पास्ता बा रा ए वे ए ठि विनय श्टाईल

Submitted by परदेसाई on 21 October, 2013 - 09:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
१. पेने पास्ता (नळ्या) चार मुठी / २ ओंजळी.
२. Bertoli/Ragu किंवा तत्सम पास्ता सॉस २ १/२ ते ३ मोठे डाव.
३. Light cream (किंवा Half & Half) २ १/२ ते ३ मोठे डाव.
४. लसून पेस्ट किंवा चिरलेली.
५. १ मोठा टोमॅटो.
६. तेल ४ टेबलस्पून (Canola oil / Vegetable Oil)
6. ऑरेगानो ( सुपरमार्केटमधे मसाल्याच्या बाटल्या असतात तिथे मिळतात, चुरडलेली सुकी पाने असतात).
७. ईटालियन अर्ब्स (मेकॉरमिक किंवा तत्सम कंपनीचे. सुपरमार्केटमधे मसाल्याच्या बाटल्या )
८. सुक्या मिरचीचा चुरा ऐच्छिक...
९. साखर.

क्रमवार पाककृती: 

पास्ता शिजवा: लिटर सव्वा लिटर पाणी उकळत ठेवा. त्यात १ टेबलस्पून तेल, १ ते १ १/२ टीस्पून मीठ आणि १ ते १ १/२ टिस्पून साखर घाला. पाणी नीट उकळू लागले की त्यात पास्ता टाकून तो शिजवून घ्या.
(मी एका माणसाला दोन पुरेपूर भरलेल्या मुठी असं प्रमाण धरतो). पास्त्याची एकादी नळी चावून बघा. आतून घट्ट/सुकी वाटली तर अजून शिजायला हवी, आणि अगदीच नरम वाटली तर जास्त शिjaली. या दोन्हीं state च्या मधे नीट शिजवा. लगेच गाळून पाणी काढून टाका. लगेच थंड पाण्यात पास्ता धुवून घ्या. पास्ता सॉस खूप वेळाने करायचा असेल तर पास्त्याला थोडं तेल लावून झाकून ठेवला तर तो चिकट होत नाही. लगेच करायचा असेल तर प्रश्न नाही.

पास्ता सॉसः
नॉनस्टीक भांड्यात २ टेबलस्पून तेल तापवा. त्यात टोमॅटोचे तुकडे मध्यम आकाराचे तुकडे टाका. एक दोनदा परतायचे आहेत पण फार शिजवायचे नाहीत. लगेच लसूण पेस्ट आणि १ Tea स्पून ओरेगानो टाका (मला लसूण काप आवडतात, म्हणून मी थोडी पेस्ट आणि थोडे तुकडे टाकतो). एकदा परता.
आता पास्ता सॉस टाका. जरा उकळी आली की क्रीम टाका. आता उकळी येऊ द्या.
आता त्यावर ईटालियन अर्ब्स १/२ टीस्पून, आणि हव्या असल्यास सुख्या मिरचीचा चुरा टाका.
अंदाजाने मीठ टाका.
लगेच वाढायचे असल्यास त्यातच पास्ताच्या नळ्या टाकून ढवळा.
नाहीतर वाढायच्या आधी १०/१५ मिनिटे तयार केलेला सॉस आणि पास्ता मिसळून गरम करा.

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांना हा पास्ता पुरेसा होतो.
अधिक टिपा: 

. पास्ता आणि सॉस फार वेळ एकत्र करून ठेवलं की ते मिश्रण घट्ट होतं आणि मग पास्ता सॉस जाणवत नाही. (म्हणून मी आल्यावर लगेच पास्ता खायला लावला).
. पास्ता एकदा उकडून, तेल लावून फ्रीजमधे ठेवला तर सॉस तयार करायला १५ मिनिटं लागतात (प्राची).
. पेने ऐवजी कुठलाही पास्ता चालतो पण स्पगेटी मात्र या सॉसमधे मला आवडली नाही.
. माझ्या लेकी कधीही/केव्हाही बाबाची ही रेसिपी करून खातात एवढी सोप्पी रेसिपी आहे.
.गरम गरम वाढल्यास उत्तम (वाढताना सॉस दिसला पाहिजे).

माहितीचा स्रोत: 
मित्र व घरी केलेले प्रयोग. मुलं
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी रेसिपी. भन्नाट लागते. घरी आणलेला लेफ्टओव्हर पास्ताही लेकाने चुटकीसरशी संपवला.
डॉक्युमेन्टेशन झालं हे बरं झालं या रेसिपीचं. Happy

मी एका माणसाला दोन पुरेपूर भरलेल्या मुठी असं प्रमाण धरतो <<< त्यापेक्षा जास्त मुठी मी पण पाहिल्या नाहीयेत.. तेव्हा Lol

कधीही/केव्हाही बाबाची ही रेसिपी <<
त्या शीर्षकात '..... ल्या बाबाची रेसिपी' असे टाका पाहू Proud

सोपी दिसते आहे.

त्यापेक्षा जास्त मुठी <<< जास्त बोललास तर बर्‍याच मुठी तुला दिसतील (डोक्यावर फटके मारणार्‍या) Proud

शिjaली = शिजली (मायबोली आय. ई. Problem)

मस्त. अफाट चवीचा झाला होता हो पास्ता. रेसिपीत नवीन असं काहीच नसूनही 'मी का बरं करत नाही असा पास्ता' असं वाटलं खरं. परवाचा फोटो असल्यास कुणीतरी चिकटवा इथे.
(पास्ता करताना शक्यतो आधी सॉस करून घेऊन मगच पास्ता शिजवून घ्यावा आणि शिजवल्यावर गार पाण्याने न धुता सॉसमध्ये डायरेक्ट टाकावा असं मध्यंतरी स्वाती म्हणाल्याचं आठवतंय)

धुता सॉसमध्ये डायरेक्ट टाकावा असं मध्यंतरी स्वाती म्हणाल्याचं <<< अरे बाप रे.. आता मला पळावं लागेल.. (उलटं लिहितो म्हणजे काय?) Wink

.
.
.
.
.
.
पास्ता धुतला तर त्यातला Starch जातो मग तो चिकटत नाही असं बायको म्हणाली... Happy

>>पास्ता शिजवून घ्यावा आणि शिजवल्यावर गा. पाण्याने न धुता >> गा नंतर पूर्णविराम आयपॅड कृपेने पडला आहे. नाहीतर शिजवल्यावर गाण्याची काहीच गरज नाही Proud

>> शिजवल्यावर गाण्याची काहीच गरज नाही
Lol

पास्ता शिजवणं आणि सॉस करणं हे शक्यतो प्यारलली करावं. ताज्या शिजवलेल्या पास्त्याची चव शिजवून ठेवलेल्या पास्त्याला येत नाही - मग तेल लावा नाहीतर तूप लावा! Happy

ताज्या शिजवलेल्या पास्त्याची चव शिजवून ठेवलेल्या पास्त्याला येत नाही - मग तेल लावा नाहीतर तूप लावा >>> +१

भारी रेसिपी. तुम्ही इथे टाकायच्या आत मी चारचौघींकडे जाहिरात केली सुद्धा. मी स्पायसी ऑइलमध्ये करणार.

विनय, आज संध्याकाळी बनवायचा पिलान आहे. मुलांची एक्स्पेक्टेशन्स फाय हाय करून ठेवली आहेत. मला तुमच्या चवीचा जमायला हवा. Wink

प्रेक्षणीय होतोच असं नाही <<< एकदा बघितला असता तर... जाऊदे..

मुलांची Expectations <<<< बरोबर लक्ष देऊन न केल्यास जिम्मेदारी माझी नाही.. Proud

मस्त आहे Happy जवळपास ह्याच पद्धतीने करुन पाहिला आहे पण वर सगळे सांगतायंत तशी 'वॉव' चव आली नव्हती. साखर ही एकच अ‍ॅडिशन आहे.

काल हापिसात साधारण याच पद्धतीने चीझ रॅविओली मिळाला/ली? छान लागला तो पण प्रकार.

मी एकदा तंद्रीत मीठाऐवजी साखर पाण्यात घालून पास्टा उकडला.... मग (सॉस टाकायच्या आधी) लक्षात आलं तेव्हा पास्ता धुवून काढला. त्यादिवशी (मीठ घातल्यानंतर) तयार झालेला पास्ता इतका अफलातून लागला की विचारू नका.. तेव्हापासून...

Proud

परवा या पद्धतीने पास्ता करून पाहिला. वरती सायोने म्हणले आहे तसेच रेसिपीत नवीन असं काहीच नसूनही 'मी का बरं करत नाही असा पास्ता' असं वाटलं खरं. पण थोडी साखर, तयार सॉस वापरूनही १ ताजा टोमॅटो घालणे अशा काही गोष्टी वेगळ्या आहेतच. एण्ड रिझल्ट मस्त होता. बारक्याने अरे खा रे न म्हणता संपवला यातच सगळे आले Happy
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
हा फोटो :
pasta.JPG

Pages