नवीन तरही गझलेत माझा नम्र सहभाग! कवी रसप यांची आकर्षक ओळ त्यांनी तरहीसाठी योजायला दिल्याबद्दल त्यांचे व धाग्यासाठी डॉ. कैलासराव यांचे आभार!
-'बेफिकीर'!
===================================================
पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा
नकोत कुठले उपाय अन् नकोत कुठलीच औषधे
जशी उमलते जुनी जखम तशीच तू भळभळून जा
पुन्हा नको तू म्हणूस की कशास भेटायचे पुन्हा
मला नको तू कळूस पण तुला तरी तू कळून जा
तुझी अवस्था जशी तिथे तशीच मी सोसतो इथे
कधीतरी हळहळून ये कधीतरी हळहळून जा
जगात व्यवहार चालतो... कसे तुला सांगणार मी
प्रफुल्लतेने सजून ये... विषण्णतेने मळून जा
सचेतनेचा प्रवाह हो नसानसांना तुडुंब कर
मनातुनी पाझरून ये तनावरी ओघळून जा
उषा गुलाबी बनून ये... करून माध्यान्ह केशरी
जशी तिन्हीसांज रंगते तशीच तू जांभळून जा
तुझ्या नशीबी असोतही अजून कित्येक वादळे
असेल बळ ... 'बेफिकीर' हो.... नसेल तर उन्मळून जा
-'बेफिकीर'!
वाह वाह.... अप्रतिम
वाह वाह.... अप्रतिम गझल.
उषा गुलाबी बनून ये... करून माध्यान्ह केशरी
जशी तिन्हीसांज रंगते तशीच तू जांभळून जा
या शेरातील जांभळून या शब्दास एक विशेष संदर्भ असल्याने फार आवडला हा शेर.
पुन्हा कधी ना म्हणेन मी...
पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा
नकोत कुठले उपाय अन् नकोत कुठलीच औषधे
जशी उमलते जुनी जखम तशीच तू भळभळून जा
पुन्हा नको तू म्हणूस की कशास भेटायचे पुन्हा
मला नको तू कळूस पण तुला तरी तू कळून जा
तुझी अवस्था जशी तिथे तशीच मी सोसतो इथे
कधीतरी हळहळून ये कधीतरी हळहळून जा
तुझ्या नशीबी असोतही अजून कित्येक वादळे
असेल बळ ... 'बेफिकीर' हो.... नसेल तर उन्मळून जा
>>>>
दुनियाभारी शेर !! व्वाह्ह !
मतला तर आरपार..................!! मी नुसता गुणगुणतोय तो मतला!
मजा आ गया सरजी!
>>या शेरातील जांभळून या
>>या शेरातील जांभळून या शब्दास एक विशेष संदर्भ असल्याने फार आवडला हा शेर.<<
डॉक.,
म्हणजे ??
व्वा !
व्वा !
दं ड व त !!!
दं ड व त !!!
असेल बळ ... 'बेफिकीर' हो....
असेल बळ ... 'बेफिकीर' हो.... नसेल तर उन्मळून जा>> simply superb!
निव्वळ अप्रतिम. मक्ता
निव्वळ अप्रतिम.
मक्ता अफाटच्या अफाट.
सर...मस्तच...
सर...मस्तच...
अथपासून इतिपर्यंत निव्वळ निखळ
अथपासून इतिपर्यंत निव्वळ निखळ अहाहा.. क्वचित लाभतात असे शब्द.
पुन्हा कधी ना म्हणेन मी...
पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा >>>> भन्नाट शेर
बाकीचे शेरही छान !!!
वाह वाह!! बेफिकीर टच...फारच
वाह वाह!! बेफिकीर टच...फारच सुन्दर!
असेल बळ ... 'बेफिकीर' हो.... नसेल तर उन्मळून जा..
पुन्हा कधी ना म्हणेन मी... भरून ये.. कोसळून जा
कवेत माझ्या अखेरचे... भिजून तू विरघळून जा..
हे आवडले..:)
अप्रतिम
अप्रतिम
जगात व्यवहार चालतो... कसे
जगात व्यवहार चालतो... कसे तुला सांगणार मी
प्रफुल्लतेने सजून ये... विषण्णतेने मळून जा
अप्रतिम शेर. मक्ताही आवडला.
व्वा. सर्व शेर आवडले. मळून,
व्वा.
सर्व शेर आवडले.
मळून, हळहळून आणि मक्ता जबरदस्त.
तरही इतकी भारी होण्याचे एक विरळ उदाहरण!
अप्रतिम! पुन्हा पुन्हा वाचतेय
अप्रतिम!
पुन्हा पुन्हा वाचतेय !
अप्रतिम!!! किती आवडली ही गज़ल
अप्रतिम!!! किती आवडली ही गज़ल ते सांगायला शब्दच नाहीत माझ्याकडे.
सर्व शेर आवडले... सुंदर
सर्व शेर आवडले...
सुंदर
अतिशय सुरेख गझल, प्रत्येक आणि
अतिशय सुरेख गझल, प्रत्येक आणि प्रत्येक शेर मनाला भावला..
भळभळून हळहळून मळून हे सर्वात
भळभळून हळहळून मळून
हे सर्वात विशेष वाटले.
हळहळून हा खास.
अर्रे वा! मस्त गझल!
अर्रे वा! मस्त गझल!

('सचेतनेचा' आणि 'जांभळून' इथे अडखळले वाचताना, पण शेर सगळेच मस्त!)
अख्खी गझल आवडली . मक्त्यासाठी
अख्खी गझल आवडली .
मक्त्यासाठी उभे राहून टाळ्या !!
(No subject)
पुन्हा नको तू म्हणूस की कशास
पुन्हा नको तू म्हणूस की कशास भेटायचे पुन्हा
मला नको तू कळूस पण तुला तरी तू कळून जा....
,,,,,,अप्रतिम, वगरे,वगरे शब्द हि थिटे!
"बेफिकीर" अलगत भेटे तिथे !!
ग्रेट सर्वांशी प्रचंड सहमत
ग्रेट
सर्वांशी प्रचंड सहमत
निवडक दहात ! धन्यवाद !
निवडक दहात !
धन्यवाद !
क्या बात है! खूप आवडली
क्या बात है! खूप आवडली गझल!
शेवटचा मिसरा तर केवळ अप्रतिम आहे!!
>>मनातुनी पाझरून ये तनावरी
>>मनातुनी पाझरून ये तनावरी ओघळून जा
सुंदर
बेफिकीर , खूप छान गझल. आवडली.
बेफिकीर , खूप छान गझल.
आवडली.