Submitted by भाग्यश्री ७ on 28 September, 2013 - 10:01
प्रेमाने मन तुडूंब भरले सरोवरी त्या विहर सख्या
गूज मनीचे सांगुन कानी उठव तयावर लहर सख्या
तुला पाहता ओळख पटली लगेच साताजन्माची
असे वाटते याच क्षणी की गोठुन जावा प्रहर सख्या
पेलवेल ना धनू शिवाचे ? तनू तुझी सुकुमार असे......
या शंकेने मनामध्ये बघ, केला आहे कहर सख्या
तुझे दुःख दे, तुझी वेदना, तुझी यातना मलाच दे..
काहीही दे, नकोस देऊ पण विरहाचे जहर सख्या
वसंत होउन भेटलास तू या धरतीच्या कन्येला
फांदीफांदीवरी मनाच्या झुलतो आहे बहर सख्या
भाग्यश्री कुलकर्णी
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे!
छान आहे!
सुंदर रचना.
सुंदर रचना.
शाम, अमेय मनापासून आभार
शाम, अमेय मनापासून आभार
सफाई आवडली.
सफाई आवडली.
विजयजी, प्रतिसादाबद्दल
विजयजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
खूपच सुंदर ! Keep it up
खूपच सुंदर ! Keep it up भाग्यश्री !
भारती, आनंद झाला हे वाचून !
भारती, आनंद झाला हे वाचून !
खूप छान.. फसव्या वाटा, हसरी
खूप छान..
फसव्या वाटा, हसरी वळणे, भासे सारे अनोळखी
शोधुन पहाते पुन्हा एकदा तुझ्यासवे हे शहर सख्या
- रमा..
सुरेख रचना!
सुरेख रचना!
छान! शिवाचे धनू द्विपदी मस्तच
छान! शिवाचे धनू द्विपदी मस्तच आहे!!
फांदीफांदीवरी मनाच्या झुलतो
फांदीफांदीवरी मनाच्या झुलतो आहे बहर सख्या >>>मस्त..
छान गझल .
छानच... सुशांतशी सहमत
छानच...
सुशांतशी सहमत
रमा, पुलस्ती, सुशांत, अंजली,
रमा, पुलस्ती, सुशांत, अंजली, अरविंद......मनापासुन धन्यवाद!!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रमाजी, खुप मस्त आहे तुमचा शेर!!! आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या शंकेने मनामध्ये बघ, केला
या शंकेने मनामध्ये बघ, केला आहे कहर सख्या<<सर्वाधिक आवडली ही ओळ
गझलेची जमीन छान आहे आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेरही छानच पण मला जरा जास्तच गोड वाटले असो वैयक्तिक मत आहे हे माझे . आपण वाईट वाटून घेवू नयेत प्लीज
फांदीफांदीवरी मनाच्या झुलतो
फांदीफांदीवरी मनाच्या झुलतो आहे बहर सख्या <<< वा
>>>>>>>>शिवाचे धनू द्विपदी
>>>>>>>>शिवाचे धनू द्विपदी मस्तच आहे!!
+१००