माझ्या घरी म्हणजे माहेरी व सासरी दर वर्षी गणेशोत्सव थाटामाटात केला जातो........लग्न झाल्यापासुन गेली २ वर्ष मी सासरचा गणपती एन्जॉय करते आहे........मस्त पवित्र सुंदर वातावरणात १० दिवस कसे गेले ते कळ्ळंच नाही......एरवी गौरी विसर्जनाच्या दिवशी आमचे गणपती विसर्जन होते...या वर्षी जावेने नवस बोल्ल्याकारणाने त्याच्या पुर्ततेसाठी १० दिवसांचा गणपती होता.....
तर ही आमच्या गणेशाची काही रुपे.....
हे खास माझं आवडतं रुप......
हा एक हुकलेला फोटो
मोठ्या दिरांच्या बाबुने - वय वर्षे ४.. बनवलेली बाल गणेशाची मुर्ती आणि बाजुला उंदीर ( मी बनवलेला ) आणि खाउ
अखेर विसर्जन...बाप्पा टेंपो मधे आमच्या छोटु बाप्पा बरोबर
पुणेरी ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे विसर्जन
नुसती धम्माल
तीन बहुरानीया........ डावीकडुन पहिली मी.....
मी आणि दिरांचा छोटा दिवित......( काकीचा लाडोबा )
गणपती चाल्ले गावाला...चैन पडेना आम्हाला.....माझ्या बाप्पाचं शेवटचं दर्शन........