बरेच दिवस एक बिनभुतांची कथा लिहाविशी वाटत होती, म्हंटल प्रेमकथा लिहावी......... !
*************************************
" सॉरी, आपण पुन्हा भेटू शकणार नाही" बहुधा मी तेंव्हा ऐकलेले हेच तीचे शेवटचे शब्द असावेत. या नंतरही ती बरंच काही बोलत होती पण मला फ़क्त तीचे ओठ हलताना दिसत होते. मेंदु पार कोरा झाल्यात जमा होता. असे काही ती बोलेल हेच मुळी मी कधी गृहीत धरले नव्हते. तीच्या सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणात ‘हीच आपली जन्माची सोबतीण’ इतकेच मनाला जाणवायचे. आणि आज तीच मला पुन्हा न भेटण्याबद्दल बोलत होती? माझ्या प्रेमाचा शेवट असा दुर्दैवी ? मग तीचे ते हसणे, माझ्या बरोबर महाल़क्ष्मीच्या मंदीरात जोडीने घातलेल्या प्रद़क्षीणा, माझ्या हातुन कुंकवाची टिकली कपाळावर रेखुन घेणे हे ही खोटेच? की माझी तीची भेटच खोटी?
तीची माझी भेटही अपघाताने झालेली. बाईकींगचा माझा नाद फ़ार जुना. त्यावेळी स्वतःची बाईक म्हणजे फ़ार मोठे स्वप्न वाटायचे. पण मनातली हूरहूर गप्प बसु द्यायची नाहीच. मित्रमंडळींच्या गाड्या या आपले हक्काचे वाहन आहेत ही संकल्पना आमच्या गृप मधे खोलवर रुजलेली. त्यामुळे बाईक उधळायची संधी रोजच मिळत होती. आणि एकदा गाडी चालवायला जमले की डोक्यात जणु फॉर्म्युला वनची नशा चढते. स्पिडोमिटर जास्तितजास्त किती मोठा कंस तयार करतो तितका तयार करणे हे आपले आद्य कर्तव्य वाटायला लागते.
त्या दिवशीही मी असाच भन्नाट वेगात रस्त्याने येत होतो. कॉलेजच्या जवळपास पोचलो असेन इतक्यात कॉलेजकडे जाणाया मुलींच्या घोळक्यातल्या एका मुलीचे काही बिनसले आणि अचानक ती घोळक्यातुन बाजुला सरकली. आटोकाट प्रयत्न केला पण पुसटसा धक्का लागायचा तो लागलाच. अर्थात दोघेही धडपडलो, पडलो मात्र नाही. मग गाडी तशीच स्टँडवर खेचुन मी त्या मुलीकडे धावलो म्हणजे शब्दशः धावलोच.
" सॉरी हं मी खुप ट्राय केला पण कंट्रोल झालीच नाही गाडी !" गुमान माफ़ी मागुन पुढच्या शिव्या किंवा खरडपट्टी जे काही इथे होऊ शकते ते ऐकायला तयार झालो.
" नाही हो, तुमची चुक नाही त्यात मीच अचानक मधे आले. तुम्ही वाचवायचा प्रयत्न केलेला मी ही पाहीला. खरंतर मीच तुम्हाला सॉरी म्हंटले पाहीजे" चढ्या आवाजातली `च़क्षुं'च्या उध्दाराची अपे़क्षा करत खाली मान घालुन उभा असलेला मी, खाडकन मान वर झाली माझी. आहो ! एका पोरीला धक्का लागतो आणि ती चक्क सॉरी म्हणते?
" पण, तुम्हाला कुठे लागले तर नाही ना?" काहीतरी बोलायचे म्हणुन बोललो.
" छे हो, आगदी पुसट धक्का लागला, खरचटलेसुध्दा नाहीये"
इतक्यात तिच्या मैत्रीणींचा तो घोळका आजुबाजुला रेंगाळत बहुधा माझा समाचार घ्यायच्या तयारीत असलेला, आणि सलामीच्या तोफ़ेची वाट पहात असलेला, इथे चाललेली तहाची बोलणी ऐकुन तिथे आला. आणि मग माझ्याकडे पाहून एक स्माईल देत ती पुन्हा त्यांना जॉईन झाली.
आमची पुढची भेट घडवायचे सत्कार्यही गाडीनेच पार पाडले. संध्याकाळी परत भेटायचे ठरल्याने मी मित्राची बाईक घेउनच घरी निघालो होतो. कॉलेज बाहेरच्या बसस्टॉप कडे नजर गेली आणि पुन्हा तीच तीथे उभी असलेली दिसली. गाडीचे ब्रेक आपोआप कसे लागतात याचा अनुभव तेंव्हा पहील्यांदाच आला.
" आज एकट्याच?" बसस्टॉप समोर गाडी थांबवुन आपण बेस्ट चालक,वाहक मंडळींशी पंगा घेत असल्याची जाणिवही झाली नाही.
" हो, आज जरा लवकरच निघाले, शेवटची दोन लेक्चर्स नाहीत ना आमची! "
" हो का? अरे वा वा !" हे मी काय बोललो याचा अर्थ मलाही कळलेला नाही आजपर्यंत.
" आहो, पण तुम्ही असे स्टॉप समोर थांबु नका गाडी बाजुला घ्या नाहीतर उगीच कुणी काही बोलायचे"
आईशप्पत ! ही चक्क मला थांबायला सांगत होती तर !
" हो हो ! वा, का नाही? घेतो ना बाजुला" आमच्या मुखकमलातुन आजुनही निरर्थक शब्द टपकतच होते.
चुपचाप गाडी बाजुला लावत मी तीच्या जवळ येउन उभा राहीलो, मधे पुरेसा वेळ गेल्याने म्हणा किंवा आणखी कशाने म्हणा एव्हाना धिर जरा चेपला. पहिल्यांदाच मी तीला ईतक्या जवळून पाहीले. किंचीत उभट चेहरा, कदाचीत त्याची जाणिव असल्यामुळेच ठेवलेले मोकळे केस,टोकदार नाक, आणि सर्वात जास्त ल़क्ष वेधुन घेणारे तीचे ते भावदर्शी काळे डोळे. कदाचीत मी घारा असल्याने असेल किंवा कादंबर्या वाचल्याचा परीणाम असेल, पण मला काळे डोळे म्हंटलं की ते भावदर्शीच असावेत असे वाटतं. म्हणजे काळे डोळे असलेल्या व्यक्ती तिरळ्या वगैरे असु शकतात असे जर कुणी मला सांगीतले असते तर त्यावर तेंव्हा तरी माझा विश्वास बसला नसता.
" तुम्हीही आज लवकर निघालात तुमचीही लेक्चर्स नाहीत का आज?"
" अं काय म्हणालात?" तिच्या निरि़क्षणात गर्क असल्याने मला प्रश्न तर कळला नाहीच पण दचकलो मात्र जोरदार. मग पुन्हा ऐकल्यावर म्हणालो.
" नाही लेक्चर्स आहेत पण आज आमच्या गृपने लेक्चर्स बंक करुन बाहेर जायचे ठरवलेय"
" अय्या ! तुम्हाला लेक्चर्सपे़क्षा फ़िरणे महत्वाचे वाटते?". हा प्रश्न दुसर्या कुणी विचारला असता ना! तर जाळच काढला असता पण तीच्या मुखी तो अमृतवाणी वाटला.
गप्पांवरुन गप्पा वाढत गेल्या आणि तीला बस मिळत नसल्याने आणि वेळेचा तुटवडा नसल्याने आईसक्रीम खाण्याची माझी कल्पना तिला पटली.
"शितल नाव माझे !" च्यायला, इतक्या वेळात तीचे नाव विचारायचेच राहीले की !
" मी आशिष" आता माझी पाळी ( विज देते टाळी..... असले काही बाही सुचायला लागले)
" तुम्ही असेच लेक्चर्स बुडवता नेहमी बाकीच्या उनाड मुलांसारखे?" ‘देवा रे ! इतके चांगले माझ्याबद्दल ऐकायची शक्ती दे रे !’
" नाही हो ! आपलं उगीच कधीतरी, चुकुन..... "
" आईस्क्रीम छाने ! अय्या तुमचे सगळे आइसक्रीम वितळून गेले, आवडत नाही का?" बहुधा देवाच्या स्तुतीत बराच वेळ गेला असावा.
" मला आईस्क्रीम खाण्यापे़क्षा प्यायला आवडते" सारवासारव करायला दुसरे शब्द तर सुचायला हवेत ना ! चुपचाप एक स्ट्रॉ घेउन ते आईसक्रीम संपवले.
या नंतरही आमच्या भेटी होत राहील्या कधी बसस्टॉपवर, कधी कँटीन मधे, कधी चक्क कॉलेज कट्ट्यावर. असाच एकदा कट्ट्यावर टवाळक्या करताना तीचाच गृप समोरुन चालला होता आणि एका कट्टा बहाद्दराने त्यातल्या एका दात पुढे आलेल्या मुलीकडे बघुन कॉमेंट टाकलीच.
" ए मध्या, साल्या एका घरातला तरी फ़ावडे, किसणीचा खर्च वाचला बरं का!"
यावर पुढे काय झाले ते मला काही वेळाने कळणार होते.
" काय रे," इतक्या भेटीनंतर ‘आहो’चा ‘अरे’ होणार होताच.
"काय रे, कट्ट्यावरून पोरींना कॉमेंट मारण्यात कसली मजा रे ?"
" म्हणजे?" याला वेड पांघरुन पेडगावला जाणे म्हणतात.
" पल्लु ला रडवलीत ना मघाशी ! " म्हणजे व्हिक्टीमचे नावं पल्लवी होते तर.
" नाही गं, मी कुठे काही बोललो?"
" तु नसशील रे बोललास पण कोण बोललं ते ऐकलं नक्की असशील"
" ए शहाणे, अशी हेरगीरी करु नकोस, आणि मी काय सुर्याजी पिसाळ वाटलो का तुला आमच्या किल्ल्याची माहीती द्यायला?"
" मी विचारली का ?" च्यायला, हे पण खरंच की.
" मग?"
" याचा अर्थ माझ्यावरही कॉमेंट मारत असाल ना तुम्ही लोक?"
" आजीबात नाही, आणि कुणाची तशी हिंम्मतपण नाही"
" का ? का नाही मारत माझ्यावर कॉमेंट?"
"कारण........ कारण........." शब्दसाठा संपला.
प्यार का इजहार की काय ते म्हणतात ना, हिंदी चित्रपटात, तो व्हायला बरेच दिवस लागले.
"शितु, काल ‘रोज डे’ ला का नव्हती आलीस गं" राग लपवत मी म्हणालो. एव्हाना दोन्हीकडून प्रेम व्यक्त झाले होते आणि मैत्रीण शितलची प्रिय ‘शितु’ बनली होती.
" आले असते तर काय झाले असते?" हा एक नवा पैलु दिसत होता तीचा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडूनच वदवुन घेण्यात ती पटाईत.
" म्हणजे? तुला रोझ द्यायचा होता"
" मग दे की आत्ता, मी नाही म्हणाले का?"
"अं...... आत्ता देउन काय फ़ायदा? काल `रोझ डे' होता"
" का? आज दिलास तर गुलाबाचा चाफ़ा होईल का?"
"तसं नाही........... पण काल देण्यात खरे महत्व होते."
" काल दिला असतास तर गुलाब गुलबकावली झाला असता?" चेहर्यावर ओसंडून जाणार्या भोळेपणासहीत म्हणत होती.
" तसं नाही गं पण सगळ्यांच्यात दिल्यामुळे......"
" आपल्याला प्रसिध्दी मिळाली असती नं?" माझे बोलणे तोडत ती म्हणाली.
" अं??"
" आशिष, या असल्या भंपक गोष्टीतुनच जर प्रेम व्यक्त होत असेल ना! तर आपले प्रेम खोटेच का रे?" माझा शब्दसाठा पुन्हा संपला.
" तुलाच जर आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करायचं असेल तर चल, आपण हातात हात घालुन कॉलेजपासुन बसस्टॉप पर्यंत जाउ, मधेच मी तुझ्या खांद्यावर डोके ठेवीन."
" उफ़्फस्सSS, इतके चीप व्हायला काहीच कसे नाही वाटत तुला?"
" मग? काल सर्वांसमोर गुलाब देताना तुला वाटले असते का?" इतक्या सहजा सहजी माझे माप निघाले.
" आशिष, खर्या प्रेमाला प्रदर्शनाची गरज नसते रे, गरज असते ती फ़क्त मनाच्या ओढीची, आपलेपणाची."
त्या दिवसा नंतर मी पुन्हा कधी असल्या ‘डे’ कल्चरच्या भानगडीत पडलो नाही.
असेच अनुभव पुन्हा पुन्हा येत राहीले आणि तिच्या मनाचा तळ मला कधीच सापडला नाही फ़क्त वेळोवेळी नवे पैलु मात्र दिसले.
बर्याच दिवसांनी निवांतपणा मिळाला, एका कॉफ़ीशॉप मधे दोन कप कॉफ़ीवर पाउणतास गप्पांचा कार्यक्रम ठरला. अर्थात माझा आणि शीतूचाच. आता एक पक्का कट्टेबाज शायनिंग मारायला जे करतो ते मी केले, अर्थात मोठ्ठ्या स्टाईल मधे सिगारेट पेटवली.
" अय्या ! तु सिगारेट ओढतोस ?"
" अशीच आपली कभी खुशी कभी गम मधे गं, रोज नाही काही." धुराची रिंगणे हवेत विहरत होती.
" मग आज काय आहे खुशी की गम?"
"अर्थात खुशी, म्हणजे आनंद तुला भेटण्याचा"
" ए, कोणता ब्रँड आहे रे?"
" रॉथमन्स"
" मला पण दे ना एक" मी दचकल्यामुळे पाण्याच्या ग्लासाने उडी मारली.
" तु.. तु सिगारेट ओढतेस? "
" म्हणजे आधी नाही ओढली कधी पण आत्ता आनंदात आहे म्हणुन ओढुन पहाते".
" अगं तरी तु सिगारेट ओढणार?"
" का मी तुझा आनंद शेअर करु नये असे वाटतेय का?"
"तरी पण........"
"आशिष, आनंद, दुखः सेलिब्रेशनची गोष्ट नाही रे , इतरांना सहभागी करुन घेण्याचे प्रसंग आहेत. मग मला तुझ्या आनंदात सहभागी करुन नाही घेणार?" मी सिगारेट कधी ऱक्षापात्रात चुरगाळली मलाच कळाले नाही.
बाप रे ! कसला रटाळ दिवस, सकाळपासुन शीतल दिसली नाही, की तिच्याबद्दल काही कळले नाही. दिवसभर नुसते अस्वस्थ अस्वस्थ........ कॉलेज समोरच्या कॅफ़ेमधे जाउन चहाचे कपावर कप संपवुन झाले, दोनवेळा सिगारेट घेण्यासाठी टपरीकडे वळता वळता थांबलो. पण तिच्या येण्याची शक्यता जाणवत नव्हती. शेवटी तिच्यावाचुन कॉलेजच परके वाटायला लागल्याने उठून घरी जायला बसस्टॉप गाठला. आणि..... डोळ्यांवर विश्वास बसेना ! समोरुन चक्क शितल मला हात करत होती.
" वाव, आज एकदम चमचम?" सुंदर या शब्दाला तेंव्हा हा प्रतीशब्द आमच्या प्रतीसृष्टीत चालत असे.
" आज माझा वाढदिवस" पुन्हा पायाखाली बाँब फ़ुटल्याची जाणिव. मला आजुन माहीत नव्हता तिचा वाढदिवस. मी न सांगताच माझा मात्र तीला कळला होता.
" ग्रेट आणि हे तु मला आत्ता सांगतीयेस !"
" का ? आधी सांगीतलं असतं तर काय झालं असतं?"
"अरे वा... म्हणजे असं कसं ? एखादं गिफ़्ट नसतं का आणलं तुझ्यासाठी" या वाक्याचे तीन तेरा वाजणार हे बोलायला सुरुवात करतानाच जाणवलं होतं.
" मग आत्ता काय प्रॉब्लेम आहे? आत्ता दे ना !"
मी आपला मनातल्या मनात पाकीटाची झेप मोजायचा प्रयत्न करत राहीलो.
" चल आपण देवळात जाउया?" आज पर्यंत मला वाढदिवसाच्या दिवशी शॉपिंग किंवा हॉटेलिंग ला जाउ म्हणण्या ऐवजी देवळात जाउ म्हणणारी स्त्री सापडली नाहीये.
" तु म्हणतेस तर जाउया की" बस स्टॉपचा आसरा सोडत मी म्हणालो.
" ए, चल आपण जोडीने प्रद़क्षीणा घालु" महालक्ष्मीच्या मंदीरात ती हळूच कुजबुजली.
" अं, चालेल का पण?" रुढी परंपरांच्या मर्यादा असतातच ना शेवटी.
" मला चालतेय तुला चालणार असेल तर चल"
एकमेकांचे हात हातात घेउन घातलेल्या महाल़क्ष्मीच्या त्या प्रद़क्षीणा आजही मला विसरता येणार नाहीत.
" आशिष, तु मला गिफ़्ट देणार होतास ना?"
" तुच सांग काय देऊ?" शब्द अ़क्षरशः दडपुन दिले, खिशाची उडी फ़ारशी मोठी नव्हती.
" बघ, काही मागीतले तर नाही म्हणणार नाहीस?"
" तु माग तर खरी" मनोमन पाकीटाला गळ्यातल्या चेन ची जोडही देउन टाकली.
" देवीच्या पुढ्यातल्या कुंकवाची टिकली लावतोस मला?"
" अं?"
"......"
" अग काय बोलतेस हे ? काय अर्थ होतो माहीताय ना?" चित्रपटांच्या पुढे न सरकलेले ज्ञान म्हणुन गेले.
" का? तु माझ्याशी लग्न करणार नाहीयेस का?"
" तसं नव्हे गं........"
"मग तु मला टिकली लावलीस तर तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना?"
" नाही...."
" मग? लावतोस ना टिकली?"
एकतर तीच्या स्वभावात हे असले काही बसत असु शकेल हे मलाच पटत नव्हते. आणि शेवटी ती माझ्या शितलची मागणी होती मी टाळणे शक्यच नव्हते.
" मी पहात होते, तुझा हात किंचीतही थरथरला नाही मला टिकली लावताना"
महालक्ष्मीच्या मागे समुद्राजवळ दगडांवर फ़िरताना ती म्हणाली.
" म्हणजे परी़क्षा घेत होतीस तर माझी ! "
" वेड्या तुझी कसली माझीच परी़क्षा होती रे ती, उद्या तुझ्या विश्वासावर माझे विश्व साकारताना मी मागे तर सरणार नाही ना !"
" तु खरोखर अशक्य आहेस"
माझे हे वाक्य कदाचीत ब्रम्हवाणी ठरली असावी.
त्या नंतर काही दिवस असेच हसण्या बागडण्यात गेले. आणि एकदा पुन्हा अचानक शितल दोन दिवस सलग भेटली नाही. आणि आज भेटली ते हे ‘पुन्हा आपण भेटू शकत नाही’ हे सांगायला.
" ठीकाय, आता तु काही बोलतच नाहीस तर निघते मी" क्षणभर माझ्याकडे पहात ती म्हणाली.
माझे मन प्रश्नांनी भरुन गेले होते पण विचारण्यासाठी जीभ उचलल्या जाईना ! कदाचीत त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे तीने आत्ता दिलेलीही असतील पण मी भानावर होतोच कुठे?
" चल, मी निघते आता" आणि तीने पायर्या उतरायला सुरुवात केली.
या नंतर ती पुन्हा कॉलेजला दिसली नाही. भेटली मात्र एकदाच. या वेळी बोलण्यासारखे खुप काही होते.
"शितल, त्या दिवशी अचानक मला नकार देउन तु अशी का निघुन गेलीस?"
" मी सांगीतले की तुला"
"सांगितले असशील नक्की पण मला बसलेला धक्का इतका असहनीय होता की तुझे बोलणे मी ऐकलेच नाही त्या वेळी"
" आशिष, त्या दिवशी मला पहील्यांदाच आयुष्याचा खरा रंग जाणवला रे !"
" तु आजही काही अनाकलनीय बोलतेयस"
" अरे खरंच, मी माझ्या मावसबहीणीच्या घरी गेले होते"
" आणि तिथे कुणीतरी माझ्यापे़क्षा चांगला मुलगा भेटला असंच ना?" मी जरा रागानेच म्हणालो.
" नाही, तीनेही प्रेम विवाह केलाय"
" मग त्यात काय वाईट?"
" त्यांचेही प्रेम कॉलेजच्या वेळचेच, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केले"
" मग त्यात काय चुकले?"
" काहीच नाही?"
" मला तरी काहीच चुकीचे दिसत नाही"
" मग आता निट ऐक, कॉलेजच्या दिवसांत त्यांचे एकमेकांवर प्रेम बसले आणि घरुन विरोध होता त्यामुळे त्यांनी परस्पर लग्नही केले. एक वर्ष होऊन गेले या गोष्टीला, आज दोघे एकमेकांची तोंडे पहायला तयार नाहीत."
" का? दोघांपैकी कुणा एकाची निवड चुकीची असेल."
" आजिबात नाही, शि़क्षणाच्या मधे प्रेम आल्याने दोघांचेही शि़क्षण अर्धवट राहीलेय, आणि तिचा नवरा जो आज कॉलेज पुर्ण केल्यावर एखाद्या चांगल्या नोकरीत असता, तो एका प्रायव्हेट फ़र्म मधे तुटपुंज्या पगारावर नोकरी करतोय"
" मग त्याने काय बिघडले तुझ्या बहीणीची अपे़क्षा मोठी आहे का?"
"कुणाची नसते? नक्कीच आहे, पण आता दोघांच्या प्रयत्नांनीही त्यांचा संसार व्यवस्थित चालु शकत नाहीये."
" पण प्रेम या असल्या फ़ालतु गोष्टींकडे दुर्ल़क्ष करायला शिकवतं"
" मुळीच नाही, मुळात प्रेम हे सापे़क्ष असतं आपण नाही का आपल्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवलीत? त्यातल्या कल्पना जर पुर्ण नाही झाल्या तर?"
" तर हे प्रेमच आपल्याला पुर्णत्व देईल"
" तु पुन्हा विसरतोयस प्रेम हे सापे़क्ष असतं रे! त्याच्या संकल्पना वेळेनुसार बदलतात. अडचणी आल्या की त्यावर मात करायला मदत नाही करत, तर आपल्याला आपण केलेल्या चुका दाखवुन देत रहातं, आपल्या अपयशाचे खापर जोडीदारावर फ़ोडायला भाग पाडतं."
" आपलं प्रेम हे इतक्या हीन दर्जाचं होतं का?"
" मी असं म्हंटलेलं नाहीये, पण याचा अंत असा होऊ सुध्दा शकतो ना? तु जर इंजीनियरींग पुर्ण करु शकला नाहीस तर तु दोष प्रेमाला देशील की मला? एकदा स्वतःलाच विचारुन बघ" आता मात्र मी निरुत्तर झालो.
" पण खरंच आपल्या घरुन विरोध झाला नाही तर?"
" तरी एक मुद्दा उरतोच"
" काय?"
" तुझे सेमीस्टरचे मार्कस पाहीलेस ना?" ती सत्य तेच म्हणत होती. माझे मार्कस चांगलेच घटले होते.
" म्हणुन मी म्हणते आता आपण पुन्हा भेटू नये हेच बरोबर असेल"
" पण म्हणुन तु कॉलेज सोडलेस?"
"मी कॉलेज सोडले नाहीये, बदललेय"
" का?"
" आपण समोरासमोर आलो की पुन्हा आठवणी ताज्या होणार आणि ............"
" पण तुझ्या आठवणीत मी हरवुन जाईन त्याचे काय?"
" आजीबात असे होणार नाही, या भावनेच्या भरात घडत असणाया गोष्टी आहेत रे! एकदा भावनांचा पुर ओसरला की मलाही विसरशील बघ"
" ते शक्य नाही, कदाचीत तु मला विसरायचा प्रयत्न करत असशील"
यावेळी प्रथमच ती निरुत्तर झाली. निदान मला तरी तसे वाटले.
यथावकाश कॉलेज पुर्ण झाले चांगले मार्कस घेउन मी बाहेर पडलो. जगाचे टक्के टोणपे खात, एका ठिकाणाहुन दुसरीकडे टप्पे घेत मी नोकरीत स्थिरावलोही. पण मनाच्या एका कोपर्यातुन एखाद्या भावुक क्षणी शितलच्या आठवणी डोके वर काढतच होत्या.
आणि..... एक दिवस घरुन लग्नाबद्दल विचारणा झाली त्या दिवशी खुप बेचैन झालो. आणि महाल़क्ष्मीच्या मागच्या खडकांवर बराच वेळ रेंगाळत राहीलो. मनात विचारांचे काहूर माजलेले. शेवटी ‘जर तीने माझा विचार केला नसेल तर मी तरी का करु?’ अशी मनाची समजुत काढून घरी होकार कळवला.
माझ्या होकारामुळे घरातल्या मंडळींचा आनंद विचारु नका! उत्साहाने पुढच्याच आठवड्यात त्यांना एक मुलगी पसंत असल्याची बातमी दिली. आणि मुलीनेही मला होकार दिल्याचे सांगितले. म्हणजे आता फ़क्त मी मुलगी पाहून होकार कळवण्याचा भागच बाकी होता तर, पण मला या आठवड्यात कामाची बरीच उपसाउपस करायची होती त्यामुळे मी मुलगी पहायला जायला नकार दिल्याने मुलगी पहाण्याचा कार्यक्रम आमच्याच घरी ठरवल्या गेला.
त्या दिवशी संध्याकाळी लॅपटॉपवर प्रोजेक्टच्या कामाशी मारामारी करत असताना दारवरची बेल खणखणली. दार उघडल्या गेल्यावर दारात एक चाळीशीच्या पुढचे थोडेसे ट्क्कल पडलेले गृहस्थ उभे होते. त्यांच्या बाजुलाच एकेकाळी नक्कीच सुंदर असु शकेल अशी महीला उभी होती. वडीलांनी त्यांचे तोंडभरुन स्वागत केले. त्यांचे आदरतिथ्य करताना आईने मला हे मुलीचे आई-वडील असल्याचे सांगीतले, पण मुलगी कुठे दिसत नव्हती, ती म्हणे एका कामासाठी बाहेर गेलेली आहे तिथुन थेट इथे येणार आहे.
त्यांच्याशी औपचारीक गप्पा मारतानाच पुन्हा डोअरबेल खणखणली आणि दरवाजा उघडल्या गेला. बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून मी दचकलोच, समोर शितल उभी होती.
" हीच आमची मुलगी बरं का!" तिचे वडील म्हणाले.
यावर मी काही बोलणार तेवढ्यात शितलने डोळे मोठ्ठे करुन मला गप्प केले.
आम्हाला दोघांना एकटे सोडून बाकी मंडळी वरच्या मजल्यावर निघुन गेली आणि शितलने माझ्यासमोर काहीही न बोलता आपली मुठ उघडली. त्यात कुंकवाने भरलेला करंडा होता. मला क्षणात त्या महाल़क्ष्मीच्या मंदीरातली आठवण झाली.
" पाहीलसं आशिष, मी त्या दिवशी तुझ्याकडून लाउन घेतलेली टिकली खोटी नव्हती ना ! "
" अग पण तु.......... "
" अंSSहं, सगळे तुझ्या प्रगतीसाठीच होते रे ! "
" म्हणजे तु मुद्दाम माझ्यापासुन वेगळी झालीस तर, आणि ल़क्ष ठेउन होतीस वाटतं माझ्यावर"
यावर ती फ़क्त हसली, ती हसली म्हणुन मी ही हसलो आणि आम्हा दोघांना हसताना पाहून दोन्ही घरातल्या मंडळींनी काढायचा तो अर्थ काढला.
खरच शितलने महाल़क्ष्मीच्या मंदीरातल्या कुंकवाची जाण ठेवली होती. आणि मला खरंच अभिमान वाटतो. तीने नुसते प्रेम केलेच नाही तर त्याचा खरा अर्थ शोधुन काढला. जर तिने त्या वेळी असा जगावेगळा निर्णय घेतला नसता तर..........?
पण तीने तसे केले, आणि जाणिवपुर्वक हा गोड सापळा रचला होता. आणि आता मी ही त्या सापळ्यात आनंदाने प्रवेश करत होतो. मनात आपल्या प्रेयसीबद्दलचा ओतप्रत भरलेला अभिमान घेउन.
अती
अती सुन्दर.
मनापासून आवड्ली.
असेच लिहित रहा.
चाफ्फा, बर्
चाफ्फा,
बर्याच भूतकथा नंतर अशी हलकी फुलकी 'प्रेमळ' कथा लिहिलीस. छान.
कथा वाचतांना शेवटाची कल्पना आधीच थोडीफार आली होती
मस्त
मस्त कथा!
>>>बरेच दिवस एक बिनभुतांची कथा लिहाविशी वाटत होती, म्हंटल प्रेमकथा लिहावी......... !
खरतंर मधे शीतल गायब झाली तेव्हा मला शंका आली होती, की ही आता भूत बनून परत येते की काय, पण ही खरोखरच प्रेमकथा निघाली!
छान आहे
छान आहे कथा.
प्राजु
कथा आवडली.
कथा आवडली. वाचून छान वाटले!
तुझ्या
तुझ्या भूतकथांसारखीच ही सुद्धा "बाधक्"च आहे, चाफ्फ्या. लिहीत रहा. भूतं तर भूतं.... ती नाही मिळाली तर माणसं.... हात लावशील त्याचं कल्याण होतय
मस्त रे
मस्त रे चाफ्फा... आवडलेली आहे..
खुपच चान
खुपच चान
चाफ्फा..
चाफ्फा.. कथा खुप आवडली-- अगदी मनापासुन.
-------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
एकदम हलकी
एकदम हलकी फुलकी

चाफ्या लव्हली............
नेहमी सारखीच..........
धन्यवाद
धन्यवाद दोस्तलोक,
त्याचं काय आहे, प्रेमकथा म्हणजे माझा प्रांतच नाही ! पण प्रयत्न करुन पाहीला आपला ! पण तरी त्यात टपोरीगीरी कितीही प्रयत्न केला तरी टाळता आली नाही
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
फाआआआरच
फाआआआरच छान! एखादा मस्त सिनेमा होईल! लंच टाईम एकदम झकास गेला!
कल्पू
जबरदस्त
जबरदस्त कथा. जाम आवडलि.
सागर
चाफ्फ्या,
चाफ्फ्या, हे पण छान जमलंय
चाफ्या....
चाफ्या.... खुप दिवसांनी गोड शेवट झालेली प्रेम कथा वाचली.
खुपच छान...
.
.
.
.
.
.
.
.
.
आरे, काल तुझ्या टिम मधले एक भुत भेटले होते, तुझा विरह त्याला सहन होत नव्हता.
छान आहे
छान आहे कथा. आवडले ......
~~~~~~~~~~~~~~
ज्याची त्याची प्रश्नचिन्हे ......
मस्तच रे
मस्तच रे चाफ्फ्या!
झकास!
)
वाचताना अस वाटत होत की "काश, आमच्या आयुष्यात पण अशी एखादी उभट चेहर्याची शितल [वेळेत] आलेली अस्ती तर??????"
(जाऊद्या, आता पुढल्या जन्मी
[हे गोलटक चेहर्याची लिम्बी वाचत नाही याची खात्री हे!]
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मस्त
मस्त लिहिलि आहे. एकदम आवडलि.
माफ कर
माफ कर मित्रा पण तू भूतकथाच लिही रे...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
पुन्हा
पुन्हा एकदा धन्यवाद,
>>>>>>>>माफ कर मित्रा पण तू भूतकथाच लिह>>>>>>>>
अज्जुके, माझी काहीच हरकत नाही पण प्रेमकथा लिहून बघायला हरकत नाही ना !
>>>>>आरे, काल तुझ्या टिम मधले एक भुत भेटले होते, तुझा विरह त्याला सहन होत नव्>>>>>
अरे आणु रे त्या भूतांना परत मधेच थोडे विषयांतर म्हणुन ही कथा....... माझ्या एका मित्राने म्हंटलेय
` कथेचा प्रकार दुय्यम स्थानी आहे त्यातली शैली महत्वाची, ती ओळखल्या गेली पाहीजे' म्हणुन..... !
.................................................................................................................................
वजन कमी झालेलं पहायचय ? खात्रीचा आणि सोपा मार्ग....
वजनाचा काटा बिघडवा........... !
नाय बा
नाय बा माझी काय हरकत असणार?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
आता तु
आता तु भयकथेला हातभार लाव !
तिकडे गडावर एक सामुहीक भयकथा लिहायला घेतलीये ! ती कथेच्या बी बी वर टाकतोय !
.................................................................................................................................
वजन कमी झालेलं पहायचय ? खात्रीचा आणि सोपा मार्ग....
वजनाचा काटा बिघडवा........... !
मी गेल्या
मी गेल्या दोन दिवसात ज्या गोष्टी पाहून आलेय ना ते भयकथेपेक्षाही भयानक आहे चाफ्फ्या.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सुरेख कथा
सुरेख कथा चाफ्या
जम रहेला हय यकदम
शीतू तर अगदी वपूंच्या कथेतून आल्यासारखी
तुझ्या
तुझ्या भयकथा / भुतकथा तर आवडीने वाचतोच, पण हे त्यापेक्षाही छानच आहे.
मस्तच जमलंय....
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
चाफ्फा, तुम
चाफ्फा,
तुमची गोड गोड प्रेमकथा वाचली. फार कन्वीनियंट वाटली.
हल्ली तुमच्या कथा वाचायला जावे आणि कधी मायबोलीकरांवर कथा कधी विनोदी कथा (ती मात्र वाचताना खरोखर हसु आले होते) कधी प्रेमकथा कधी नुसती धक्का नसलेली भूतकथा असे वाचायला मिळते आणि निराशा होते (माझ्यासारख्या तुमच्या भयकथांच्या चाहत्यांची).
एखादी भयकथा लिहाल का लवकर?:)
(तुम्ही वेगवेगळे प्रकार लिहुन पाहताय ते उत्तम पण तुमचे कोअर स्ट्रेन्थ भयकथाच दिसतेय. (हे आपले माझे वैयक्तीक मत आहे बरे का..उगाच मायबोलीकरांच्या मेसेजेस ची मारामारी नको:)
धन्यवाद.
साधी सरळ
साधी सरळ नेहमीचीच प्रेमकथा पण तुझ्या भाषेंत तुझ्या शैलीत छान व्वाटलं.... पण चाफ्या, तु भयकथांत लय भारी असतो गड्या.
>>>>माफ कर
>>>>माफ कर मित्रा पण तू भूतकथाच लिही रे...
>>>>>एखादी भयकथा लिहाल का लवकर?
>>>>>पण चाफ्या, तु भयकथांत लय भारी असतो गड>>>>
ऐका रे ! मला भुत्याटल्या म्हणणार्यांनो, आता करा आरोप माझ्यावर माणसांवर कथा लिहीत नाही म्हणुन !
.................................................................................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !
कायम
कायम भुतोस्कीचा हैदोस घालणार्याने अशा माणूसकीच्या गोष्टी केल्या की पचत नाहीत रे.
कदाचित समस्त मायबोलीकरांनी तुझ्यावर कायमस्वरूपी 'भुताय ठप्पा' मारल्याने हा चाफ्फाच असं वाटत नाही.
बाकी या कथेला 'चाफ्फा' शोभतो.
कथानक फार
कथानक फार छान आहे.....मि हि कथा दोन वेळा वाचलि......खुप छान ....अशेच लिहित रहा.....
.........................................................................................................
चलातु चहितमा चआहे चझ॑मा चनाव...?????
चदिपस॑ चनामे.....हा हा हा....................
Pages