बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप दिवसांनी खरी मज्जा पार्टी झाली काल! खरय मै, शेकोटीमुळेच सगळ्यात जास्त मजा आली. Happy
मै आणि मकरंदचे धन्यवाद!

मै, ते पेशावरी छोले अख्ख्या पेशवारात सुद्धा इतके भारी मिळायचे नाहीत असं मी छातीठोक पणे सांगू शकतो. तुझ्या टेबलावरचा सुदानी केळ्यांचा घड फारच सुबक होता.
शेंटरला विकु अन साईडनी मकरंद अशी फटकेबाजी बघायला/ऐकायला खुप मजा आली. देसायांचा एग्जॉटिक बेली डान्स तर अप्रतिमच त्यात शेवटी झालेल्या कवितेच्या गौप्यस्फोटामुळे त्याला चारचांदच लागले.

शेकोटी गीत नाही पण चांद वर आधारित गीत बाईंनी गायलं नंतर.
येवढं खाललय, आज लंघन करावेसे वाटतेय!

ओ अमृतसरी होते का? माहौल इतका दा टला होता की मला पेशावरी ऐकू आले असतील चुकून. Proud

ओवर इटिंग ची स्पर्धा असल्यासारखी खा खा झाली काल- अ‍ॅ़ज युज्वल ! तरी कालच्या उरलेल्या वड्यांना आज सकाळी सोन्याचा भाव आला होता Lol

मला सर्वात जास्त आवडला तो बुवानी सांगितलेला गुरूवारचा विनोद. त्यानंतर खिश्यात 'उभ्या उभ्या विनोदचं नवीन लिखाण तयार असूनही मला ते करण्याची गरज वाटली नाही. बाकी माबोकरा.न्नी अनुल्लेखाने मारलं Proud पण ते चालायचंच..
Proud

गुरवार वॉज द सुपर हिट!! गोगा, तुम्हाला भाव द्यावा लागतो हे लक्षात आले नाही. असू दे, आता मेलबॉक्सात कागद ठेवून जावा, सवडीने हसून तुमच्या मेलबॉक्सात स्माइली ठेवून जाईन. Happy
पण त्या आधी ती पास्ताची रेसिपी तातडीने लिहा. मुले आता लवकरच तो पास्ता तस्साच्या तस्सा करून न घातल्यास भूक हरताळ करतील परिस्थिती आहे!

एवढा भाव पुरे. लिहितो पण आगकोल्हा आणि आई (IE )फारच त्रास देताहेत. तेव्हा थोडा वेळ लागतोय.. आज रविवार असल्याने असेल.. Proud

खाडाखोड करायला गेलं की आधी लिहीलेली सगळी अक्षरं कचर्‍यात जाताहेत. Sad

(IE ) वर काहिच टायपता येत नाहीय आणि आगकोल्हा जाहीरातिंच्या Script Loop मधे आहे.

.

देसायनू, पास्ता खरच खुप छान झाला होता. मी तर परत खाललाच इथे पण बारक्याही विचारत होता पास्ता आहे का म्हणून. Happy
काय च्यामारी दुसर्या बाफं मुळे ह्या बाफंचा टि आर पी एकदम गळाच की ओ! शो ना हो.

एवढंच ? नुसता काक्वा वाहन गटग चा वृ लिहीलात तरी अजून ३०० पोस्ट्स होतील... लिहा बघू Proud

झालंच तर मै कडची शेकोटी, गोगांचा उभ्या उभ्या (भावयुक्त) पास्ता, ईबांचं गाणं (हे शेवटी होतं का ? :हाहा:), बुवांचं संध्या (श्लेष अपेक्षित) नृत्य यावर पण लिहा.
भाई?(न खाता) गेले का ? सिंडी च्या कोणत्या पदार्थाने कोणाला अ‍ॅलर्जी आली इ. इ. पण लिहा... Wink

Lol
न खाता जायला भाई आलेच कुठे? बारानंतर वाट बघून शेवटी आम्ही निघालो.
ह्या सगळ्या मजेखेरीज आम्हांला गुरूवारचं वेगळंच महत्व कळलं. त्यावर गोगा सारखे खुदखुदत होते. त्याचा वृत्तांत फक्त मेलमध्येच येईल Wink

मिलिंदा सारखा माझ्या गाण्याला का हसतो? त्याला माझ्या आवाजात कसकसला मिलाफ आहे ते सांगा बरं. Proud

एम्टी आणि श्री एम्टी यांचे विशेष आभार. (शेकोटी आणि दुधासाठी - असं लिहिणार होते, पण मग डिज्जेला नाही त्या आयडियाज येतात. :P)

बाई, तुम्ही शेकोटीभोवती डिज्जे म्हणतेय तशी चादर पांघरूनच बसला होतात.
बाईंचा आवाज आश्वासक आहे.

त्याला माझ्या आवाजात कसकसला मिलाफ आहे ते सांगा बरं. >> मिलींदाचा लाफ आहे अस मिलींदाला वाटत म्हणुन तर तो लाफतो. Happy
असो. मी येतो म्हणालो तर सगळ्यानी नको म्हंटल. मग मी घरीच शेकोटी करुन गाण म्हंटल. ती ऐकायला हरणं आली होती. आता शेजारी पण येतील म्हणुन मग बायकोने घरात नेल. Happy

नको, योग्य जागी टाका. तिथे पाककृती टाकल्याशिवाय ललितांवर मत देण्याची अर्हता येत नाही आजकाल. Proud

भाई, कशी आहेत मग हरणं आता? Proud

च्च, च्च, बाई, अहो पाककृती लिहिल्या म्हणजे ललितावर प्रतिसाद द्यायला योग्य आहात असं समजू नये असं आहे ते. मी राहुल रॉय आहे. मला विचारा Proud

Pages