Submitted by Prashant Pore on 14 October, 2013 - 14:56
तुझ्या मनाला जसे हवे तसे तसे तू छळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा
सुपातला मी असेन पण मला भरडणे टळेल का?
पहा विधात्या जमेल तर शिवाय माझ्या दळून जा
महारवाडा इथे जळे सवर्णतेच्या धगीमुळे
म्हणून चोख्यापरी कधी विठू मला आढळून जा
इथे कुणाला कुठे असे उसंत थोडी जगायला?
धकाधकीच्या जगी कधी उगव कधी मावळून जा
सदा मला सांगतोस तू व्यसन विषारी कट्यार ही
जिवास धोका असे तरी विडा 'डबल' तू मळून जा
त्रिकालबाधीत सत्य हे मला उमगले हळूहळू
पतंग आहेस ना सख्या? दिव्यावरी मग जळून जा
मला जिथे जाळले तिथे कधीतरी ये बसून जा
भकास माझे स्मशान हे सुगंध हो दरवळून जा
तुझ्याविना मी जगायचे कठीण आहे विचारही
अहेवपण दे मला यमा जमेल तेव्हा गिळून जा
फुलास केव्हा तमा कसे जगावयाचे परागकण?
जगास आनंद द्यायला फुलून ये उन्मळून जा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय छान अनेक मिसरे सुंदर
अतिशय छान
अनेक मिसरे सुंदर अनेक शेरही छान प्रवाहीपणा नेहमीपेक्षा छान उतरलाय ओळींमध्ये
दळून आणि दरवळून हे जास्त आवडले
अभिनंदन ह्या गझलेबद्दल
व्वाह!! पहिले चारही शेर
व्वाह!!
पहिले चारही शेर प्रचंड आवडले ! मस्तच..
छान इथे कुणाला कुठे असे उसंत
छान
इथे कुणाला कुठे असे उसंत थोडी जगायला?
धकाधकीच्या जगी कधी उगव कधी मावळून जा
व्वा!
त्रिकाल + अबाधित =
त्रिकाल + अबाधित = त्रिकालाबाधित
इथे 'त्रिकालबाधित' अशी सूट घेता येईल असे वाटत नाही. कारण असा संधीच होणार नाही. किंवा मग त्याचा अर्थ नेमका उलटा पकडायला हवा..
त्रिकाल + बाधित = त्रिकालबाधित !!
विचार व्हावा, ही विनंती.
मला जिथे जाळले तिथे<<< नवीन
मला जिथे जाळले तिथे<<< नवीन प्रथा पडेल जुनी प्रथा म्हणजे 'दफन' झालेल्या शायर लोकांनी पडली होती त्यांच्या प्रेयस्या त्यांच्या शेरात त्यांच्या कबरीवर आसू ढाळायच्या वगैरे त्याच प्रथेचे हे हिंदवीकरण न झेपणारे
यमाचा शेरात तुझ्याविना मी जगायचे कठीण आहे असे यमाला सांगत आहात असा फील उघडपणे येतोय विचित्र त्यामुळे हे प्रकरण जरा वाटते आहे शिवाय जगायचे विचार असा एक डिसाइन पॅटर्ण शेरात राहून गेलाय मह त्याला अहेत हे क्रियापद लावावे लागते त्यापेक्षा >>>जगायचा कठीण आहे विचारही <<<असे सुलभ करता येते ..जमेल तेव्हा गिळून जा <<<< किती ते यमकानुसारी जमल्यास जरा शेराच्या भावभूमीला जपेल असातरी काफिया योजत जा
विठू आढळून जा तेही चोख्यासारखा ? मग काय सवर्णतेच्या आगीत की धगीत महारवाडा जळायचा थांबेल की दाह कमी होईल वगैरे ? नक्की काय म्हणायचे आहे आपणास ? चोखोबा आणि विठ्ठल महारवाडा आणि सवर्णतेची धग ही कथेतील पात्रे अजून एकरूप करता यायला हवी होती
विडा डबल तू मळून जा <<< आपल्याला तर आवडली बउवा पण तज्ञांच्या मता नुसार गझलगांभीर्य नावाचा प्रकार जपायला हवाच
पतंग- दिवा पुन्हा पारंपारिक उर्दू प्रतिमा ...मराठी गझलेत अधिकाधिक मराठी संदर्भच हवेत असा आग्रह दादांनी फार विचारपूरवक धरला होता विजाघेवून येणार्या पिढ्यांणी वर्तमानात तरी त्यांच्या सांगण्याकडे लक्ष द्यावे असे वाटते
मला भरडणे<<< माझे भरडले जाणे असे हवे होते का
त्रिकाल्बाधीत मधे मुळात बाधीत असे दीर्घ बरोबर आहे का हाही एक प्रश्न रणजीत्जी म्हणत आहेत तोही एक प्रश्न आहेच
विठूचा शेर करायची स्टाईल वैवकुंकडून तुम्ही मोठ्या मनाने उसनी मागीतलीय आणि त्यांनी कोत्या मनाने दिलीय असे वाटते आहे
तरी दळून मावळून व दरवळून छान वाटताय्त
असो
आपली गझल उत्तरोत्तर छान छान होत जावो ही शुभेछा (अजून चांगली गझल येवूद्यात )
आपला नम्र
~नवाच एक कुणीतरी
धन्यवाद सर्वांचे... रणजित -
धन्यवाद सर्वांचे...
रणजित - त्रिकालबाधीत वर नक्कीच विचार करेन
नवाच ..... : आपल्या एकंदर अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद
महत्वाचे : विठूचा शेर करायची स्टाईल वैवकुंकडून उसनी तुम्ही मोठ्या मनाने उसनी मागीतलीय आणि त्यांनी कोत्या मनाने दिली असे वाटते आहे >>>>>> आपल्या या वक्तव्यबद्द्ल कीव येते. आपण काय साक्षीदार होतात काय या घटनेला? मी वैभवला मागच्या ४-५ महिन्यांपासून ओळखतोय आणि वाचतोय.. (स्वतः वैभव आपणास याबद्द्ल खात्री देवू शकतील) आणि मी असे "विठू" उल्लेख असलेले शेर बर्याच वर्षांपासून करत आहे. आणि माझ्या माहिती प्रमाणे "विठ्ठला" चे पेटंट अजून तरी कुणी घेतलेले नाही...
मी वैभव इतके विठ्ठ्लमय शेर लिहित नाही.. किंबहुना माझी विठ्ठ्लाची भक्ती त्याच्यापेक्षा कमीही असेल कदाचित.. पण याचा अर्थ मी ते उसने घेतले आहेत असे फालतू आणि बिनबुडाचे आरोप करू नयेत ही विनंती
आणि बोलायचेच असेल तर "नवाच..." असे खोटे मुखवटे चढवून कशाला बोलताय...?
आणि उर्दूतून आलेली गझल आपणास चालते आणि त्यातले एखाद-दुसरे प्रतिक चालत नाही म्हणजे आश्च्रर्यच आहे! शुद्ध मराठमोळे असे बरेच काव्यप्रकार आहेत की.. ते वाचा की मग...
इथे कुणाला कुठे असे उसंत थोडी
इथे कुणाला कुठे असे उसंत थोडी जगायला?
धकाधकीच्या जगी कधी उगव कधी मावळून जा<<< छान!
धन्यवाद बेफीजी...
धन्यवाद बेफीजी...
वा ! खूप छान लिहिलेस... आवडली
वा ! खूप छान लिहिलेस...
आवडली गझल
काका आभारी आहे
काका आभारी आहे
मस्त गझल ...मावळून विशेष
मस्त गझल ...मावळून विशेष
महारवाडा इथे जळे सवर्णतेच्या
महारवाडा इथे जळे सवर्णतेच्या धगीमुळे
म्हणून चोख्यापरी कधी विठू मला आढळून जा
इथे कुणाला कुठे असे उसंत थोडी जगायला?
धकाधकीच्या जगी कधी उगव कधी मावळून जा
व्वा…
शुभेच्छा.
धन्यवाद देवा, वैभवा
धन्यवाद देवा, वैभवा
तुमचा मतला वापरून मी एक कविता
तुमचा मतला वापरून मी एक कविता केली आहे...तुमची कविता फारच आवडली..!!
धन्यवाद माऊ... मतल्याचा उला
धन्यवाद माऊ...
मतल्याचा उला मिसरा माझा आहे
सानी मिसरा रणजीत पराडकरांचा आहे..
आपण कोणत्या ओळीवरून कविता केलीय..?
छान आहे ...आज वाचली . मला
छान आहे ...आज वाचली .
मला जिथे जाळले तिथे कधीतरी ये बसून जा
भकास माझे स्मशान हे सुगंध हो दरवळून जा
तुझ्याविना मी जगायचे कठीण आहे विचारही
अहेवपण दे मला यमा जमेल तेव्हा गिळून जा
विशेष आवडले .
(No subject)
खूप सुंदर आहे ही गझल ... बरंच
खूप सुंदर आहे ही गझल ... बरंच शिकायला मिळालं...धन्यवाद...
...फक्त 'डबल' शब्द खटकला.....
दुसरा पर्यायी मराठी शब्द नाही मिळू शकत का?
प्रशान्त जी... ही माझी
प्रशान्त जी...
ही माझी कविता..
तुझ्या मनाला जसे जमेल तसे तसे तू छळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा
एकेक श्वास धावतो तुझ्या सावलीमागे
आयुष्यभर शोधेन तुला, आज जरासा मिळून जा
स्वप्न दे नाव दे वा आठवान्चा गाव दे
एकदा मिठीत ये नव्याने सळसळून जा
साराच गाव आला सान्त्वनास मज ह्रुदयाच्या
भरतेय जखम जराशी, तूही ये हळहळून जा
जमणार न मला कधीही पुन्हा भेटणे तुला
मनाच्या मैफीलीत मग सुगन्ध हो, दरवळून जा..
-रसिका
तुमचा मतला वाचल्यावर दुसरे काही सुचलेच नाही...:)
(No subject)