Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 September, 2013 - 01:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
पहिला सफरचंद किसणीवर किसा. पनीरचा बारीक चुरा करा किंवा दोन्ही एकत्र करुन मिक्सरमहून फिरवून घ्या. आता तुप सोडून सर्व जिन्नस एकत्र करा व हे जिन्नस इडलीच्या पिठाइतपत पाण्यात कालवा.
१० मिनीटे तसेच राहू द्या. नंतर कढईत तूप गरम करुन त्यावर परतवा व झाकण ठेऊन मंद आचेवर चांगले शिजू द्या. मधून मधून ढवळत रहा. ७-८ मिनीटांत हलवा तय्यार - नो किटकिट नो झिगझिग
वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी
अधिक टिपा:
साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीवर आहे. वरील प्रमाणाने जास्त गोड होत नाही.
हे केल्यावर लक्षात आल ह्याची बर्फी, वड्या, लाडूही वळले जाऊ शकतात.
माहितीचा स्रोत:
पुन्हा एकदा माबोवरच्या गणेशोत्सवाच्या कृपेने स्वतःचा प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यात पनीरची स्वतःची टेस्ट
यात पनीरची स्वतःची टेस्ट लागते का?
कलाकंदासारखं लागत का हे थोडंस?
काजुचे बाप्पा मस्त आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
निर्गुण निराकार वर टाक
मस्त! काजुचे बाप्पा मस्त आहेत
मस्त! काजुचे बाप्पा मस्त आहेत >+१
रिया लागते पनिरची चव. मी खाऊन
रिया लागते पनिरची चव. मी खाऊन पाहीले ना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रावी धन्स.
वॉव मग सुपर काँबी लागेल
वॉव मग सुपर काँबी लागेल सफरचंद आणि पनीर!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कधी येऊ ग तुझ्याकडे?
छान हलवा आणि काजूचे बाप्पा
छान हलवा आणि काजूचे बाप्पा पण छानच.
गोड अन तिखट दोन्ही जागू
गोड अन तिखट दोन्ही जागू आल्यात!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्त दिसतोय तो हलवा...
आज संध्याकाळ्पर्यंत ये नाहीतर
आज संध्याकाळ्पर्यंत ये नाहीतर पुढच्या गणेशोत्सवापर्यंत तरी मी असला काही प्रकार बनवणार नाही. मी गोड कमी बनवते घरात.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
काजूचा गणपती छान दिसतो आहे.
काजूचा गणपती छान दिसतो आहे.
मी असा पनीर घालून केळेपाक केला होता. मस्त लागत होता. पण फोटो चंडलब आल्यामुळे इथे लिहिला नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जागू,
जागू,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.
करून पाहिला लगेच.. अप्रतिम
करून पाहिला लगेच.. अप्रतिम झाला... जागू आपल्याला पाककला शास्त्रज्ञ असे म्हणायाला आवडेल
विनिता कॉलर ताठ केली हा मी.
विनिता कॉलर ताठ केली हा मी.
धन्स. माबोवर असे बरेच शास्त्रज्ञ आहेत आणि अशा स्पर्धांच्या वेळी माझ्यासारख्यांच्यातला शास्त्रज्ञ जागा होतो.
संयोजक बदल करते लगेच. धन्स.
व्वा! आजच करुन बघेन
व्वा! आजच करुन बघेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान, सोपी कृती.. आवडली.
छान, सोपी कृती.. आवडली.
अरे वा .. एकदम सोपी रेसिपी
अरे वा .. एकदम सोपी रेसिपी आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण पहिल्या फोटोत सगळं मिश्रण कालवल्यानंतर साखर विरघळल्यामुळे इतकं पाणी झालं का? साहित्यात काही लिक्विड दिसत नाही ..
जागू : मस्तच ,आवडली रेसिपी !
जागू : मस्तच ,आवडली रेसिपी !
सशल, पहिल्या फो.आधी तिने
सशल, पहिल्या फो.आधी तिने पाण्यात कालवा असे लिहिले आहे पहा.
आईन वेळी धागा कुठे गायब झाला
आईन वेळी धागा कुठे गायब झाला होता. जागू याला पनीर फज विथ सफरचंद टच म्हणायचे का आपण ?
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
जागु, गोड रेसिपी आवडली
जागु,
गोड रेसिपी आवडली