Submitted by Prashant Pore on 27 September, 2013 - 08:12
चालला आहे कशाचा खल अता?
पाहिजे बदलावयाला दल अता!
व्हायचे होऊन गेले! जाऊ दे!
ना कशाचाही मनाला सल अता
वादळाने ध्वस्त केली झोपडी
पण तरीही हा दिवा प्रज्वल अता
कोण तू? कुठली? न तुजला जाणतो
एक नाते जाणतो; निर्मल अता
पाश संसारातले उद्गारती
सोडुनी दे वासनांवर जल अता
मायबापाला म्हणावे पंढरी
नांदतो देहांत त्या विठ्ठल अता
भेटतो येथे ठकाला ठक महा
तू तसा तर मी असा; बोंबल अता
(सदर गझल ही श्री. निशिकांत देशपांडे यांच्या गझलेवर तरही आहे.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोंबल अता.........क्या बात है
बोंबल अता.........क्या बात है !
थँक्स मधुरा ताई
थँक्स मधुरा ताई
पाश संसारातले उद्गारती सोडुनी
पाश संसारातले उद्गारती
सोडुनी दे वासनांवर जल अता
छान!
प्रशांत...गझल आवडली.
प्रशांत...गझल आवडली.
निशिकांतजींनी ही गझल आपल्या तरही उपक्रमांतर्गत लिहिली होती.
http://www.maayboli.com/node/21656
छान गझल. <पाश संसारातले
छान गझल.
<पाश संसारातले उद्गारती
सोडुनी दे वासनांवर जल अता
मायबापाला म्हणावे पंढरी
नांदतो देहांत त्या विठ्ठल अता
भेटतो येथे ठकाला ठक महा
तू तसा तर मी असा; बोंबल अता> फार आवडले .
कणखर जी, अमोल जी शतशः
कणखर जी, अमोल जी शतशः धन्यवाद.
डॉक्टर जी : जबरदस्त उपक्रम... __/|\__
निवडक १० त नोंदली
बोंबल अता मध्ये काफिया रदीफ
बोंबल अता मध्ये काफिया रदीफ जितक्या सहजपणे उतरलाय अगदी समोर आहात अन् बोलत आहात असे वाटण्या इतपत बोलकेपणे ...तितक्या सहज कुठेच नाही काफिया रदीफ असे आहेत म्हणून शेर केलेत की काय असे जाणवते आहे .....असो मुळात अनेक काफिये व रदीफ बरच कमी फिट होत आहेत गझलेत असे वैयक्तिक मत आहे प्लीज दुखावले जावू नेये ही विनंती