चीझगोला फ्रुटवाला-- गोड - लाजो

Submitted by लाजो on 18 September, 2013 - 09:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गृपः फळं + चीझ

लागणारे जिन्नस:

फळं - स्ट्रॉबेरीज/ आंबा / किवी/ अननस वगैरे कहिही फक्त पाणी सुटणारी फळं नकोत.
एक ते दीड कप क्रिम चीझ,
पाव कप मऊ बटर
चवीनुसार आयसिंग शुगर
प्लेन गोड बिस्किटांचा चुरा / टोस्टेड क्रश्ड नट्स

स्वादासाठी: व्हॅनिला इसेन्स / केशर-वेलची/जायफळ पूड

कोटींगसाठी: चॉकलेट चिप्स, बदाम-पिस्ता पावडर

सॉस साठी: मिक्स्ड बेरी कुली / मँगो कुली

प्रकार १:

प्रकार २:

सर्व्हिंग साठी: वेफर बिस्किट्स / शुगर डस्टेड पेस्ट्री ट्रायअँगल्स वगैरे.

क्रमवार पाककृती: 

मी दोन वेगवेगळे प्रकार केले आहेत पण तुम्ही एकच प्रकार किंवा त्याहुन अधिक प्रकार करु शकता.

१. क्रिमचीझ + बटर आणि साखर एकत्र फेटुन घ्या आणि थोडावेळ फ्रिज मधे ठेवा,

२. मधल्या वेळात फळांचे मध्यम तुकडे करुन घ्या.

३. चीझ चे मिश्रण बाहेर काढुन घ्या - मी केलेले २ प्रकार -

प्रकार १: चीझ मिश्रणाच्या अर्ध्या भागात स्ट्रॉबेरीचे तुकडे, व्हूनिला इसेन्स आणि बिस्किटांचा चुरा घालुन मिक्स केले आणि बॉल वळला - थोडा वेळ फ्रिज मधे ठेवला.

प्रकार २: मिश्रणाच्या उरलेल्या भागात आंब्याचे तुकडे, केशर-वेलची/जायफळ पूड आणि टोस्टेड नट्स घालुन मिक्स केले आणि बॉल वळला (चीझ मऊ वाटलेच तर त्यात थोडा बिस्किट चुरा घालु शकता) - थोडा वेळ फ्रिज मधे ठेवला.

४. मधल्यावेळात मिक्स्ड बेरी कुली / मँगो कुली बनवुन घ्या. यासाठी बेरीज/ मॅंगो चे तुकडे + साखर, थोडे पाणी आणि लिंबाचा रस एकत्र करुन गॅसवर गरम करायला ठेवा. फळं शिजली आणि साखरेचा पाक
व्हायच्या आधी आंचेवरुन उतरवा आणि गाळण्यातुन गाळुन घ्या. सॉस थंड करायला ठेवा.

५. सेट झालेले चीझ बॉल्स बाहेर काढा.

प्रकार १: स्ट्रॉबेरी बॉल ला चॉक चिप्स मधे घोळवा आणि

प्रकार २: आंबा बॉल ला पिस्ता-बदाम पावडरीत घोळवा.

६. सर्व्ह करताना:

- स्ट्रॉबेरी बॉल्स ना मिक्स्ड बेरी कुली बरोबर सर्व्ह करा...

आणि आंबा बॉल्स ना मॅगो कुली बरोबर सर्व्ह करा.

वेफर बिस्किट्स / शुगर डस्टेड पेस्ट्री ट्रायअँगल्स, लिटील हार्ट बिस्किट्स वगैरे बरोबर एंजॉय करा Happy

-----

बाय २ गेट १ फ्री Wink

तिखट - चीझगोला

(हा प्रकार स्पर्धेसाठी नाही पण तिखट ग्रुप मधे फीट होतोय Happy )

- क्रिमचीझ + बटर एकत्र फेटुन घ्या आणि फ्रिजमधे सेट करायला ठेवा.
- मधल्या वेळात लाल + हिरवा कॅप्सिकमचे बारीक तुकडे, कॉर्न चे उकडलेले दाणे तयार ठेवा. चीझ मिश्रण बाहेर काढुन त्यात भाज्या घाला, चवीला हवा तो मसाला घाला आणि प्लेन / फ्लेवर्ड क्रॅकर्स चा चुरा घालुन बॉल वळा - फ्रिज मधे ठेवा.

- थोड्या वेळाने बाहेर काढुन कॉर्नफ्लेक्स च्या चुर्‍यात घोळवा.
- कुठल्याही सॉस आणि ब्रेड स्टिक्स बरोबर सर्व करा ...

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे... नुसते खायचे असेल तर १ - डिप सारखे क्रॅकर्स वगैरे सोबत खायचे असेल तर २-३
अधिक टिपा: 

- आपल्या आवडीची कुठलीही फळं वापरता येतिल.

- स्वाद, कव्हर, सॉस साठी आपल्या आवडीचे ऑप्शन वापरता येतिल. ट्राय आणि taste Happy भरपूर कॉम्बीनेशन्स्/आयडियाज करता येतिल.

- सोबत क्रिस्पी बिस्किट वगैरे दिले की ते क्रिम चिझ ला लावुन आस्वाद घेता येतो Happy

माहितीचा स्रोत: 
इकडे-तिकडे आणि आयडियाच्या कल्पना :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! लाजो, मस्त सजावट, अगदी प्रोफेशनल टच वाटतो. प्लेट्स ही छान आहेत. पहिल्या फोटोत स्ट्रॉबेरीच्या मागे गोल काय आहे? बिस्कीट आहे का?
डिश बघुन मन प्रसन्न होते, पण नाव मात्र काहीसे छान ठेव ना! तुझ्या या सुंदर डिशला शोभत नाही.

वॉव.. माझ्यासमोर असे काही ठेवले तर बघतच बसेन, खायचा धीरच होणार नाही. खरंच अगदी चित्रं दिसताहेत.

खरच फ्लॉरियार्ड्स ला यावच म्हणतेय.
लाजो, अगो... किती सुंदर आहे हे. बघत बसावसं वाटतय... आणि अतिशय सोप्पंही दिसतय... (तू ज्या पद्धतीनं लिहिलयस त्यावरून् म्हणतेय मी. करायला घेतलं की फेफे उडेल असंही वाटतय... माणिकबाइंच्या गाण्यांच्या बाबतीत हे हमखास होतं बघ... ऐकायला सोप्पी... म्हणायला फेफे)

ट्रेडर जो मध्ये वाईल्ड ब्ल्यूबेरी वानिला चीज मिळते. क्रीम ऐवजी ते शेवरे (फ्रेंच उच्चार!!! कधी जमाव मला!) वापरतात. तेच आणीन. हे छान असल, दिसल तरी ते सोप्प आहे Wink
एवढे चीज खायचं म्हणजे सोबत एखादी वाईन सांगा टीप मध्ये.

लाजो,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.

वॉव लाजो!! कसलं भारी दिसतंय...
मला तिखट चीजगोला खायला आवडेल. मागणी नोंदवून घ्यावी Wink
स्ट्रॉबेरी गोल्याची प्लेट आवडली. फार्फार सुंदर आहे.

भारतात जे ब्रिटानियाचं क्रिम चीज मिळतं, ते चालेल का या चीजगोल्यासाठी? यात काडी खुपसून पॉपर्स करता येतील का?

वॉव. मस्तच. यम्मी दिसतंय एकदम.
स्ट्रॉबेरी गोल्याची प्लेट साजेशी आणि मस्तच सजवली आहे.

वा!

अरेरे....... चीज चा सत्यानाश...

चीज हे अल्कोहोलिक द्रव पदार्थांबरोबरच मस्त लागते....

बीयर = सॉल्टेड चीज
रम = गार्लिक चीज
व्हिस्की = जिंजर चीज
वाईन = मॅझोरोला चीज
व्होडका = ७५% जिंजर+२५% गार्लिक चीज

असो,.....पसंद अपनी अपनी

बाकी जे लोक चीज पाव भाजी आणि चीज बिस्किटे खावू शकतात ते काय लोण्या बरोबरोबर पण चीज खावू शकतील....

वही मैं सोचू... लाजो आणि चक्क गोड नाही???????????? Happy
खूप्प्प्प्प्प्प्च तोंपासू दिसतेय पाकृ... स्लर्प स्लर्प... तुझ्या पाकृचे फोटोज बघताना की बोर्डची मात्र वाट लागते... Proud

लाजो, सह्हीच दिसताहेत गोळे. Happy

तुझ्या शब्दखुणांमधल्या पूर्णब्रह्म भोवतीची अवतरण चिन्हं काढून टाक प्लीज.

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

Pages