Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04
जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री शाबरी कवचाचा पाठ स्वत:
श्री शाबरी कवचाचा पाठ स्वत: केल्यास उत्तम पण काही अडचणी असल्यास इतर कोणी केल्यास चालतो .
ही इतर व्यक्ती शक्यतो अशी असावी जी त्या पिड़ीत व्यक्तीची खरी हितचिन्तक आहे. काही रकमेच्या बदल्यात कोणा ब्राह्मणाकडून पाठ करवून घेतला जावू शकतो पण असे करणे टाळावे
धन्यवाद मनिमाऊ.
धन्यवाद मनिमाऊ.
ससंकल्प पाठ खालील प्रमाणे
ससंकल्प पाठ खालील प्रमाणे करावा
पठण मंगळवार, शुक्रवार किंवा देवीच्या नवरात्रात सुरु करावे. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी दिवेलागणीची वेळ ठरवून घ्यावी. अनुष्ठानाआधी स्नान करावे ( निदान हआत पाय स्वच्छ धुवावे). लाल कपड़े घालावे (optional). लाल आसनावर बसावे (optional). पूजेसाठी शाबरी देवीची (न मिळाल्यास दुर्गा देवीची) तसबीर समोर ठेवून पुजा करावी. तूपाचा दिवा लावावा. हळद, कूंकू, गंध, अक्षता, फुले वहावीत. नैवेद्य दाखवावा. मग खालील प्रमाणे संकल्प करावा.
माते आजपासून मी हे कवच पठण सुरु करीत आहे. तू माझे संकटे, चिंता, क्लेश, शत्रु, आधिव्याधि, दुःख, दारिद्र्य यापासून संरक्षण कर. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. माझे सर्व मनोरथ तू पूर्ण कर. असे म्हणून पळीभर पाणी उजव्या हातावरुन ताम्हणांत सोडावे व नमस्कार करावा.
ज्या कार्यासाठी आपण जप करीत आहोत त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. ते कार्य यशस्वी होते.
मग कवच पठणास बसावे. अनुष्ठानकाळी हे कवच ११, १८, २७ दिवस रोज २१ वेळा पठण करावे. महत्वाच्या कार्यसिद्धि साठी ३,५,७,११ दिवस रोज २१ असे अनुष्ठान करावे.
अनुष्ठान सुरू असताना शक्यतो बैठकीचीं जागा बदलू नये. खंड पडू नये. प्रवासात / वाहनात वाचू नये. मध्ये काही अडचण आल्यास (तब्येत खराब,,/ मासिक पाळी, इ.) तितके दिवस घरातील इतर व्यक्तीने पाठ करावा.
आणि सर्वात मःहत्वाचे की पूर्ण विश्वासाने पाठ पूर्ण करावा.
(माझा स्वानुभव आहे. मनोभावे मातेला शरण जा प्रचिती जरूर येते )
व्यक्तिद्वेषावर
व्यक्तिद्वेषावर विश्वप्रार्थनेचा जबरदस्त उपयोग होतो.
जेव्हा जेव्हा त्या व्यक्तिचा विचार मनांत येईल तेव्हा तेव्हा,
ज्या व्यक्तिचा द्वेष वाटतोय ती व्यक्ति डोळ्यासमोर ठेऊन विश्वप्रार्थनेतल्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तिला मिळत आहेत हा भाव धरायचा.
ज्या व्यक्तिचा आपण द्वेष करत असतो त्या व्यक्तिचा आपल्या प्रती असलेला दृष्टिकोन बदलण्याची ताकद यांत आहे.
आपलाही दृष्टिकोन सकारात्मक होतो हे वेगळे सांगायला नको.
द्वेष हा पराकोटीचा नकारात्मक भाव झाला. पण एखाद्या व्यक्तिची आठवण जरी आपल्याला त्रासदायक होत असेल तर हा उपाय आपल्याला त्रासमुक्त करतो.
विशेषकरून जे साधक ध्यानाचा अभ्यास करतात, त्यांना ध्यानांत येणारे विक्षेप या पध्दतीने खूप मोठ्याप्रमाणात कमी झाल्याचा अनुभव येतो.
हा प्रकार अवघड आहे पण प्रभावी आहे.
सद्गुणी बाळ होण्यासाठी कोणते
सद्गुणी बाळ होण्यासाठी कोणते स्तोत्र/ साधना आहे?
<<सद्गुणी बाळ होण्यासाठी
<<सद्गुणी बाळ होण्यासाठी कोणते स्तोत्र/ साधना आहे>>
नुस्त् स्त्रोत्र पठण करून मुले होत नसतात.
मनीमाऊ आपले हसणे अस्थानी आहे
मनीमाऊ आपले हसणे अस्थानी आहे असे नाही का वाटत?
आहे तर, जगद्गुरू
आहे तर, जगद्गुरू तुकोबारायांनी लिहिलेत 2 मंत्र त्यासाठी
नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥
हा मंत्र 47 वेळा उपाशीपोटी म्हणायचा.
हा झाला की मग
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी!
हा मंत्र 83 वेळा म्हणायचा.
<< मनीमाऊ आपले हसणे अस्थानी
<< मनीमाऊ आपले हसणे अस्थानी आहे असे नाही का वाटत?>>
भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागते . पण मला प्रश्नाचा रोख पण जरा वेगळा वाटला. Anyway सन्तती प्राप्तीसाठी ललिता सहस्रनामाचे पठन करावे असे म्हणतात.
नाही मनीम्याऊ, संतती
नाही मनीम्याऊ, संतती प्राप्तीकरता षष्ठीदेवीचे स्तोत्र वाचतात. स्तोत्रे ही सकारात्मकता आणण्यासाठी असतात. जेणे करुन तुम्ही प्रयत्न करण्याचे थांबवु नये. कारण सगळे डॉक्टरी उपाय करुन झाले तरी यश नसेल तर माणुस निराश होतो. मन शांत रहात नाही, पण स्तोत्रे वाचली की मन शांत होऊन निदान नवीन मार्ग तरी मिळतो.
ललितासहस्त्रनाम हे तसे कठिण
ललितासहस्त्रनाम हे तसे कठिण आहे. पण यश मिळते असे म्हणतात.
भीती हि मानसिक अवस्था आहे.
भीती हि मानसिक अवस्था आहे. आणि प्रत्येक माणसाला कसलीतरी भीती वाटतच असते. स्तोत्र आपल्याला मनोबल देतात हे खरंच, पण ते आपला विश्वास असेल तर. बाकी स्तोत्र किंवा पूजा वगैरे केल्यामुळे समस्या दूर होतात हि अंधश्रद्धा आहे. तुमची मानसिक अवस्था चांगली असेल तर तुम्ही योग्य विचार करून समस्येवर मार्ग काढू शकता म्हणून समस्या दुर होतात.
बाकी पुराणाप्रमाणे प्रत्येक देवाला सृष्टी अविरत चालू राहावी म्हणून कामं वाटून दिली आहेतच. मग इतकी महत्वाची कामं करताना देव तुमच्या - आमच्या सर्वसामान्य आयुष्यात ढवळाढवळ कशाला करतील?
तरी स्तोत्र जरूर म्हणावीत आणि चालीत, आनंद घेऊन म्हणावीत. भाषा शुद्ध होते, उच्चार स्पष्ट होतात, एका जागी बसून स्तोत्रपठण केल्याने एकाग्रता वाढते. आणि श्रद्धा असेल तर मनोबल सुद्धा वाढते. समस्या वगैरे तुमच्या तुम्हीच सोडवणार आहात. स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे सगळं छान होईल.
धन्यवाद रश्मी ताई.
धन्यवाद रश्मी ताई.
@ खग्या.. सम्पूर्ण प्रतिसादा साठी +1
<<< स्तोत्र किंवा पूजा वगैरे
<<< स्तोत्र किंवा पूजा वगैरे केल्यामुळे समस्या दूर होतात हि अंधश्रद्धा आहे. >>>
तुमची श्रद्धा नाही तर नसू दे. पण ज्यांना स्तोत्रे आणि मंत्र म्हणायचे आहेत, त्यांना खुशाल म्हणू दे की.
<<< संतती प्राप्तीकरता षष्ठीदेवीचे स्तोत्र वाचतात. >>>
फार पूर्वी हॉस्टेलवर असताना मंत्र ऐकला होता, तो असा:
राम नाम कहते है सभी, पर दसरथ कहे न कोई
दसरथ कसरत नही करत तो, राम भी कैसे होई?
हा मंत्र म्हणून कसरत केल्याने मुले होतात म्हणे. खरे खोटे माहीत नाही, पण इच्छुकांनी प्रयत्न करून बघावा.
बाकी स्तोत्र किंवा पूजा वगैरे
बाकी स्तोत्र किंवा पूजा वगैरे केल्यामुळे समस्या दूर होतात हि अंधश्रद्धा आहे>> समस्या दूर होत नाहीत तर त्याचा सामना करण्याची श्रध्दाळू माणसाला मानसिक ताकद मिळते. त्यामुळे त्याला समस्या दूर झाल्यासारखी वाटते. अंधश्रद्धा हा पिवळ पितांबर आहे.. बर वाटतय ना मग झाल असा विचार असतो. तो अस्तित्व टिकवण्यासाठी उपयुक्त आहे
या अशा धाग्यावर फक्त हिंदू
या अशा धाग्यावर फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश असावा. बिगरहींदू भावना दुखावणाऱ्या कॉमेंट करतात.
मी तर म्हणते की ज्यांना
मी तर म्हणते की ज्यांना नातवंडे- पतवंडे झालीत अशांनी तर इथे येऊच नये. उग्गाच मोह वाढतो .
@खग्या बाकी पुराणाप्रमाणे
@खग्या बाकी पुराणाप्रमाणे प्रत्येक देवाला सृष्टी अविरत चालू राहावी म्हणून कामं वाटून दिली आहेतच......>>>> कुठल्या पुराणात हे वाचावयास मिळेल? सांगू शकाल काय?
वेंकटेश स्तोत्र रोज एकवीस
वेंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा म्हणजे एकाच बैठकीत का दिवसभरात कधीही वेळेच्या उपलब्धतेनुसार चालेल . उदा: सकाळी १० वेळा संध्याकाळी उरलेले .
वेंकटेश स्तोत्र रोज एकवीस
वेंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा म्हणजे एकाच बैठकीत का दिवसभरात कधीही वेळेच्या उपलब्धतेनुसार चालेल>>> एकाच बैठकीत एकवीसवेळा हे आजच्या वेगवान जगात शक्य होत नाही त्यामुळे विभागून चालेल. स्तोत्र म्हणजे इष्ट देवतेची स्तुती किंवा गुणगान. त्यात भाव महत्वाचा मानल्याने ए काच बैठकीत असणे गरजेचे नाही व ते व्यवहार्यही नाही
मी असं ऐकून आहे कि याची
मी असं ऐकून आहे कि याची सुरुवात रात्रीच (१२ वाजता) करावी, हे कितपत खरं आहे ?
आणि सर्वात महत्वाचे मराठी स्तोत्र म्हणायचे कि संस्कृत म्हणावे ?
मी असं ऐकून आहे कि याची
मी असं ऐकून आहे कि याची सुरुवात रात्रीच (१२ वाजता) करावी, हे कितपत खरं आहे ?>>> ज्यांनी तस केल असेल त्यांच्यासाठी ते खरच आहे. पण ते तुम्हाला सोयीचे नसेल तर करण्याची आवश्यकता नाही.
आणि सर्वात महत्वाचे मराठी स्तोत्र म्हणायचे कि संस्कृत म्हणावे ?>> तुम्ही संस्कृतप्रेमी आहात का? उगीच अट्टाहासाने संस्कृत म्हणण्याची आवश्यकता नाही. मराठीत आहे ना! पण जीभेला वळण लावण्याचा व्यायाम करायचा असेल तर संस्कृत म्हणा! व्हाईसकल्चरवाले तसे काही व्यायाम करतात.
तुम्ही संस्कृतप्रेमी आहात का?
तुम्ही संस्कृतप्रेमी आहात का?>> माझं संस्कृत आणि मराठी दोन्ही जवळपास तोंडपाठ आहेत
सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा.
सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा. आज सुदैवाने बुधवार आणि एकादशीचा योग आलाय जुळून. रात्री व्यंकटेश स्तोत्र पठण करण्याचा मानस आहे. त्याचे काही विशेष नियम असतात का ? कोणाचे काही अनुभव असल्यास कृपया इथे लिहा.
रच्याकने आपल्या इथल्या एका साधना-उपासनेत गती असणाऱ्या आयडीने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे बटुक भैरव स्तुतीचा फार छान अनुभव आला. ती स्तुती ग्रामीण हिंदी भाषेत असून एका नाथ सिद्धांची रचना आहे. पण ते साहेब इथे टाकण्यास मनाई करतात.
श्रावणात दर गुरुवारी गजानन
श्रावणात दर गुरुवारी गजानन महाराज्यांच्या पोथीतला एक्तरी अध्याय वाचायाच मानस आहे .
कुठला वाचावा
१. चारही गुरूवारी अवतरणिका
१. चारही गुरूवारी अवतरणिका म्हणजे शेवटचा अध्याय ज्यात सर्व पोथीचे संक्षिप्त एकेका ओवीत देतात तो वाचता येईल. त्यात सर्व पोथीचे सार येते असे मानतात.
२. सकाम असेल तर अध्यायांच्या फलश्रुती प्रमाणे तुमच्या इंटरेस्टचे ४ निवडा.
३. पोथी हातात घेऊन त्यांना प्रार्थना करा --- तुमची इच्छा असेल तो वाचून घ्या. डोळे मिटून पोथी उघडा. येईल तो वाचा.
४. क्रमाने वाचा, बाकीचे मग सवडीने पूर्ण करा सुटीच्या दिवशी वगैरे वाचून. २१ च आहेत ना.
>>>श्रावणात दर गुरुवारी गजानन
>>>श्रावणात दर गुरुवारी गजानन महाराज्यांच्या पोथीतला एक्तरी अध्याय वाचायाच मानस आहे>>>> शुभेच्छा. आपला संकल्प सिद्धीस जावो.
>>>>पोथी हातात घेऊन त्यांना
>>>>पोथी हातात घेऊन त्यांना प्रार्थना करा --- तुमची इच्छा असेल तो वाचून घ्या. डोळे मिटून पोथी उघडा. येईल तो वाचा.>>>> अगदी हेच्च म्हणणार होते. जो आकडा मनात येईल, तो अध्याय वाचा. मी करते गुरु चरीत्र वाचताना.
कमीत कमी काम करून जास्तीत
कमीत कमी काम करून जास्तीत जास्त पगारवाढ होण्यासाठी कोणतं स्तोत्र असेल तर सांगा.
सलग 21 अध्याय रोज एक अध्याय
सलग 21 अध्याय रोज एक अध्याय अशा क्रमाने वाचा.42 दिवसात 2 वेळा वाचून होईल. स्नान करून पाटावर बसून वाचल्यास उत्तम. फार वेळ लागत नाही.
Pages