Submitted by अमोल सूर्यवंशी on 17 October, 2013 - 01:56
किल्ले दुर्गाडी - कल्याण:
किल्याचा प्रवेशद्वारः
किल्याचा प्रवेशद्वारः
किल्याकडे जाण्याचा रस्ता:
किल्यात वरती गेल्या वर देवीचे छान मंदिर आहे. त्याच मंदिराचा हा कळसः
मंदिराच्या एका भींति वरती एक छान शिवमुद्रा कोरली आहे.
या किल्ल्यावरती पहिले मुसलमानांचे राज्य होते. त्यावेळची ही मझ्झिद आहे पण आता फक्त एकच भिंतिचा भाग उरला आहे.
मझ्झीदीची भिंत
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा अमोल, तुम्हाला खूप खूप
व्वा अमोल, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. प्रचि तर छान आहेतच पण नुसत्या धाग्याच्या नावानेच जुन्या आठवणी जाग्या झाल्या... मी आणि माझी मैत्रीण १०वीच्या परिक्षेनंतरच्या सुट्टीत मॉर्निंग वॉकला जायचो दुर्गाडीला. माझ माहेर कल्याणच. लग्नानंतर पुण्यात आले आणि आता आईबाबा पण इथेच आले आहेत त्यामुळे गेल्या २ वर्षात कल्याणशी आणि पर्यायाने दुर्गाडीशी संबंधच नाही आला...... तुमचे फोटो बघुन अपडेट झाल्यासारख वाटल आणि इतक्या वर्षात किल्ल्याला दिलेला रंग हा भाग सोडल्यास बाकी गोष्टी जश्याच्या तशा आहेत हे बघुन बर वाटल.
कल्याण स्टेशन पासुन
कल्याण स्टेशन पासुन दुर्गाडीला कसे जायचे ?
प्रितीभुषण, कल्याण स्टेशनवरुन
प्रितीभुषण, कल्याण स्टेशनवरुन रिंगरोड/ रिंगरुट(स्टेशन टु स्टेशन) बस आहे K.D.M.C.ची त्या बसने जाता येईल, दुर्गाडी नावाचा बस थांबा आहे. हा बसथांबा एका चौकात आहे तिथे उतरुन रस्ता ओलांडुन पायी साधारण ५-१० मिनीटात तुम्ही दुर्गाडीला पोचु शकाल किंवा शेअर रिक्षा करुनही जाता येईल पण मला वाटत शेअर रिक्षा फक्त लाल चौकीपर्यंतच आहेत. सध्या पुढेपण जात असतील तर माहित नाही.
बाकी सध्याच्या कल्याणकरांनी ताजी माहिती शेअर करावी.....
धन्यवाद मुग्धा. नवरात्री
धन्यवाद मुग्धा. नवरात्री मध्ये इथे किल्ल्या वरती खुप रोषणाई केलेली असते.
<< कल्याण स्टेशन पासुन
<< कल्याण स्टेशन पासुन दुर्गाडीला कसे जायचे ? >>
कल्याण स्टेशन बाहेर भिवन्डि कडे जाणार्या शेअर रिक्शा आहेत.
धन्स मुग्धा
धन्स मुग्धा
हो प्रीती. बस ने खुपच जवळ आहे
हो प्रीती. बस ने खुपच जवळ आहे कल्याण स्टेशन पासुन. नाहि तर सरळ ऑटो ने सुद्धा जाता येइल.
हो अमोल, तिथे जत्राच भरलेली
हो अमोल, तिथे जत्राच भरलेली असते मी लहान असताना एकदा गेले होते या जत्रेला.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी (अभ्यंगस्नानाच्या) पहाटे बरेच जण इथे देवीच्या दर्शनाला येतात पण यामागच कारण माहित नाही... तुम्हाला माहित असेल तर सांगा प्लीज.
अमोल ही मशीद नसून इदगाह
अमोल ही मशीद नसून इदगाह वाटतोय. इदला सर्व समुदायाला एकत्र प्रार्थना करण्यासाठी मशिद छोटी पडते त्यामुळे बहुतेकवेळा गावाबाहेर मोकळ्या पटांगणावर इदगाह भिंत असते.
मस्तच, बरेच दिवसांत जाणे झाले
मस्तच, बरेच दिवसांत जाणे झाले नाही. अमोल, देवीचा फोटो काढायला देत नाहीत कां?
छान फोटो.
छान फोटो.
अरे मस्त फोटु... लहानपणीच्या
अरे मस्त फोटु...
लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास.आम्ही इथली जत्रा अनुभवलीय.
मस्तच....
मस्तच....
छान फोटोज
छान फोटोज
फोटो दिसत नाहीत!
फोटो दिसत नाहीत!
फोटो दिसत नाहीत
फोटो दिसत नाहीत
प्रचि परत एकदा अपलोड केल्या
प्रचि परत एकदा अपलोड केल्या आहेत.
मस्त प्रिती माझ्या कडे ये आपण
मस्त
प्रिती माझ्या
कडे ये
आपण दोघी जाउ
तिथे
बरं या रवीवारी येते
बरं
या रवीवारी येते
अमोल, फोटो मस्तच! मी पण
अमोल, फोटो मस्तच! मी पण कल्याणची आहे. लग्न करून पुण्यात आले. त्यामुळे माहेरचे फोटो पाहून खूप आनंद झाला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी, त्रिपुरी पौर्णिमेची आरास बघायला तर दरवर्षी जायचोच. खाडीवर पोहायला जायचो. तेव्हा कल्याणला फिरायला जाण्यासारख ठिकाण दुर्गाडी आणि खाडी हेच. माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात कल्याणला झाली (माहितगारांनी चूक असल्यास ती दुरुस्त करावी, ही विनंती!)
असेच खाडीचेही फोटो काढून आजी-माजी कल्याणकरांचे डोळे तृप्त करण्याचे मनावर घ्याल का?
हो नक्कि अनया. मी खाडी चे पण
हो नक्कि अनया. मी खाडी चे पण प्रचि काडून लवकरच अप्लोड करेन.
अनया तुझी माहिती अगदी १००%
अनया तुझी माहिती अगदी १००% खरी आहे. तुझ माहेर कल्याणमध्ये कुठे आहे?
पारनाका. सिद्धेश्वर आळी. शाळा
पारनाका. सिद्धेश्वर आळी. शाळा ओक हायस्कूल. विशेष आवडत्या जागा: खिडकी वडा, सुभेदार वाडा गणपती, खाडी आणि खूप प्रेमाची माणस!
अय्यो.. मुग्धा, अनया,
अय्यो.. मुग्धा, अनया, पियापेटी.. मी अं.नाथ ची
नेहमीप्रमाणेच एखाद्या
नेहमीप्रमाणेच एखाद्या प्रसिद्ध मंदीराजवळ मशिद पाहून काहीच आश्चर्य वाटले नाही.
बाकी फोटो मस्तच.
अनयाआआआआआआ सिद्धेश्वर
अनयाआआआआआआ सिद्धेश्वर आळीइइइइइइइ कुठे???????? (आनंदातिरेकाने नाचणारी बाहुली)
मी सिद्धेश्वर सोसायटीत 'बी' विंग मध्ये रहात होते.... तु कधी १० पास झालीस माझी खासम खास मैत्रीणपण ओक हायस्कुलमध्ये होती. मी सुभेदार वाड्यात होते.
पियु, माझी आतेबहीण असते अंनाथला. तु इस्ट की वेस्ट??? ही स्मायली कुठुन मिळवलीस एकदम भारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्यासाठी चला एकत्र येऊ या!

मस्त! लहानपणीच्या आठवणी
मस्त! लहानपणीच्या आठवणी जागवल्या. माझं माहेर डोंबिवली, त्यामुळे कल्याणला, दुर्गाडी किल्ल्यावर अनेकदा जाणं व्हायचं. किल्ल्याचे अजून फोटोज असतील तर टाका ना.
मी कल्याणची मुलगी.
मी कल्याणची मुलगी. लहानपणापासून दुर्गाडी ओळखीचा. त्रिपुरी पौर्णिमेला सुंदर आरास असायची. खाडीवर पोहायला जायचो ते दुर्गाडीच्या पायांशी.
खरंच फोटो टाका. आवडतील बघायला.
<<शिवाजी महाराजांच्या
<<शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात कल्याणला झाली>>
बरोबर आहे. दुर्गाडीलाच मराठा आरमाराची स्थापना झाली होती. त्याची आठवण म्हणून भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या टी-८० गस्ती नौकेला लवकरच संग्रहालयाच्या रुपात इथं जतन करून ठेवलं जाणार आहे.