Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2013 - 11:56
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो
अभिप्राय द्यावा तरी घोळ होतो
कुणाला नकोशी अशी आज माशी
कधी एक संपूर्ण मोहोळ होतो
किती टेकड्यांचे सपाटीकरण हे
तरी हायवेचा कसा बोळ होतो
मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो
कशाला इथे यायचे हे कळेना
इथे रोजचा हल्लकल्लोळ होतो
तुला 'बेफिकिर' भेटला की तुझाही
समुद्रापुढे तुच्छ ओहोळ होतो
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला बहुतेक मागे फुटकळ
मतला बहुतेक मागे फुटकळ शेरांमध्ये वाचला होता ..बेस्टच आहे !
मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो>>सुंदर
मक्ता नेहमीप्रमाणेच दर्जेदार !
छानच....
छानच....
लिहावे स्वतः तर गदारोळ
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो
अभिप्राय द्यावा तरी घोळ होतो......... दं ड व त !!!
किती टेकड्यांचे सपाटीकरण हे
तरी हायवेचा कसा बोळ होतो..........अफाट निरिक्षण क्षमता ! मान गये !
मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो.........क्या बात ! क्या बात !!
क्या बात, सुंदर
क्या बात, सुंदर
हल्लकल्लोळ ?? माझ्या
हल्लकल्लोळ ?? माझ्या माहितीनुसार ल ला ल नसतो बहुधा . माझे काही चुकत असल्यास क्षमस्व
सर्व शेर छानच
कशाला इथे यायचे हे कळेना <<< ह्या ओळीवरून एक सुटा शेर आठवला
ह्या इथे यावे आसे काहीच नाही
छान वाटावे असे काहीच नाही
धन्यवाद
एक से एक आहेत सर्व शेर.
एक से एक आहेत सर्व शेर.
अप्रतिम एकदम.
कशाला इथे यायचे हे कळेना इथे
कशाला इथे यायचे हे कळेना
इथे रोजचा हल्लकल्लोळ होतो
व्वा. छान आहे गझल.
लिहावे स्वतः तर गदारोळ
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो
अभिप्राय द्यावा तरी घोळ होतो
मस्त...
किती टेकड्यांचे सपाटीकरण
किती टेकड्यांचे सपाटीकरण हे
तरी हायवेचा कसा बोळ होतो
मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो
हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
वा वा मस्त !
वा वा मस्त !
'बेफी'टाईप... आवडली.. मक्ता
'बेफी'टाईप... आवडली..
मक्ता तुफान
लिहावे स्वतः तर गदारोळ
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो
अभिप्राय द्यावा तरी घोळ होतो
आवडली गझल. हल्लकल्लोळ फार
आवडली गझल.
हल्लकल्लोळ फार आवडला.
मक्ताही मला आवडला.
आवडली पण एक शंका आहे.... माशी
आवडली पण एक शंका आहे....
माशी 'मोहोळ' होतो ... ? असे चालते का/?
मी चुकुन लिहावे स्वतः तर
मी चुकुन लिहावे स्वतः तर गरोदर होतो वाचले
माशी 'मोहोळ' होतो ... ? असे
माशी 'मोहोळ' होतो ... ? असे चालते का/?<<<<<
)
चालते नक्कीच चालते का व कसे ते पहा ......
या शेरात शायर स्वतःबद्दल बोलत आहे मी हा शब्द शेरात कुठेही नाही पण होतो ह्या क्रियापदाचा वापर इथे शायर स्वतःबद्दल बोलताना करत आहे हे लक्षात घावे . काल आणि आज परिस्थिती कशी बदलली आहे हे शायर सांगत आहे . आज मी कुणाला नकोशी झालेली एक माशी आहे कधी (काल /पूर्वी) मी कुणाला नकोसे असे एक अख्खे मोहोळ होतो (आता मी लोकाना किती हवासा वाटू लागलो आहे पहा !!
मी मधे बोललो त्याबद्दल क्षमस्व बेफीजी
जबराट
जबराट
मलाच सुचले काही हे
मलाच सुचले काही हे वाचताना..किती छान..
मस्त गझल.... सगळेच शेर
मस्त गझल.... सगळेच शेर अफलातून आहेत.
छान गज़ल!!!
छान गज़ल!!!
मला तू सुचावीस हे वाटते
मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो
>> व्वाह !! मस्त..
(मला माझा एक शेर आठवला..)
मतला फार मस्त आहे! बोळ शेरही
मतला फार मस्त आहे! बोळ शेरही आवडला.
___________/\_____________
___________/\_____________
छान आहे. >> कशाला इथे यायचे
छान आहे.
>> कशाला इथे यायचे हे कळेना
इथे रोजचा हल्लकल्लोळ होतो >> एकदम सही
कुणाला नकोशी अशी आज माशी कधी
कुणाला नकोशी अशी आज माशी
कधी एक संपूर्ण मोहोळ होतो....
मस्त....!