Submitted by Prashant Pore on 23 September, 2013 - 00:20
येत नाही राग आता
तू कसेही वाग आता
जन्म झाला हा नकोसा
बा यमा तू जाग आता
देव भक्ताला विनवतो
एक तर वर माग आता
बोचली इतकी सुखे की
दु:ख वाटे बाग आता
का म्हणू मी संत त्याला?
लागला ना डाग आता?
हा कुणी इस्लाह केला
जाहलो बेदाग आता!
दूध पाजुन पोसवू का?
मी विषारी नाग आता
बहर, मिसरे, शेर, गझला
लाडका वैताग आता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला आवडला!
मतला आवडला!
देव भक्ताला विनवतो एक तर वर
देव भक्ताला विनवतो
एक तर वर माग आता
का म्हणू मी संत त्याला?
लागला ना डाग आता?<<< छान व सहज ओळींचे शेर आहेत.
दूध पाजून पोसवू का<<< येथे पाजुन असे करावे लागेल
मतलाही आवडला.
मतलाही आवडला.
सुपर्ब ...... खूप आवडली गजल
सुपर्ब ...... खूप आवडली गजल ......
मतला आणि 'बाग' हे विशेष
मतला आणि 'बाग' हे विशेष वाटले.
मतला, बाग ,डाग ,शेवटचा
मतला, बाग ,डाग ,शेवटचा शेर...छानच !!
धन्यवाद कणखरजी, बेफीजी,
धन्यवाद कणखरजी, बेफीजी, शशांकजी, उल्हासजी आणि सुशांत जी.
@ बेफीजी : "पाजुन" असेच लिहिले होते, टाईप करताना गडबड झाली.
लगेचच सुधारून घेतो.
अप्रतिम.....फारच सुरेख....
अप्रतिम.....फारच सुरेख....
धन्यवाद अनिलजी
धन्यवाद अनिलजी
काही शेर सुंदर... मतलाही
काही शेर सुंदर...
मतलाही छान
आवडली
आभारी आहे काका..
आभारी आहे काका..
छान!
छान!
आभारी आहे ताई
आभारी आहे ताई
गझल आवडली .
गझल आवडली .
सहीच
सहीच
'देव भक्ताला विनवतो एक तर वर
'देव भक्ताला विनवतो
एक तर वर माग आता'
सुंदर..
छान आहे गझल. कमी शब्द. मतला
छान आहे गझल.
कमी शब्द. मतला मस्त.
फक्त तो इस्लाह काय ते कळलं नाही. आणि त्या शेरात दोन्ही महत्वाचे शब्द उर्दू वापरल्यामुळं मजा येत नाही. (चांगला असावा वर बेफीकिरांनी कोट केलाय म्हन्जे)
>>'देव भक्ताला विनवतो
एक तर वर माग आता'
या शेराची कल्पना आवडली पण तरी च्या ऐवजी तर वापरल्यामुळे थोडा रसभंग झाला (माझा)
लाडका वैताग खूप आवडला
भारतीताई, रमाताई, योगुली आणि
भारतीताई, रमाताई, योगुली आणि पारिजाता सर्वांचेच हार्दिक आभार.