Submitted by निनाद on 2 October, 2013 - 22:32
जयन्ता५२ यांची छोट्या बहराची गझल इतकी प्रभावी असते की विडंबन शक्यच होत नाही.
धमक ही गझल वाचल्यावर रहावलेच नाही.
जरा मोठीशी गझल मिळाली आहे
आणि विडंबनाची वेळ साधली आहे
जयन्ता५२ यांची मनापासून माफी मागून...
(५ करण्यासाठी एक कडवे मी खिशातून घातले आहे. गझल करण्याची किती ती खुमखुमी )
(धमक)
तोवरी हासण्याची धमक आहे
जोवरी सासर्यांची कुमक आहे
तो सासराच पहिला कवी होता
दुःख ताणुनी सासूचे यमक आहे
पादता ती, कशी हासते दुनिया
त्रिफळाचूर्ण सुखाचे गमक आहे!
लाचार हासण्याची वेळ आहे
वासच असा त्रिखंडात्मक आहे
देह कां उजळला येव्ह्ढा माझा?
ही एकाच झापडीची चमक आहे!
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users