पनीर-सफरचंद हलवा / गोड् / जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 September, 2013 - 01:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा वाटी पनीर
अर्धे सफरचंद
२ चमचे मक्याचे पिठ
२ चमचे तांदळाचे पिठ किंवा रवा
उपलब्धतेनुसार १ ते २ चमचे ड्रायफ्रुट तुकडे करुन
५ चमचे साखर
पाव चमचा वेलची पूड
२ चमचे साजूक तूप

क्रमवार पाककृती: 

पहिला सफरचंद किसणीवर किसा. पनीरचा बारीक चुरा करा किंवा दोन्ही एकत्र करुन मिक्सरमहून फिरवून घ्या. आता तुप सोडून सर्व जिन्नस एकत्र करा व हे जिन्नस इडलीच्या पिठाइतपत पाण्यात कालवा.

१० मिनीटे तसेच राहू द्या. नंतर कढईत तूप गरम करुन त्यावर परतवा व झाकण ठेऊन मंद आचेवर चांगले शिजू द्या. मधून मधून ढवळत रहा. ७-८ मिनीटांत हलवा तय्यार - नो किटकिट नो झिगझिग Happy

हे आमचे गणेशोत्सवासाठीचे खास डेकोरेशन Happy

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीवर आहे. वरील प्रमाणाने जास्त गोड होत नाही.

हे केल्यावर लक्षात आल ह्याची बर्फी, वड्या, लाडूही वळले जाऊ शकतात.

माहितीचा स्रोत: 
पुन्हा एकदा माबोवरच्या गणेशोत्सवाच्या कृपेने स्वतःचा प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात पनीरची स्वतःची टेस्ट लागते का?
कलाकंदासारखं लागत का हे थोडंस?

काजुचे बाप्पा मस्त आहेत Happy
निर्गुण निराकार वर टाक Wink

आज संध्याकाळ्पर्यंत ये नाहीतर पुढच्या गणेशोत्सवापर्यंत तरी मी असला काही प्रकार बनवणार नाही. मी गोड कमी बनवते घरात. Lol

काजूचा गणपती छान दिसतो आहे.

मी असा पनीर घालून केळेपाक केला होता. मस्त लागत होता. पण फोटो चंडलब आल्यामुळे इथे लिहिला नाही Wink

जागू,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.

विनिता कॉलर ताठ केली हा मी. Lol धन्स. माबोवर असे बरेच शास्त्रज्ञ आहेत आणि अशा स्पर्धांच्या वेळी माझ्यासारख्यांच्यातला शास्त्रज्ञ जागा होतो.

संयोजक बदल करते लगेच. धन्स.

अरे वा .. एकदम सोपी रेसिपी आहे .. Happy

पण पहिल्या फोटोत सगळं मिश्रण कालवल्यानंतर साखर विरघळल्यामुळे इतकं पाणी झालं का? साहित्यात काही लिक्विड दिसत नाही ..

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383