चीझगोला फ्रुटवाला-- गोड - लाजो

Submitted by लाजो on 18 September, 2013 - 09:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गृपः फळं + चीझ

लागणारे जिन्नस:

फळं - स्ट्रॉबेरीज/ आंबा / किवी/ अननस वगैरे कहिही फक्त पाणी सुटणारी फळं नकोत.
एक ते दीड कप क्रिम चीझ,
पाव कप मऊ बटर
चवीनुसार आयसिंग शुगर
प्लेन गोड बिस्किटांचा चुरा / टोस्टेड क्रश्ड नट्स

स्वादासाठी: व्हॅनिला इसेन्स / केशर-वेलची/जायफळ पूड

कोटींगसाठी: चॉकलेट चिप्स, बदाम-पिस्ता पावडर

सॉस साठी: मिक्स्ड बेरी कुली / मँगो कुली

प्रकार १:

प्रकार २:

सर्व्हिंग साठी: वेफर बिस्किट्स / शुगर डस्टेड पेस्ट्री ट्रायअँगल्स वगैरे.

क्रमवार पाककृती: 

मी दोन वेगवेगळे प्रकार केले आहेत पण तुम्ही एकच प्रकार किंवा त्याहुन अधिक प्रकार करु शकता.

१. क्रिमचीझ + बटर आणि साखर एकत्र फेटुन घ्या आणि थोडावेळ फ्रिज मधे ठेवा,

२. मधल्या वेळात फळांचे मध्यम तुकडे करुन घ्या.

३. चीझ चे मिश्रण बाहेर काढुन घ्या - मी केलेले २ प्रकार -

प्रकार १: चीझ मिश्रणाच्या अर्ध्या भागात स्ट्रॉबेरीचे तुकडे, व्हूनिला इसेन्स आणि बिस्किटांचा चुरा घालुन मिक्स केले आणि बॉल वळला - थोडा वेळ फ्रिज मधे ठेवला.

प्रकार २: मिश्रणाच्या उरलेल्या भागात आंब्याचे तुकडे, केशर-वेलची/जायफळ पूड आणि टोस्टेड नट्स घालुन मिक्स केले आणि बॉल वळला (चीझ मऊ वाटलेच तर त्यात थोडा बिस्किट चुरा घालु शकता) - थोडा वेळ फ्रिज मधे ठेवला.

४. मधल्यावेळात मिक्स्ड बेरी कुली / मँगो कुली बनवुन घ्या. यासाठी बेरीज/ मॅंगो चे तुकडे + साखर, थोडे पाणी आणि लिंबाचा रस एकत्र करुन गॅसवर गरम करायला ठेवा. फळं शिजली आणि साखरेचा पाक
व्हायच्या आधी आंचेवरुन उतरवा आणि गाळण्यातुन गाळुन घ्या. सॉस थंड करायला ठेवा.

५. सेट झालेले चीझ बॉल्स बाहेर काढा.

प्रकार १: स्ट्रॉबेरी बॉल ला चॉक चिप्स मधे घोळवा आणि

प्रकार २: आंबा बॉल ला पिस्ता-बदाम पावडरीत घोळवा.

६. सर्व्ह करताना:

- स्ट्रॉबेरी बॉल्स ना मिक्स्ड बेरी कुली बरोबर सर्व्ह करा...

आणि आंबा बॉल्स ना मॅगो कुली बरोबर सर्व्ह करा.

वेफर बिस्किट्स / शुगर डस्टेड पेस्ट्री ट्रायअँगल्स, लिटील हार्ट बिस्किट्स वगैरे बरोबर एंजॉय करा Happy

-----

बाय २ गेट १ फ्री Wink

तिखट - चीझगोला

(हा प्रकार स्पर्धेसाठी नाही पण तिखट ग्रुप मधे फीट होतोय Happy )

- क्रिमचीझ + बटर एकत्र फेटुन घ्या आणि फ्रिजमधे सेट करायला ठेवा.
- मधल्या वेळात लाल + हिरवा कॅप्सिकमचे बारीक तुकडे, कॉर्न चे उकडलेले दाणे तयार ठेवा. चीझ मिश्रण बाहेर काढुन त्यात भाज्या घाला, चवीला हवा तो मसाला घाला आणि प्लेन / फ्लेवर्ड क्रॅकर्स चा चुरा घालुन बॉल वळा - फ्रिज मधे ठेवा.

- थोड्या वेळाने बाहेर काढुन कॉर्नफ्लेक्स च्या चुर्‍यात घोळवा.
- कुठल्याही सॉस आणि ब्रेड स्टिक्स बरोबर सर्व करा ...

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे... नुसते खायचे असेल तर १ - डिप सारखे क्रॅकर्स वगैरे सोबत खायचे असेल तर २-३
अधिक टिपा: 

- आपल्या आवडीची कुठलीही फळं वापरता येतिल.

- स्वाद, कव्हर, सॉस साठी आपल्या आवडीचे ऑप्शन वापरता येतिल. ट्राय आणि taste Happy भरपूर कॉम्बीनेशन्स्/आयडियाज करता येतिल.

- सोबत क्रिस्पी बिस्किट वगैरे दिले की ते क्रिम चिझ ला लावुन आस्वाद घेता येतो Happy

माहितीचा स्रोत: 
इकडे-तिकडे आणि आयडियाच्या कल्पना :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages