पास्ता बा रा ए वे ए ठि विनय श्टाईल

Submitted by परदेसाई on 21 October, 2013 - 09:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
१. पेने पास्ता (नळ्या) चार मुठी / २ ओंजळी.
२. Bertoli/Ragu किंवा तत्सम पास्ता सॉस २ १/२ ते ३ मोठे डाव.
३. Light cream (किंवा Half & Half) २ १/२ ते ३ मोठे डाव.
४. लसून पेस्ट किंवा चिरलेली.
५. १ मोठा टोमॅटो.
६. तेल ४ टेबलस्पून (Canola oil / Vegetable Oil)
6. ऑरेगानो ( सुपरमार्केटमधे मसाल्याच्या बाटल्या असतात तिथे मिळतात, चुरडलेली सुकी पाने असतात).
७. ईटालियन अर्ब्स (मेकॉरमिक किंवा तत्सम कंपनीचे. सुपरमार्केटमधे मसाल्याच्या बाटल्या )
८. सुक्या मिरचीचा चुरा ऐच्छिक...
९. साखर.

क्रमवार पाककृती: 

पास्ता शिजवा: लिटर सव्वा लिटर पाणी उकळत ठेवा. त्यात १ टेबलस्पून तेल, १ ते १ १/२ टीस्पून मीठ आणि १ ते १ १/२ टिस्पून साखर घाला. पाणी नीट उकळू लागले की त्यात पास्ता टाकून तो शिजवून घ्या.
(मी एका माणसाला दोन पुरेपूर भरलेल्या मुठी असं प्रमाण धरतो). पास्त्याची एकादी नळी चावून बघा. आतून घट्ट/सुकी वाटली तर अजून शिजायला हवी, आणि अगदीच नरम वाटली तर जास्त शिjaली. या दोन्हीं state च्या मधे नीट शिजवा. लगेच गाळून पाणी काढून टाका. लगेच थंड पाण्यात पास्ता धुवून घ्या. पास्ता सॉस खूप वेळाने करायचा असेल तर पास्त्याला थोडं तेल लावून झाकून ठेवला तर तो चिकट होत नाही. लगेच करायचा असेल तर प्रश्न नाही.

पास्ता सॉसः
नॉनस्टीक भांड्यात २ टेबलस्पून तेल तापवा. त्यात टोमॅटोचे तुकडे मध्यम आकाराचे तुकडे टाका. एक दोनदा परतायचे आहेत पण फार शिजवायचे नाहीत. लगेच लसूण पेस्ट आणि १ Tea स्पून ओरेगानो टाका (मला लसूण काप आवडतात, म्हणून मी थोडी पेस्ट आणि थोडे तुकडे टाकतो). एकदा परता.
आता पास्ता सॉस टाका. जरा उकळी आली की क्रीम टाका. आता उकळी येऊ द्या.
आता त्यावर ईटालियन अर्ब्स १/२ टीस्पून, आणि हव्या असल्यास सुख्या मिरचीचा चुरा टाका.
अंदाजाने मीठ टाका.
लगेच वाढायचे असल्यास त्यातच पास्ताच्या नळ्या टाकून ढवळा.
नाहीतर वाढायच्या आधी १०/१५ मिनिटे तयार केलेला सॉस आणि पास्ता मिसळून गरम करा.

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांना हा पास्ता पुरेसा होतो.
अधिक टिपा: 

. पास्ता आणि सॉस फार वेळ एकत्र करून ठेवलं की ते मिश्रण घट्ट होतं आणि मग पास्ता सॉस जाणवत नाही. (म्हणून मी आल्यावर लगेच पास्ता खायला लावला).
. पास्ता एकदा उकडून, तेल लावून फ्रीजमधे ठेवला तर सॉस तयार करायला १५ मिनिटं लागतात (प्राची).
. पेने ऐवजी कुठलाही पास्ता चालतो पण स्पगेटी मात्र या सॉसमधे मला आवडली नाही.
. माझ्या लेकी कधीही/केव्हाही बाबाची ही रेसिपी करून खातात एवढी सोप्पी रेसिपी आहे.
.गरम गरम वाढल्यास उत्तम (वाढताना सॉस दिसला पाहिजे).

माहितीचा स्रोत: 
मित्र व घरी केलेले प्रयोग. मुलं
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल प्रयोग झाला. पहिल्या फटक्यातली प्रतिक्रिया " हं प्रिटी गुड, बट नॉट अ‍ॅज गुड अ‍ॅज झुईज डॅड'स" अशी होती Uhoh बहुधा साखर कामी पडली काय की ! Happy

गार्डन स्टेट= बागराज्य= न्यूजर्सी

देसाई, पास्ता झ्याक झाला. फक्त मला जेवायला बसताना आयत्या वेळी गरम करणं शक्य नसल्याने थोडा आधी मिक्स करावाच लागला आणि मग जरा आळत गेला. पण चव मस्त होती.

तुला अ‍ॅडवान्टेज मिळालं असेल ना सायो, Wink मुलांना कंपेअर करायला काही नव्हतं Happy
आमच्या पोरांनी गटग ला चार चार वेळा खाऊन घेतला त्यामुळे तीच चव लक्षात आहे अजून Happy

बट नॉट अ‍ॅज गुड अ‍ॅज झुईज डॅड'स <<<<< Proud

लिहा म्हणावं चार वेळा (तरच पास्ता परत मिळेल कधीतरी) ... juee, juee, juee, juee जुई, जुई.. Happy

पुढच्या गटग पासून विन्य एका बाजुला उभ्या उभ्या विनोद आणि दुसरीकडे पास्ता उकळतोय असं चित्र दिसतंय आताच Proud

पुढच्या गटगला पास्ता परत? तसं चालत नाही आमच्याकडे.
प्रत्येक ए वे ए ठि ला नवीन काहीतरी Exotic करायची प्रथा आहे आमची.

चायनीज
ईतालियन
कोकणी/मालवणी
मराठी
दाक्षिणात्य

असे वेगवेगळे प्रकार करून आणतो मी...

मांचुरियन ? मला आठवत नाहिये हे ?!! बहुतेक माझ्याच कम्यिनिटी हॉल मधे असल्याकारणाने मला यायला उशीर झाला असावा Happy

१. मै (जुना हॉल) - पावभाजी (पडली म्हणून बिर्याणी).
२. मै (जुना हॉल) - व्हेज मांचुरियन.
३. मै (जुना हॉल) - पापलेट करी / भात
४. स्वातीचे घर - कोलंबी कालवण
५. माझे घर - मासे जेवण
६. आमचा हॉल - कोलंबी पुलाव.
७. आमचे घर - कुळथाची आमटी. (मुडदुश्याची आमटी)..
८. मै चे घर - वडा सांबार/ चटणी.
९. मै चे घर - पास्ता.

(अजून एक दोन आठवत नाहीयेत.... झक्कींचे बॅकयार्ड.. इत्यादी).
आठवलं नाही तर पुढच्या वेळी करू काहीतरी..

हे बघा, बाष्कळपणा आणि बा.रा. हे हातात हात घालून जातात. त्यामुळे वरची चर्चा बरोबर आहे. Happy
शूम्पी तशी ( अजून झाली ) आहे असं वाटत नाही, म्हणून तिला सांगितले. Lol

you have to focus on bigger picture here (म्हणजे काय हे कृ.वि. न. Happy )

देसायांच्यात स्पीडिंग टिकिट मिळू नये म्हणून गाडीला पाभाचा नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. असा नेवैद्य दाखवला की त्याला पाभा पडली असं म्हणतात. नॉर्थमध्ये नाही का 'चादर चढायी' असं म्हणतात.

कालच्या चादरीचा इथे काही संबंध नाही.

Pages