आपलं आयुष्य, हे जग एकुण सगळच किती अशाश्वत, क्षणभंगुर आहे याची प्रचिती काल परत आली. काल रात्री साधारण ९च्या आसपास आईचा फोन आला मावसभावाच्या निधनाची वार्ता देण्यासाठी. बाहेर गणपतीची मिरवणुक चालु असल्याने नीट ऐकु आले नाही म्हणा किंवा ऐकुन विश्वास न बसल्याने म्हणा मी तिला परत विचारल काय म्हणालीस म्हणुन, या वेळेस आतल्या खोलीत जाउन बोलले त्यामुळे नीट ऐकु आल आणि खात्री पटली की मगशी जे ऐकल ते खर होत.
तसे या भावाच आणि माझ खूप काही जवळच नात वगैरे नव्हत पण तरीही कालपर्यंत ज्याच्याबद्दल साध आजारी असल्याचसुद्धा कानावर आलेल नाही त्याच्याबाबतीत अचानक अस ऐकु येण जरा विचित्रच वाटल आणि मनात विचार आला की खरच किती अशाश्वत आणि क्षणभंगुर आहे आपल आयुष्य. आज आहोत तर उद्या कदाचित नाही.
काही महिन्यांपूर्वी माझे सासरे वारले त्यानंतर माझ्या सासुबाईंच्या मैत्रिणी त्यांना घेउन कन्याकुमारीला गेल्या होत्या. त्यावेळेस एरव्ही कधी जमत नाही म्हणुन आईबाबांबरोबर निगडीला मावशीकडे गेले होते अगदी सहज. तिथे बोलताना माझे सासरे कशाने गेले वगैरे गोष्टी सांगत असताना कोणीतरी मला त्यांच वय विचारल मी म्हणाले "खूप काही वयस्कर नव्हते ६५ वर्ष." त्यावर त्याने एका ११ वर्षाच्या ब्रेन हॅमरेजने गेलेल्या मुलाच उदाहरण देउन तो म्हणाला की अस काही नसत गं तुमच्या आयुष्याची दोरी जेव्हा तुमच्या आयुष्याची दोरी तुटली की संपल सगळ. तिथे वयाचा वगैरे हिशोब काही नसतो.....
आणि काल त्याच्या निधनाची बातमी ऐकुन अगदी हेच मनात आलं
मुग्धा, खुप वाईट वाट्ल
मुग्धा, खुप वाईट वाट्ल वाचुन्...तुमच्या मावसभावाला श्रधांजली...
मरण हे प्रत्येक सजीवच्या आयुष्यातील अट्ळ सत्य आहे...जीवन
अशाश्वत आहे पण मरण हे एकच शाश्वत आहे...
तुमच्या आयुष्याची दोरी जेव्हा तुमच्या आयुष्याची दोरी तुटली की संपल सगळ. तिथे वयाचा वगैरे हिशोब काही नसतो>>> अगदी खर म्हणुनच जे आहे ते आनंदाने जगायच्..माझ्याकडे काय नाही पेक्षा काय आहे हे कळाल की समाधान मिळत..
अगदी खरय... असच काहीस....
अगदी खरय... असच काहीस....
माझ्या नणंदेचा पण असाच अचानक
माझ्या नणंदेचा पण असाच अचानक म्रुत्यु झाला. आदल्या दिवशी आम्ही छान गप्पा मारल्या होत्या. १ वर्ष झाल पण अजुन या गोष्टीवर विश्वास बसत नाही. ती अजुन आमच्या आसपास आहे असच वाटत राहत.