आज सकाळीच राजीव पाटीलकडून फेसबुकवर वंशवेलच्या पेजसाठी इनव्हाईट रिक्वेस्ट दिसली. आणि दुपारी राजीव गेल्याची धक्कादायक बातमी येऊन धडकली. आम्ही सारेच क्षणभर स्तब्ध झालो. कारण ‘नाशिक मटा’च्या कित्येक कार्यक्रमांना राजीवने हजेरी लावली होती. तो नाशिकजवळचाच असल्यामुळे जवळपास सगळ्यांचेच त्याच्याशी मैत्रीचे संबंध होते. ‘जोगवा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा नाशिककरांतर्फे जोगवाच्या टीमचा जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अत्यंत घाईगर्दीत राजीवने मला दिलेली मुलाखत आठवली. मराठीत ‘सावरखेड-एक गाव’सारखा अप्रतिम चित्रपट करून राजीवने मराठी चित्रपटांच्या बदलांची नांदी दिली होती. त्यानंतर त्याच्या चित्रपटांच्या गुणवत्तेचा आलेख वाढतच गेला. ‘जोगवा’ ऑस्करला जाणार अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली होती. दुर्दैवाने चित्रपट ऑस्करला गेला नाही. पण त्यामुळे मराठी तरूण दिग्दर्शकांचा उत्साह वाढला. एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट निर्माण झाले. राजीवने आताच वंशवेल पूर्ण केला. सकाळीच मकाऊतील मिक्टा पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरबरोबर राजीव दिसला होता. पण, आता तो नाही, ही कल्पनाही करवत नाही. मराठी चित्रपट सृष्टीनं ऑस्करचं स्वप्न दाखविणारा एक हरहुन्नरी दिग्दर्शक गमावला आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
राजीव पाटीलची एक्झिट
Submitted by टोच्या on 30 September, 2013 - 08:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
अनेक उत्तम चित्रपट दिले
अनेक उत्तम चित्रपट दिले त्यांनी, दुर्देव राजीव पाटील आता आपल्यात नाहीत. श्रद्धांजली.
किती तरुण होते ते. '७२ मैल..'
किती तरुण होते ते. '७२ मैल..' रिलीज च्या वेळी त्यांची मुलाखत बघितली होती.
धक्कादायक बातमी
भावपुर्ण श्रद्धांजली.
अजूनही विश्वास बसत नहिये.....
अजूनही विश्वास बसत नहिये..... !!!
फारच वाईट झालं. त्यांना
फारच वाईट झालं. त्यांना श्रद्धांजली.
खरंच एक गुणी माणूस गेला.
खरंच एक गुणी माणूस गेला.
श्रद्धांजली.
(No subject)
खरोखर धक्कादायक.
खरोखर धक्कादायक.
(No subject)
धक्कादायक... फक्त ४० वर
धक्कादायक... फक्त ४० वर पुर्णविराम?
इतक्यातच तर प्रयोग परिवार मध्ये पाहिल्या सारखे वाटते आहे.
त्याला खरच इतका काळ लोटला का?
40 he kaahi jaayache vay nahi
40 he kaahi jaayache vay nahi
aadaranjali.
(No subject)
फार वाईट झाले श्रध्दांजली!!
फार वाईट झाले
श्रध्दांजली!!
माझी त्यांची वैयक्तिक ओळख
माझी त्यांची वैयक्तिक ओळख कधीच नव्हती.
तरी ही अशी अकाली एक्झिट फार चटका लावते.