Submitted by डॅफोडिल्स on 18 September, 2013 - 22:54
भरतातल्या शाळा वर्षाच्या मध्ये म्हणजे ़जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये मुलांना अॅडमिशन देतात का? अमेरिकेतून काही लोक शैक्षणिक वर्षाच्या मधल्या कालावधीत भारतात परत जात आहेत, त्यांची मुले पहिली ते आठवी या इयत्तां मधली आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर ला भारतात परत जायचे असेल तर भारतातिल एक टर्म तेव्हा पूर्ण झालेली असते अश्यावेळी भारतातल्या शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो का ? की विद्यार्थ्या चे वर्ष वाया जाउ शकते ? कुणाला काही माहीती किंवा अनुभव असल्यास जरूर कळवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Yes, in bangalore forms come
Yes, in bangalore forms come out in second term that is after dasara vacation. Keep in touch with all the schools short listed for form issue, last date of form submission etc. I have heard that some schools allows new admission in the middle of an academic year but they make you pay for next year fees too for such admissions. Hope it helps.
डॅफो, r2i किंवा return to
डॅफो, r2i किंवा return to India forums वर माहीती मिळेल कदाचित.
शाळांमधे असे प्रवेश मिळु
शाळांमधे असे प्रवेश मिळु शकतात. (जर जागा उपलब्ध असतील तर). पण ही शक्यता खुप कमी आहे.
यावर एक उपाय म्हणजे जेव्हा पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांचे प्रवेश सुरु होतात (नोवेंबर्/डिसेंबर) तेव्हा तिथल्या मुख्याध्यापकांशी बोलुन त्यांना परिस्थिती सांगणे आणि प्रवेशाची प्रक्रिया त्यानाच विचारणे. Extenuating circumstances म्हणुन काही शाळा असे प्रवेश देउ शकतात. (बाणेर पुणे येथील ऑर्चिड शाळेच्या वेब साईटवर असे लिहिलेले आढळले).
जर स्थानिक नातेवाईक असतील तर ते चांगल्या तर्हेने फॉलो अप करु शकतात. फोन पेक्षा प्रत्यक्ष भेट Preferrable.
डॅफोडिल्स , कुठे परतणार
डॅफोडिल्स , कुठे परतणार आहात?
मी मुंबई ठाणे बद्दल सांगते.
शाळांमधे जागा असेल तर प्रवेश मिळू शकतात हे बरोबरे. मात्र चांगल्या शाळांमधे बहुतेकवेळा जागा नसतातच.
१ली च्या पासुनच्या प्रवेशप्रक्रिया या जागा असल्या तरच ओपन होतात. बाकी शाळा ज्यु केजी मधेच पूर्ण जागा भरतात.
पुन्हा हा एक घोळ आहे -
एसएससी शाळा - जुन मधे चालू ( रेग्युलर १लीपासुनचा प्रवेश मार्च मधे )
सिबीएससी शाळा - मार्च मधे चालू ( रेग्युलर १लीपासुनचा प्रवेश नोव्हे मधे प्रक्रीया , किंवा जागा नसल्यास वेटींग , फेब मधे नक्की काय ते कळेल )
आयसीएससी शाळा - - मार्च / जून मधे चालू ( रेग्युलर १लीपासुनचा प्रवेश नोव्हे मधे प्रक्रीया , किंवा जागा नसल्यास वेटींग , फेब मधे नक्की काय ते कळेल )
शिवाय २री च्या पासुनच्या प्रवेशप्रक्रियामधे बहुतांश शाळा लेखी परिक्षा घेतात. ( १ली साठी घेत नाहीत असा अनुभव आह, पण काही शाळा घेतही असतील) या परिक्षा नोव्हे, डिसे, जाने या काळात होतात. त्यामुळे या काळात मुलांना भारतात आणणे जरुरी आहे. शाळांमधे फोन करुन फॉर्म आणि परिक्षांच्या तारखा कळू शकतात.
अजुन एक उपाय असा की मिळेल त्याशाळेत अॅडमिशन घेऊन, पुढच्या वर्षीसाठी हवी ती शाळा ट्राय करणे. पण मोठी मुलं असतील तर अभ्यासाचा फार घोळ होतो.
प्रवेश प्रक्रीया नोव्हे मधे चालू होते तेव्हा हव्या त्या दोन चार शाळांमधे फॉर्म भरावा हेच उत्तम.
धन्यवाद ! सावली, एका फ्रेन्ड
धन्यवाद !
सावली, एका फ्रेन्ड साठी चौकशी करत आहे.
पुण्या मुंबईत्ल्या आयसीएसइ शाळा अश्या मधेच परत आलेल्या मुलांना कंसिडर करत नाहीत का ?
चिन्नु आर्२आय वर बघते