ऑफीस मधून मला एक वर्षासाठी बाहेर जायचा चान्स मिळणार आहे. मी म्हणल आधी तुला विचाराव.

तु कधीपासुन प्रत्येक गोष्ट नवर्‍याला विचारून करायला लागलीस?

तस नाही रे पण एक वर्ष.. खूप जास्त आहे रे! तुला जमेल का सगळ माझ्याशिवाय? कस करशील एकटा सगळ?

तू माझी काळजी करू नकोस, लग्नाआधीच तुला सान्गितल होत ना मी तुझ्या करीयर्च्या आड येणार नाही म्हणून? बिनधास्त जा तू. आणी राहता राहीला मला त्रास होण्याचा प्रश्न तर मी आल्यावर त्याची व्यवस्थित भरपाई करून घेइन अस म्हणत अजय नी सीमाला जवळ ओढल!

तिच्या पुरता हा प्रश्न फारच लवकर सुटला होता!

बघता बघता जायचा दिवस उजाडला. अजय पण तिच्या एव्हढाच एक्साईट झाला होता. किती मदत केली होती त्यानी? माझी निवड मुळीच चुकली नाहिये, सीमाच्या मनात विचार आला.

नवीन शहर, नवीन माणसं! तिला नेहेमीच हौस होती ह्या सगळ्याची! नवीन अनुभव, नवीन आव्हान ती नेहेमीच स्वीकारत आली होती. ह्याच स्वभावाच तर अजयला फार कौतुक होत. आणी आजही त्यानी तिला नेहेमीसारखाच सपोर्ट केला होता. तिच्या ऑफीस मधे सग्ळ्यांनाच तिच जाण अशक्य वाटत होत पण अजयनी सगळ्यांचे अन्दाज चुकवले होते. किती समजुतदार आहे माझा नवरा!

तीला सेटल होई पर्यन्त एक महीना गेला. छान रुळली होती ती. इथे सगळ्यान्ची ओळख तर झालीच होती, सगळच वेगळ पण छान होत दिवस कसे जात होते कळतच नव्हत पण मधूनच अजयची आठवण अस्वस्थ करायची. जरी फोन, मेल्स चालू असले तरी विरह तीलाही जाणवायचा! पण ती कधीच ते अजयला जाणवू नाही द्यायची.

तिच्याच डिपार्ट्मेन्ट मधे काम करणारा 'जो'. सदा हसतमुख! मधे तिला बर वाटत नव्हत तेव्हा तत्परतेने तिची काळ्जी घेतली होती त्याने. अगदी अजयसारखीच! अलीकडे सारखीच तुलना चालायची तिची दोघांमधे! कधी कधी तर जो जास्त उजवा वाटायचा अजय पेक्षा! आपल्याला तो आवडायला वगैरे लागलाय काय? तिचा तिलाच राग यायचा अशा विचारांचा! पण कितीही विचार झटकायचा प्रयत्न केला तरी तेच तेच विचार तिच्या मनात कायम पिंगा घालत असत.

अनेकदा जो तिच्या बरोबरच असायचा, त्याचा बडबड्या स्वभाव तिला फारच आवडायचा. कायम उल्हासित, प्रसन्न. त्यच्या सहवासात कोणीही आपली काळजी विसरूनच जायच. तो तिला फार जपायचा. अलिकडे ऑफिसच्या बाहेरही भेटीगाठी खूप वाढल्या होत्या. तिला त्याचा सहवास खूपच हवा हवासा वाटू लागला होता. चुकुन होणारे त्याचे स्पर्श ती मनात जपून ठेवू लागली होती. हे जे काही होतय हे चूक आहे हे कळून सुद्धा ती त्याच्याकडेच ओढली जात होती!

अलिकडे अजय पण फार बिझी झाला होता. तिला बरच वाटायच ते. नाहीतरी त्याच्याशी बोलताना अलीकडे तिला फार अपराधी वाटायच. त्यामुळे शक्यतो ती त्याच्याशी बोलणच टाळायची. तो तिकडे कामात गर्क आणी ही इकडे प्रचंड उलाघालीत सापडलेली!

हे प्रेम आहे की फक्त आकर्षण असा विचार करुन गुंता अजून वाढवण्यापेक्षा तिनी सरळ जाऊन त्याच्याशी बोलायचे ठरवले. कारण जी प्रेम असो वा आकर्षण ते तिच्यावर आता राज्य करू लागल होत. ती भावना आता जास्तच द्रुढ झाली होती. जेव्हा हे असह्य झाल तेव्हाच तीनी जो ला गाठल आणी सगळ मनातल सांगितल. जो ने कबूल केल त्यालाही हे आवडू लागल होत. ती, तिचा सहवास, स्वभाव सगळ काही.

असेच बरेच महिने उलटले ती आणी जो एकमेकांमधे पुर्ण गुन्तले होते, मनाने आणी शरीराने सुद्धा! तीनी सर्वस्व त्याला अर्पण केल होत. अजयशी पुसटसा कॉन्टॅक्ट तो जेव्हा करेल तेव्हाच होत होता. तीला जरी वेळेची जाणीव नसली तरी तो थाम्बला नव्हताच! एक दिवस कॉन्ट्रॅक्ट सम्पत आल्याची मेल येऊन थडकली.

दिवसभर विचार करुन डोक सुन्न झाल होत. काय निर्णय घ्यावा? दोनच तर ऑप्शन होते, परत जायच किंवा कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करायच. अजयनी तर ती परत येणार म्हणून ग्रॅन्ड प्लॅन्स बनवायलाही सुरुवात केली होती. पण तिच मन तयारच होत नव्हत परत जायचा विचार करायला. प्रचंड अपराधी भावना दाटून यायची आणी ते नकोच अस वाटायच इथे जेव्हढी ती अस्वस्थ होती त्याहूनही जास्त जो अपसेट होता, तीला आता जो च जास्त जवळचा वाटू लागला होता. शेवटी तिने निर्णय घेतला, कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करण्याचा!

आज एकदमच रीलॅक्स होती ती, कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करण्याची प्रोसेस सुरू झाली होती आणी ती नी अजयला अजून काहीच सान्गितल नव्हत, काय सान्गाव ह्याचा विचार करत असतानाच बेल वाजली, कोण असेल असा विचार करत तीने दार उघडल आनी तीला भोवळ यायचीच बाकी रहिली होती. साक्षात अजय समोर होता!

का? का? अस करतेयस सीमा? मला कळवल ही नाहीस? मला विचारावस नाही वाटल का गे तुला? तुझी हौस म्हणून तुला पाठवल ग मी, पण आता बास ना चल ना परत मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. बोल ना काहीतरी.

अजय असाच काहीबाही बोलत होता पण तिच्या डोक्यात काही शिरत नव्हत, ती आलेल्या अनपेक्षित प्रकाराला तोंड देण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत होती.

अजय मला नाही गरज वाटली तुला विचारायची. खरच सांगतेय मी. त्याच्या आश्चर्याचे भाव असलेल्या चेहर्‍याला टाळत ती म्हणाली.

काय बोलतेयस तु हे? मी नवरा आहे तुझा?

तू कधीपासून नवरेशाही गाजवयला लागलास?

सीमा प्लीज भांडण नको. अग मला एव्हढच म्हणायच आहे की तू माझा काही विचार केला आहेस का, हा निर्णय घेताना? काय विचार करून ठरवलस माझ्यापासून दूर रहायच? तुला इथे आवडत असेल तर आपण इथेच राहू. मी पण येतो इथे, सांग ना काय करायच आपण?

अजय मला वेगळ व्हायचय?
का$$$$$$$$$$$$$य? अजय जवळ जवळ किंचाळलाच.

तुझ डोक फिरलय का? काय बोलतेयस तू हे? माझ्या पासून वेगळ व्हायचय तुला? तुझ्या अजयपासून? का? ही थट्टा आहे का? तू माझी परीक्षा बघतेयस ना? सांग ना? तिला गदागदा हलवत अजय म्हणाला.

नाही ही थट्टा मुळीच नाही. मला खरच वेगळ व्हायचय.

का ग सीमा? काय चुकल माझ? बघ माझ्या डोळ्यात बघ!

किती कारुण्याचे भाव दाटून आले होते त्या दोन डोळ्यात? पण स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवत सीमा म्हणाली माझ प्रेम आहे माझ्या एका कलिगवर आम्ही एकत्र रहायच ठरवलय... कळल कारण आता तरी माझी सुटका कर ह्या नात्यातून, मला खरच वेगळ व्हायचय! तुझ्यापासुन, आपल्या नात्यापासून!

अजय सोफ्यात कोसळला, पण सीमा त्याला सावरायला नाही गेली, आता अपेक्षा करूनही काय फायदा म्हणा अजय स्वतःशीच म्हणाला तू खूप दूर गेलियेस, खूप दूर, पण हे सगळ कळूनही माझ अजूनही प्रेम आहे तुझ्यावर! अजूनही तेव्हढच! आपण परत सुरूवात करूया, परत, तुला हवय तस करू सगळ! पण प्लीज मला सोडून जाउ नकोस प्लीज! तिच्या पायाशी बसून गदगदणार्‍या अजय्चे शब्द तिच्या कानात तर शिरत होते पण मनावर काहीही परीणाम करू शकत नव्हते.

पराकाष्ठेचे प्रयत्न करून, विनवण्या करून अजय थकला आणी जायला निघाला त्याच्या आर्जवांचा तिच्यावर काही एक परीणाम झाला नव्हता. जाताना एव्हढच म्हणतो की मी तुझी आयुष्यभर वाट बघत राहीन काहीही झाल तरी! तो दरवाज्याला हात घालणार एव्हढ्यात तीचा फोन वाजतो आणी पलिकडून मेसेज येतो. जो मेट विद अक्सिडेंट, डेथ ऑन द स्पॉट! अजय अजून समोर उभा आहे तिच्या चेहेर्‍यावरचे बदलणारे भाव वाचतोय, काय झाल? त्याचा आवाज येतोय पण खूप दूरून! "काही नाही" तिचाच आवाज तिला ओळखू येत नाही, अजय हळूहळू दूर जातोय तिचा सर्वात जवळची व्यक्ती! पण तिनीच खूप परक करून टाकलय त्याला! तोडलेत ते बंध तीने! ती निग्रहाने दार लावून घेते आणी अजय आवाजाच्या ट्प्प्यात नाही अशी खात्री झाल्यावर तिचा बांध सुटतो! लक्ष्मणरेखा तिनी ओलान्ड्ल्याबद्दलच्या शिक्षेची ती सुरुवात असते!

गुलमोहर: 

शेवट फारच आदर्शवादी झाला आहे....

आता करण जोहर यावर पिक्चर काढील Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~
काम से डरो नहीं काम और काम को करो नही !!!

कथा एकदम बॉलिवूड स्टाईल..
~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

वा वा फारच छान
~~~~~~~~~~~~`
पण काहितरी राहिलय असचं वाटतंय
!!!!!!!!!!!!!!!!
योगेश

सुरेख प्रयत्न. जगमोहनची प्रतिक्रिया पटली. याचा अर्थ हा नाही की शेवट आदर्शवादी नसावा. कदाचित नियतीवर तुमचा विश्वास असावा म्हणून तुम्ही गुन्ह्याबरोबर शिक्षेचीही तरतुद केलीत.

नमस्कार,

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

माझा हुरूप नक्किच वाढला आहे.

चांगली आहे. छोटीशी.