१२ डिसेम्बर २००६
का? का? आणि का? माझ्याच बाबतीत अस का व्हाव? आज माझ्या बेस्ट फ्रेन्डनी मला सांगितल की परवाचा माझा वाढदिवस त्याने नाही तर आमच्या ग्रुप मधल्या एकाने केला होता फक्त माझ्यासाठी! का हे अस व्हाव माझ्याच बाबतीत? म्हणजे मी परवा जे विचार करत होते, ते सगळे खोटे थरले. ब्लडी हेल! किती चेष्टा करावी माझी नशीबानी? किती क्रुर थट्टा आहे ही? म्हणजे त्याच प्रेम माझ्या नशीबात नहिच का? परवा बहरून आलेले सगळेच विचार किती लवकरविरु गेले? बस आता मी ठरवलय हे सगळ सगळ विसरून जायच आणी फक्त करीयर वर लक्ष केन्द्रित करायच.
५ जानेवारी २००७
गदरिन्गचे दिवस आहेत. जोरदार तयारी चालू आहे. मी पण एका स्किट मधे भाग घेतला आहे. माझ्या त्या मित्राने ज्याला मी खूप आवडते त्यानीच बसवल आहे. काय फरक पडतो. तो मला काही सान्गत नाही तो पर्यन्त तरी काही प्रॉब्लेम नाही. छान प्रॅक्टिस चालू आहे. माझ्या एन्ट्रीला छानस हिट गाण आहे. मला काही फार छान नाचता येत नाही, पण जमलय! त्याने कम्मेंट केली की ते माझ्या पर्सनॅलिटीला सूट होत नाही. मी फार मनाला लावून घेणार नाही पण काही गरज होती का कमेंट करायची?
२५ जानेवारी २००७
आज आमचा पर्फॉर्मन्स होता! मस्तच झाला. सगळ्यांना आवडला. एक एक्सेप्शन सोडून पण काही फरक नाही पडत. मी खरच एन्जॉय केल खूप. मस्तच! मग आम्ही जाउन छान जेवण केल. आणी मग रात्री उशीरा घरी!
२ जानेवारी २००७
मला आज एक भलतीच न्युज होती. त्या माझ्या चाहत्याला मी सान्गितली माझ्या त्याची कमेंट! तर तो भलताच भडकला म्हणे! त्याने म्हणे "त्या"ला धमकीच दिली. की माझ्यामुळे सगळे सीनियर (तो सीनियर होता) त्याच्याविरुद्ध उभे ठाकले नाहीत नाहीतर त्याच काही खर नव्हत. मी जाम घाबरले, माझ्यामुळे त्याला काही झाल तर मला कधीच सहन होणार नव्हत, मी जाउन त्याला सगळ सान्गितल. तो म्हणाला काही काळजी करू नकोस मी त्याच्याशी उद्या बोलेन. मी म्हणल आपण दोघ बोलू. तो ठीक आहे म्हणाला. मी सशाच्या काळजानेच घरी पोहोचले.
३१ जानेवारी २००७
मी नसताना "त्या"ने त्या सीनियरशी का बोलाव? आधी ठरल असताना? त्याने बोलून घेतल आहे आणी आता मला फोन केला भेटुया म्हणून! मी गेले जरा रागातच गेले त्याला भेटायला. तो म्हणाला त्याचा गैरसमज झाला आहे की तू माझच सगळ ऐकतेस आणी मी म्हणलो म्हणून तू स्किट करणार नव्हतीस! मी म्हणल शी! त्याला अस का वाटत काय माहीत?
तो: तुला नाही वाटत, की आपण आपल रीलेशनशिप डिफाइन करायला हव म्हणून?
मी: मग तुझ काय म्हणणं आहे? ( ह्रूदयाचा ठोका उगाचच चूकलेला)
तो:................................................................................................................................ वेल, आय लव्ह यु! आय रीयली डू!!!!!
मी: (स्पीचलेस) ह्रुदयामधे अनामिक भावना, संमिश्र भावना!
तो: तुला काय वाटत?
मी: (अजुनही जमिनीवर आलेली नाहिये. गोंधळलेली) मला नाही माहीत.
तो: ठीक आहे
मी: ( आता मला कळतय मी काय बोलुन गेले आहे ते) नाही म्हणजे मला थोडा वेळ हवा आहे! ( अजुनही पुरती भानावर नाही आले)
तो: ठीक आहे
आम्ही आपापल्या घरी आहोत. मला काहीच सुचत नाहिये!!!!!!!!!!!!!!!!!! आनन्द, आश्चर्य अशा सम्मिश्र भावना आहेत. जे काही घडून गेल आहे त्यावर अजून विश्वास बसत नाहिये.
१ फेब्रुवारी २००७
काल रात्रभर जागं राहून उजळणी केली आहे तरी आज आत्ता समोरासमोर बसल्यावर शब्दच सापडत नाहियेत. धीरच होत नाहिये त्याच्या कडे मान वर करून बघण्याचा.
मी: ( धीर करून, डोळ्यात बघून), मला पण तुझ्याबद्दल तेच वाटत जे तुला माझ्याबद्दल वाटत. आय लव्ह यु! आणी मला आज पासून एका नव्या नात्याची सुरुवात करायची आहे तुझ्याबरोबर, करशील तू?
तो: फक्त माझे हात हातात घेतो!
संपूर्ण.
एक संवाद
एक संवाद आठवला...
"एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते...
क्यूंकी हमेशा ये प्यार बीच मे आ जाता है...!"
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
छान लिहिली
छान लिहिली आहेस कथा...
अजुन लिही-- खुप शुभेच्छा !!!
--------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
छान आहे
छान आहे कथा...