Submitted by Prashant Pore on 25 September, 2013 - 11:23
गर खुदा का तू न बंदा खास होता
आज वेड्या तू यमाचा घास होता
जिंदगीभर जो कलाई थामनी थी
त्याच हाती आज का गळफास होता?
अब कहाँ से मौत को हम रोक पाते?
मी कधीचा दान केला श्वास होता
बेवफा से भी वफा हमने जताई
नेमका त्याचाच झाला त्रास होता
जिल्लतों से भर गया दामन जमाना
सांत्वनांचा वर्मभेदी फार्स होता
ये हवाएँ आज क्या पैगाम लायीं?
येत कोणी दूरचा मजपास होता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व हिंदी ओळी फार मस्त एकंदर
सर्व हिंदी ओळी फार मस्त
एकंदर सर्व शेरही छान वाटले
माझ्या वैयक्तिक मतानुसार फार्स हा शब्द इथे काफिया म्हणून चालणार नाही मराठी गझलेत वापरायचा असेल तर हा रफारातला र् सायलेंट राहणार नाही व र् मधल्या अर्धा अ हा स्वरही दुर्लक्षिता येणार नाही
अर्थात हे माझे वैयक्तिक मत !!.....तरी तज्ञांना विचारावेत ही विनंती
कोणतीही सूचना / विनंती / आग्रह नाही कृ गै न
धन्यवाद वैभव
धन्यवाद वैभव
प्रशांत, विरंगुळा, प्रयोग,
प्रशांत,
विरंगुळा, प्रयोग, भाषेवरील हुकुमत या प्रयोजनांच्या चौकटीत अश्या रचना ठीक असतात. पण गझलेचा आत्मा, म्हणजे गलबलवून सोडणारा आशय, याला धक्का पोचत असेल तर गंमत येत नाही. कोणालाच नाउमेद करण्याचा हेतूही नाही वा अधिकारही नाही, पण असे प्रयोग रसभंग करतात, निदान माझा तरी!
हे लिहिले नसते तरी चालले असतेच, पण निव्वळ मैत्रीखातर लिहिले. आशा आहे की आपण दिलखुलासपणे हे मत वाचाल.
-'बेफिकीर'!
बरोबर आहे बेफीजी. मी लक्ष
बरोबर आहे बेफीजी. मी लक्ष देईन आपल्या सल्ल्याकडे. धन्यवाद.
मला आवडली. ईलाही यांच्या अशा
मला आवडली. ईलाही यांच्या अशा गझला आहेत. त्याही मला आवडतात.
धन्यवाद भाग्यश्री ताई...
धन्यवाद भाग्यश्री ताई...
प्रयोग चांगला वाटला.....अशा
प्रयोग चांगला वाटला.....अशा रचनांना गझलेत काही विशिष्ट नाव आहे का ?
खूप सुंदर्.........खूप खूप
खूप सुंदर्.........खूप खूप आवडली.....

मस्त आहे
सुशांतजी, मलाही कल्पना नाही
सुशांतजी, मलाही कल्पना नाही याला काही वेगळे नाव असल्याची.
मीही इलाहींच्या काही गझला ऐकल्यामुळेच असा प्रयत्न केला.
योगुली : विशेष धन्यवाद
साध्या सोप्या मराठीत ह्यास
साध्या सोप्या मराठीत ह्यास द्विभाषिक गझल म्हणतात हिंदी /उर्दूत काय म्हणतात माहीत नाही
पण ह्या प्रकारास केवळ एक प्रयोग ह्या पेक्षा अधिक स्कोप असू शकत नाही हे मात्र खरे म्हणून आपले उत्तमोत्तम खयाल व शेर अश्या प्रयोगाना का बळी पडू द्यायचे हा सवाल उरतो ,,,,म्हणून एखाद दोनदा ठीक आहेत पण अश्या प्रयोगांची सवय नकोच असे मला वाटते प्रशांतराव
मी आधीच्याच प्रतिसादात सांगणार होतो पण मग म्हटले आपण दुखावले जाल की काय म्हणून मग ......:)
असो
धन्यवाद वैभवराव आपल्या
धन्यवाद वैभवराव आपल्या मार्गदर्शनाबद्द्ल..