मला तुझी खूप आठवण येतेय. असं वाटतय किती युगं लोटली तुला पाहून, तुला स्पर्श करून. तुला कोणता स्पर्श जास्त आवडतो रे? माझ्या डोळ्यांचा की माझ्या बोटांचा? की .... माझ्या ... कानांचा? मला माहित आहे अवघड आहे उत्तर. पण मला खात्री आहे, तुला माझे सारेच स्पर्श आवडतात.
ए, तुला फक्त माझेच स्पर्श आवडतात की इतर कोणाचेही? मला माहित आहे ह्याचं उत्तर तू म्हणशील. "मला कोणाचाही स्पर्श चालतो, खरं तर मला कोणी ना कोणी स्पर्श करत राहाणं हे हवच असतं. स्पर्शाने जागृत होणं हेच माझं काम. आणि ह्यातच माझ्या जन्माचं आणि अस्तित्वाचं सार्थक आहे" पण मग असं का केलंस तू, आजारी का पडलास. तुला माहित आहे ना, तू आजारी पडलास की तुला फक्त तुझे डॉक्टर हात लावू शकतात. मग का आजारी पडलास तू. तू आजारी पडून तुझ्या डॉक्टरांकडे गेल्या पासून मला काही सुचत नाहिये बघ. आता कधी होणारेस रे बरा तू. तुझी इतकी सवय झालिये ना मला तू, दिवस रात्र, मला तू हवा असतोस रे. तुझ्यावाचून अपूर्ण अपूर्ण वाटतं रे. दिवसा कशाला रात्री सुद्धा खूप मिस करते रे मी तुला. मीच कशाला माझा मुलगा तुझा मित्र॑ पण तुला मिस करतो.
तुझ्याऐवजी माझ्यासोबत आहे ना तो एकदम बोअर करतो पाहा मला, त्याला ना रूप ना त्याच्यात हलते रंग हलती चित्र, ना तो गाऊ शकत. ना तो सगळीकडची माहिती मला देऊ शकत. ना तो माझ्यासाठी सगळ्यांमध्ये राहू शकत. तो फक्त दोनच कामं करू शकतो, सगळ्यांचे कॉल रिसिव करायचे किंवा त्यांना कॉल करायचे आणि सगळ्यांना निरोप द्यायचे आणी त्यांचे घ्यायचे. आणि सगळ्यांचे तरी कसे फक्त मला फोन करतील त्यांचेच, कारण माझ्याकडे कोणाचे नंबर नाहीत ना तू नसल्याने. आता तू ये बरा होऊन पटकन ... आणि मग खूप मज्जा येईल मी सगळ्यांना व्हॉट्सअॅप्वर निरोप देईन, इंटरनेट ब्राउझ करेन, फेसबुक, जीमेल, मायबोली, जीटॉक, व्हायबर, स्काईप ..... सगळं सगळं परत सुरू होईल तू आलास की. ... , मी आणि माझा मुलगा खूप गेम्स खेळू - कॅण्डीक्रश, टेंपलरन. अरे तू नसलास तर कसं रे करणार मी हे सगळं, तुझ्यावरच तर इंस्टॉल आहे ना सगळं माझ्या लाडक्या सोनीच्या स्मार्टफोना...
******************
तुमचं पण असच होत ना बरचस, स्मार्टफोन बिघडला की? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.
अय्या, अगदी असच असच होतं..
अय्या, अगदी असच असच होतं..